मकरसंक्रात आता अगदी काही आठवड्यावर आली आहे. मकरसंक्रातीच्या दरम्यान हळदीकुंकू घालण्याची पद्धत सगळीकडेच आहे. हळदीकुंकू म्हणजे महिलांचा आवडीचा सण. घरात महिलांना बोलावून त्यांचा पाहुणचार करणे आणि त्यांना एक छानसे वाण देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. नववधू या लग्नानंतर सौभाग्याचे लेणे वाण म्हणून भेट देतात. पण ही पद्धतही अनेकांकडे वेगवेगळी आहे. वाण अगदी लहान असलं तरी कोणी काय दिलं याची उत्सुकता नाही म्हटलं तरी प्रत्येक महिलेला असते. मकरसंक्रातीला यंदा वाण द्यायचा काही विचार केला आहे का? नाही तर आमच्याकडे आहे तुमच्यासाठी वाण देण्याच्या एकदम फर्स्ट क्लास आयडियाज
मकर संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हे खास उखाणे
साडी कव्हर
साडी ही प्रत्येक महिलांच्या कपाटात असतेच. त्या साड्या नीट ठेवणे फारच गरजेचे आहे. साड्या नीट ठेवण्यासाठी साडी कव्हर हा बेस्ट पर्याय आहे. महिलांकडे कितीही साड्यांचे कव्हर असले तरी देखील एखादे आणखी कव्हर दिले तरी त्यांना त्याची गरज असते. हल्ली कपड्यांचे साडी कव्हर मिळतात. जे जास्त काळासाठी टिकतात. तुम्ही कपडे घेऊन असे साडी कव्हर्स शिवूनही घेऊ शकता. काही जण हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना बोलावतात. अशावेळी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये हे बसवता येते.
बजेट : 40 ते 50 रुपये एक कपड्याचे कव्हर
म्हणून घातले जाते लहान मुलांना ‘बोरन्हाण’
मेकअप पाऊच
बॅग हा महिलांच्या खूप आवडीचा विषय आहे. अगदी लहान बॅगपासून ते मोठ्या हँडबॅगपर्यंत कितीही बॅग्ज दिल्या तरी त्या महिलांना हव्या असतात. ज्या महिला नोकरी करतात. त्यांना त्यांच्यासोबत एक मेकअप पाऊच कायम ठेवायला आवडते. ज्या पाऊचमध्ये ते त्यांच्या मेकअपच्या खास वस्तू ठेवू शकतात.एखाद्या थोड्याशा हँडबॅगमध्ये राहणारे पाऊच गिफ्ट म्हणून द्यायला ही सुंदर दिसते आणि कॅरी करायलाही अनेकांना आवडते.
बजेट : 70 ते 80 रुपये एक पाऊच
हँड टॉवेल
हँड टॉवेल ही अशी वस्तू आहे जी प्रत्येकाला लागतेच. म्हणजे ती नावडती अशी असूच शकत नाही. महिलांना जीम असो किंवा बाहेर जाताना एक छोटासा नॅपकिन किंवा टॉवेल कॅरी करायचाच असतो. त्यामुळे वाण देण्याची ही आयडिया देखील एकदम usefull आहे असे म्हणायला हवे. हे वाण खरेदी करण्यासाठी फार बजेट ही पाहावे लागत नाही. कारण त्यांची किंमत फार नाही. तुम्हाला अगदी उत्तम क्वालिटीचे हँड टॉवेल 50 रुपयांच्या घरात मिळून जातील.
हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड
स्कार्फ
तुम्हाला स्टायलिश गोष्टी द्यायला आवडत असतील तर तुम्ही स्कार्फ हा प्रकार देखील वाण म्हणून देऊ शकता. ही अशी गोष्ट आहे जी कधीही वापरता येते अगदी जुनी झाली तरी त्याचा वापर काही कमी होत नाही. उन्हात, बाईकवर किंवा हल्ली बाहेर जाताना प्रदुषणापासून संरक्षण करण्यासाठी अनेक जण स्कार्फ अगदी आवर्जून बांधतात. याचा खर्च तुम्हाला साधारण 50 ते 80 मध्ये एक स्कार्फ मिळेल.
किराणा साहित्य
हल्ली वाण हे असे देण्यात येते. जे प्रत्येकीला घरी पटकन वापरता येतील. म्हणूनच किराणा सामानातील अनेक वस्तू देण्याची हल्ली एक नवी पद्धतच सुरु झाली आहे. पण पाहायला गेलं तर ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे असेच म्हणायला हवं. रवा, मैदा, डाळी यांपैकी काहीही एक निवडून तुम्ही त्याचे पाव किलो किंवा तुम्हाला हवे तितके मोठे पाकिट बनवून हे देऊ शकते. हे असे वाण आहे जे मुळीच वाया जात नाही. त्यामुळे हे वाण द्यायलाही काहीच हरकत नाही
या व्यतिरिक्तही तुमच्याकडे काही भन्नाट आयडियाच असतील तर आम्हाला नक्की कळवा