ADVERTISEMENT
home / Dry Skin
if your skin is already peeling off then try these home remedies FB

थंडीमुळे निघत असतील त्वचेचे पापुद्रे तर करा हे घरगुती उपाय

हिवाळ्यात वातावरणात वाढलेला कोरडेपणा त्वचा आणि केसांसाठी त्रासदायक ठरतो. हवा कोरडी आणि थंड असल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचे पापुद्रे निघू लागतात. बऱ्याचदा थंडीत ओठ, तळहात, नखांच्या जवळपासचा भाग, पायाच्या टाचाजवळच्या त्वचेचे पापुद्रे निघतात. त्वचा सोलली गेल्यामुळे त्या ठिकाणी जळजळ आणि दाह जाणवतो. कधी कधीतर अशा ठिकाणी त्वचेमधून रक्तही वाहू लागते. अशा वेळी कोरडी त्वचा मऊ होण्यासाठी काहीतरी घरगुती उपाय माहीत असायला हवेत. नाहीतर हिवाळा सहन करणे कठीण आणि त्रासदायक होऊ शकतो.

थंडीत त्वचेवर करा हे उपाय

घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही तुमच्या त्वचेला मऊ करू शकता. ज्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत आणि तुम्हाला लवकर आराम मिळतो.

मध

थंडीमुळे सोललेल्या त्वचेवर मध लावण्यामुळे चांगला आराम मिळू शकतो. कारण मधामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेचे पोषण होते. त्वचेला मऊपणा आल्यामुळे थंड हवेचा त्वचेवर परिणाम होत नाही आणि त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत. 

दूध 

दुधामुळेही त्वचेला चांगले पोषण मिळते. ज्यामुळे दुधाचा वापर तुम्ही थंडीत मॉइस्चराइझरसारखा करू शकता. त्वचेला मऊ करण्यासाठी नियमित दूध अथवा दुधाची साय लावा. दूध पिण्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. ज्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत.

ADVERTISEMENT

थंडीमुळे सुकलं असेल नाक तर करा हे उपाय

हायड्रेट राहा 

हिवाळ्याप्रमाणेच थंडीतही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. कारण हिवाळ्या पाणी कमी पिले जाते. यासाठी हिवाळ्यात जाणिवपूर्वक हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा. नियमित भरपूर पाणी प्या. पाणी पिण्याने जास्त थंडी वाजत असेल तर थोड्या वेळाने सतत कोमट पाणी प्या. ज्यामुळे थंडीचा त्रासही कमी होईल. या काळात गरम सूप पिण्याने शरीराला पुरेसे पाणी मिळू शकते.

थंडीमुळे दुखत असेल कान तर करा हे घरगुती उपाय

पेट्रोलियम जेली

थंडीत त्वचेचे पापुद्रे निघत असतील तर त्यावर उत्तम उपाय म्हणजे त्वचेवर पेट्रोलिअम जेली लावणे. कारण या जेलीमध्ये लोणी असतं ज्यामुळे त्वचा मऊ होतेच शिवाय त्वचेचं योग्य पोषणही होतं.रात्री झोपताना त्वचेवर पेट्रोलियम जेली लावल्यास चांगला फायदा होतो. 

ADVERTISEMENT

थंडीत खा डिंकाचे लाडू, आरोग्यासाठी आहेत उत्तम

कोरफड

थंडीपासून त्वचेचं रक्षण करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे त्वचेवर कोरफडाचा गर लावणे. कोरफड त्वचेसाठी पोषक असल्यामुळे हा गर लावण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. 

15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT