ADVERTISEMENT
home / लग्नसराई
मुंडावळ्या आणि बाशिंग

लग्नात का बांधले जाते मुंडावळ्या आणि बाशिंग

 लग्नात नवरीला बांधल्या जाणाऱ्या मुंडावळ्या आणि बाशिंग यामुळे तिच्या रुपात भर पडते.  मुंडावळ्या आणि बाशिंग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. काही जणांकडे फक्त मुंडावळ्या असतात. तर काही जणांकडे बाशिंग बांधण्याची पद्धत आहे. बाशिंगाच्या डोक्यावर मोठा तुरा असतो. काही विशिष्ट लोकांकडेच हा बांधला जातो. मुंडावळ्या या थोड्या नाजूक असतात. त्या मोत्यांपासून आणि सोनसाखळीपासून बनवल्या जातात. तर बाशिंगाला एक वर तुरा असतो. त्यावर लक्ष्मी-नारायणाचे चित्र असते. त्याला देखील मुंडावळ्याप्रमाणे मोत्यांची सर असते. त्यामुळे त्या देखील चांगल्या उठून दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का लग्नात मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधले जाते.

मुंडावळ्या आणि बाशिंगमधील फरक

मुंडावळ्या

मुंडावळ्या आणि बाशिंगमधील फरक तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मुंडावळ्या आणि बांशिंगचा हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. मुंडावळ्यांचे प्रकार पाहता त्यामध्ये कपाळाला एक आडवी पट्टी येते. ती फुलांची, मोत्याची किंवा चैनची असते. त्या खाली लोंबकळणाऱ्या मोत्याच्या सरी असतात. त्याच्या शेवटी मोती किंवा गोंडा असतो. जो तोंडावर लोंबकळतो त्यामुळे तो अधिक छान दिसतो. बाशिंग हे थोडे मोठे असते. त्याच्या कपाळावरील पट्टीचा आकार हा एखाद्या मुकुटासारखा असतो. त्याच्यावर तुरा असतो. त्याच्या दोन कोपऱ्यांना मुंडावळ्यासारख्या सरी असतात. ज्या त्याला अधिक  सुंदर बनवत असता. काही ठराविक लोकांमध्ये मुंडावळ्या घालायची पद्धत आहे.

बाशिंग

मुंडावळ्या आणि बाशिंगाचे महत्व

लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग बांधण्याचे महत्व आहे. परंपरेने यामध्ये डिझायनर प्रकार आले असले तरी देखील त्यांचे महत्व काही बदललेले नाही. 

  1. मुंडावळ्या किवा बाशिंग बांधल्यानंतर नवरा किंवा नवरीच्या रुपाकडे पटकन लक्ष जात नाही. मुंडावळ्या आणि बाशिंग लक्ष वेधून घेतात. त्यामुळे त्यांना नजर लागत नाही. 
  2. लग्नात नवरा नवरी एका वेगळ्या भावनिकेतून जात असतात. मुलीला आनंद आणि दु:ख असे दोन्ही असते. त्यामुळे आधीच त्यांना ताण आलेला असतो. डोक्यावर पट्टी बांधल्यासारख्या मुंडावळ्या बसल्यामुळे डोकं शांत राहण्यास मदत मिळते. 
  3. असे देखील म्हणतात की, जागरणामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी त्या विशिष्ट जागी मुंडावळी बांधली जाते.  कपाळावरील पट्टी एक विशिष्ट जागी लावल्यामुळेच होणाऱ्या जागरणाच्या त्रासापासून मुक्ती मिळते.

लग्नकार्यात कधी बांधल्या जातात मुंडावळ्या

लग्नकार्य सुरु झाले की, मुंडावळ्या बांधल्या जातात. पण नेमके कोणत्या कार्यापासून मुंडावळ्या घातल्या जातात ते जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

1. लग्नात हळदीच्या दिवसापासून मुंडावळ्या बांधल्या जातात. खूप जणांकडे हळदीच्या दिवशी रुहीच्या फुलांच्या मुंडावळ्या लावल्या जातात तर काही ठिकाणी फुलांच्या देखील असतात. 

2. ज्यांच्याकडे बाशिंग बांधण्याची पद्धत आहे. त्यांच्याकडे मुलगा लग्नाच्या दिवशी बाशिंग घेऊन येतो. त्यावेळी मुलीला म्हणजे नवऱ्या मुलीला बाशिंग दिले जाते. 

आता ज्यांचे लग्न ठरले आहे त्यांना नक्की ही माहिती पाठवा

25 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT