साऊथच्या KGF च्या दुसऱ्या पार्टनेही सगळ्या चाहत्यांवर मोहिनी घातली. या चित्रपटाने 1 हजार कोटींच्या वर कमाई केली आहे. इतकेच नाही तर साऊथचे अनेक चित्रपट नेहमीच चांगली कमाई करतात. हिंदीमध्येही या चित्रपटांचे डबिंग करण्यास आलेले आहेत. त्यांनीही चांगली कमाई केली आहे. पण या चित्रपटांची निर्मिती हिंदीत का केली जात नाही? असा दमदार स्टोरी हिंदीत का तयार होत नाही? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे उत्तर आता करण जोहरने (Karan Johar) दिले आहे. असे चित्रपट जर बॉलिवूडने बनवले अते तर काय झाले असते या बद्दल करण काय म्हणाला चला घेऊया जाणून
आम्ही KGF बनवला असता तर…
करण जोहरने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे की, बॉलिवूड चित्रपटांवर अनेक मर्यादा येतात. आम्ही जर अशाप्रकारचा चित्रपट करायचा विचार केला असता तर आम्ही केलेल्या चित्रपटावर बॅन्ड आणण्यास आला असता. एवढ्या मोठ्या पडद्यावर गँगस्टरला हिरो दाखवताना आम्हाला अनेक नकारात्मक कमेंट्सना सामोरे जावे लागले असते. KGF मध्ये ज्या प्रमाणे संवाद आणि सीन दाखवण्यात आले आहे असे सीन बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवणे कठीण आहे. तो पुढे असेही म्हणाला की, साऊथ इंडस्ट्रीतील निर्मात्यांना स्वातंत्र्य आहे. तसे बॉलिवूड मेकर्सना अजिबात नाही. साऊथचे चित्रपट निर्मात्यांना या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. दु्दैवाने आम्हाला वाटत असूनही तो आनंद घेता येते नाही हे नियम कुठेतरी बदलण्याची फार गरज आहे. तरच हिंदीत असे चित्रपट तयार करता येतील. साऊथ इंडस्ट्रीचा मला अभिमान आहे. पण ही संधी आम्हालाही मिळायला हवी.
हिंदी चित्रपटांची कामगिरी चांगली नाही
गेल्या काही दिवसांपासून दमदार असा हिंदी चित्रपट अजिबात आलेला नाही. KGF 2 आल्यानंतर लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर धरले पण त्या तुलनेत हिंदी चित्रपटांना अजिबात पसंती दिली नाही. याचे कारण हिंदी चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी लव्हस्टोरी असाव्यात.बरेचदा हिंदी चित्रपटात कितीही ॲक्शन दाखवले तरी देखील ही स्टोरी जाऊन लव्हस्टोरीकडे इतकी जास्त रेंगाळते की, ते कोणालाही आवडत नाही. त्यामुळेच की काय हिंदी चित्रपट पडद्यावर अजिबात चालत नाहीत. त्यामुळेच की काय साऊथचे चित्रपट हिंदी डब होतात का याची प्रतिक्षा आता लोकांना असते.
पृथ्वीराज चित्रपट पडला
काहीच दिवसांपूर्वी ऐतिहासिक चित्रपट सम्राज पृथ्वीराज आला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार होता. मानुषी छिल्लर या चित्रपटातून पहिल्यांदाच चित्रपटात आली. उत्तम कथानक आणि माहीत असलेला इतिहास असून देखील सम्राट पृथ्वीराजच्या भूमिकेत दिसला. पण त्याचा अभिनय या कॅरेक्टरला अजिबात शोभणारा नव्हता असे अनेकांचे म्हणणे होते. आता येत्या काळात ब्रम्हास्त्र हा चित्रपट येणार आहे. त्याच्याकडून लोकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. पण या अपेक्षांना हा चित्रपट उतरेल की नाही ही देखील शंकाच आहे.
तुम्हाला काय वाटतं करण जोहरने KGF बनवला असता तर तो चित्रपट कसा झाला असता?