आपल्या सगळ्यांकडून काही ना काही चुका होत असतात. या चुकांची जाणीव झाली की, त्याची माफी आपल्याला मिळावी असे कोणाला वाटणार नाही. तुमच्या चुकांची माफी तुम्हाला मिळावी असे वाटत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फारच चांगला आहे. कारण आज 26 मे आज आहे अचला एकादशी. माता लक्ष्मीची आणि विष्णूची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर खास तुमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. अचला एकदशी किंवा अपरा एकदशी नेमकी काय आहे? या दिवशीचा पूजाविधी काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. सुख आणि शांति देणाऱ्या अचला एकादशीच्या या पूजाविधीविषयी घेऊया जाणून.
अचला एकादशी म्हणजे काय?
अचला एकादशी याला अपरा एकादशी असे देखील म्हटले जाते. अचला एकादशी संदर्भात एक कथा सांगितली जाते. पौराणिक दाखल्यानुसार असे सांगितले जाते की,महिध्वज नावाचा एक राजा होता. या राजाचा धाकटा भाऊ वज्रध्वज. राजाचा छाकटा भाऊ हा मोठ्या भावाला त्याचा शत्रू मानत होता. त्याने एकेदिवशी रागात मोठ्या भावाचा खूप केला. त्याला पिंपळाखाली पुरले. अशा पद्धतीने मारल्यामुळे मोठ्या भावाचा आत्मा हा भटकत होता. त्याला आपल्यावर झालेला अन्याय हा अजिबात पटत नव्हता. तो भूत बनून अनेकांना त्रास देत होता.
ज्यावेळी एका ऋषीमुनींना राजाच्या भूताबद्दल कळले त्यावेळी ते लगेच तिथे आले. त्याने त्या राजासोबत झालेला सगळा प्रकार ऐकला. राजाला प्रेत योनीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी अपरा एकादशीचे व्रत केले. त्यानंतर राजाचा आत्मा मुक्त झाला.एकादशीला जो उपवास केला त्याचे फळ त्यांनी राजाचा आत्मा मुक्त करुन दिले. राजाला त्याच्या दु:खातून मुक्तता दिली. त्यामुळे या दिवशी सगळ्या दु:खाचे निवारण होते असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी अगदी आवर्जून एकादशीचे व्रत करायला हवे.
असे करा अचला एकादशीचे व्रत आणि पूजाविधी
अचला एकादशी करुन आपल्या दु:खाचे निवारण करण्याचा विचार केला असेल तर तुम्हाला त्याचा पूजाविधी आणि त्या दिवसाचे व्रत कसे करायचे हे माहीत असायला हवे.
- अचला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ व्हा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
- देवघरात असलेल्या देवाला दिवा लावून मनोभावे पूजा करा.
- अचला एकादशीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेश, लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करा.
- तुमच्या घराजवळ एखादे मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा केली तरी देखील चालू शकेल.
- यंदा अचला एकादशी ही गुरुवारी आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला गुरु या ग्रहाची विशेष पूजा करायला हवी.
- अत्यंत शांतपणे तुम्ही ही पूजा करावी. कोणताही राग, लोभ मनात न ठेवता ही पूजा केली तर तुम्हाला त्याचा लाभ मिळण्यास मदत मिळेल.
- या दिवशी नैवेद्य काय देऊ असा विचार करत असाल तर तुम्ही बेसनाचा नैवेद्य नक्कीच करुन देऊ शकता.
आता अचला एकादशी यंदा नक्की करा आणि त्यापासून लाभ मिळवा.