ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ह्रतिक रोशनने मुलांसोबत केलं ट्रेकिंग, शेअर केले रिहान आणि रिधानचे फोटो

ह्रतिक रोशनने मुलांसोबत केलं ट्रेकिंग, शेअर केले रिहान आणि रिधानचे फोटो

बॉलीवूडचा सूपरस्टार ह्रितिक रोशन त्याच्या कामाबाबत खूप क्रेझी आहे. ज्यामुळे त्याचे जगभरात चाहते आहेत.त्याचं वर्कआऊट, डान्स याबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. पण तो जसा सुपरस्टार आहे, तसाच तो त्याच्या दोन्ही मुलांची काळजी घेणारा आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा पितादेखील आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या कामातून वेळ मिळतो तेव्हा तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याने त्याच्या मुलांसोबत ट्रेक केलं आणि त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले.

ह्रतिक रोशनचे फॅमिली फोटो

ह्रतिकने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे ट्रेकिंग ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने त्याचा एक फॅमिली फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्याची दोन मुलं रिहान आणि रिधान, त्याची एक्स वाईफ सुझैनचा भाऊ जायद खान आणि त्याची मुलं आणि पत्नी होते. या फोटोसोबत ह्रतिकने शेअर केलं होतं की, “ओबडधोबड जमिनीवर चालण्यात एक वेगळीच मजा आहे, मला नेमकं काय ते सांगता येणार नाही पण यामुळे मला खूप आनंद मिळतो” विशेष म्हणजे ह्रतिकच्या या फॅमिली फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेटचा पाऊस पाडला आहे.
ह्रतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट फायटरसाठी चर्चेत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच दीपिका पादुकोणसोबत स्क्रिन शेअर करत आहे. त्याने त्याच्या वाढदिवशी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने एक टीझर शेअर केला होता आणि लिहीलं होतं की, “स्वप्न खरंच पूर्ण होतात” ह्रतिक आणि दीपिकाचा फायटर एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत असून तो 2022 च्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मागच्या वर्षी ह्रतिक आणि टायरग श्रॉफचा वॉर खूपच गाजला होता. ह्रतिकच्या वॉर आणि सुपर 30 ने बॉक्सऑफिसवर चांगली कमाईदेखील केली होती. फायटरप्रमाणे ह्रतिक विक्रम वेधा या चित्रपटातही झळकणार आहे. हा चित्रपट एका सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. ज्यात त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान असणार आहे. ज्यामुळे चाहत्यांना आता ह्रतिकच्या फायटर आणि विक्रम वेधाचे वेध लागले आहेत.

जायदला का नाही मिळालं बॉलीवूडमध्ये यश

या फॅमिली फोटोंमध्ये ह्रतिकच्या एक्स वाईफ म्हणजेच सुझैन खानच्या भावाचं जायद खानचं कुटुंबदेखील आहे. ह्रतिक आणि सुझैनचा घटस्फोट झालेला असला तरी त्याचे त्याच्या बायकोशी आणि  तिच्या कुटुंबाशी मैत्रीचे संबध आहेत. शिवाय दोघंही मुलांसाठी बऱ्याचदा एकत्र येताना दिसतात. जायद खानची जादू बॉलीवूड फार चालू शकली नाही. ज्यामुळे त्याने मागील दहा वर्षात जवळजवळ फक्त तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याबाबत एकदा जायद खानने शेअर केलं होतं  की जर तुमचे चित्रपट चांगले चालले तरच लोक तुम्हाला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स देतात. मात्र असं असूनही जायद आणि ह्रतिकचे संबध आजही चांगले आहेत आणि एक कुटुंब म्हणून  ते नेहमीच एकत्र असतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

ENTERTAINMENT
ह्रतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा ‘फायटर’असणार या वर्षीचा बिग बजेट चित्रपट

दगडूची प्राजू झाली बोल्ड, केतकी माटेगावकरचा बोल्ड लुक व्हायरल

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

ADVERTISEMENT
26 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT