संजय लीला भन्सालीने नुकतंच त्याच्या एका आगामी चित्रपटाची घोषणा केली. संजय लीला भन्साली बैजू बावरा हा चित्रपट करत आहे. ज्यामधील बैजूसाठी आधी त्याने त्याचा आवडता अभिनेता रणवीर सिंहला विचारलं होतं. मात्र आता त्याने या चित्रपटातील बैजूसाठी अभिनेता ऋतिक रोशनची निवड केल्याची चर्चा आहे. रणवीरने या चित्रपटाला नकार दिला की संजयने या कास्टिंगबाबत आपलं मत बदललं हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्किप्ट वाचल्यानंतर या भूमिकेसाठी ऋतिकने आपला होकार कळवला आहे. 2010 साली प्रदर्शित झालेल्या गुजारीश या चित्रपटामध्ये ऋतिकने संजय लीला भन्सालीसोबत काम केलं होतं. ज्यामुळे आता पुन्हा जवळजवळ नऊ वर्षांनी तो संजय लीला भन्सालीसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे.
बैजू बावरात काम करण्यासाठी ऋतिकने दिला होकार
अनेक दिवसांपासून संजय आणि ऋतिक या चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी एकमेकांना भेटत होते. संजय लीला भन्सालीला ऋतिकचं सुपर 30 आणि वॉर या चित्रपटातील काम प्रंचड आवडलं. ज्यामुळे ऋतिकने आता आपल्या चित्रपटात काम करावं असं त्याला वाटू लागलं. शिवाय ऋतिकलादेखील संजयसोबत काम करायचं होतंच. त्यामुळे दोघांसाठीदेखील हा एक छान योग जुळून आला. संजय लीला भन्सालीसोबत एखादा पिरिएड ड्रामा करण्याची ऋतिकला इच्छा होती. ज्यामुळे बैजू बावराचा बैजू होण्यास तो नक्कीच उत्सुक आहे. सध्या तरी ऋतिक त्याच्या वडीलांच्या म्हणजेच राकेश रोशन यांच्या क्रिश 4 या चित्रपटाच्या घोषणेमध्ये व्यस्त आहे. मात्र त्याने संजय लीला भन्सालीच्या बैजू बावरा या चित्रपटात काम करण्यास तयारी दर्शवली आहे. लवकरच या दोन्ही चित्रपटांची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यामुळे ऋतिकचा कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे चाहत्यांना नक्कीच कळू शकेल.
रणवीरने का सोडला बैजू बावरा
रणवीर संजय लीला भन्सालीचा आवडता कलाकार आहे. ज्यामुळे संजय लीला भन्सालीच्या बैजू बावराला रणवीरने का नकार दिला याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. मात्र असं काहीच नाही आहे. कारण रणवीरने या चित्रपटासाठी संजयला नकार नक्कीच दिलेला नाही. मात्र रणवीर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये बिझी आहे. रणवीर सध्या एका पिरिएड ड्रामाचं शूटिंग करत आहे. कारण तो लवकरच करण जोहरच्या तक्त या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट मुघलकाळातील आहे. तर बैजू बावरा ही एक संगीतमय बायोपिक आहे. रणवीरच्या तक्तमुळे त्याला बैजू बावरासाठी वेळ देणं शक्य नाही. याच कारणामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिलेला आहे. शिवाय संजय लीला भन्सालीसोबत काम करताना खूप वेळ देण्याची गरज असते. कारण संजय एखादी भूमिका पडद्यावर उतवरण्यासाठी स्वतः आणि कलाकारांकडूनही खूप मेहनत करून घेतो. ज्यामुळे या दोन चित्रपटांसाठी रणवीर नक्कीच वेळ देऊ शकत नाही. शिवाय रणवीर पुन्हा एकदा रोहित शेट्टीच्या आणकी एका अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे, म्हणूनच त्याने बैजू बावरामधून काढता पाय घेतला आहे. कारण काहीही असलं तरी आता रणवीर ऐवजी ऋतिक संजय लीला भन्सालीचा बैजू होणार हे मात्र नक्की झालं आहे. बैजू बावराचं शूटिंग या वर्षीच्या डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय संजय आलिया भटसोबत गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही व्यस्त असणमार आहे. त्यामुळे ऋतिकच्या क्रिशची शूटिंग संपल्यावर लगेचच बैजू बावराच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
अंदाज अपना अपना’ चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण, तीन वर्ष सुरु होते शुटींग
मिलिंद सोमणचे 90 च्या काळातली गाजलेले म्युझिक अल्बम्स
करोड’पती’ असलेल्या अभिनेत्री, जगतात ऐशोआरामात आयुष्य