कोणताही आजार, शारीरिक कमतरता जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडून प्रथम योग्य त्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करत असल्याने वेळीच आणि अचूक निदान होण्यास अडथळे निर्माण होतात. तुमच्या आरोग्याविषयी अथवा तुम्हाला होणा-या आरोग्यविषयक समस्यांचे जाणून घेत त्यांचे निदान करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्ताचा, मूत्राचा, शरीरातील इतर द्रवपदार्थाचा किंवा शरीराच्या ऊतींचा नमुना घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर, आपल्याला काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. अशावेळी घाबरुन न जाता चाचणीसाठी जाण्यापूर्वी काय करावे आणि करू नये याबाबत काही महत्त्वाच्या सूचना डॉ. प्रेरणा अग्रवाल, टेक्निकल ऑपरेशन व्यवस्थापक, अपोलो डायग्नोस्टिक्स, पुणे यांच्याकडून आम्ही जाणून घेतल्या. याबाबत आपण सर्वांनीच पालन करायला हवे. या सूचना नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
काय घ्यावी खबरदारी
प्रयोगशाळेत केल्या जाणा-या चाचण्या या विशिष्ट रोग किंवा स्थितीचे निदान किंवा तपासणी करण्यात मदत करू शकतात. स्क्रिनिंगमुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच रोगाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. इतर चाचण्यांमुळे एखाद्या तज्ज्ञाला एखाद्या आजाराचे निरीक्षण करता येईल किंवा रुग्णावर उपचार चालू आहे की नाही हे पाहावे लागेल. प्रयोगशाळेतील चाचणी देखील एखाद्या अवयव आणि शरीरातील व्याधीबद्दल आवश्यक असलेली माहिती देऊ शकते. परंतु, चाचणीसाठी जाण्यापूर्वी, तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्सचे पालन करावे लागते.
- तुमच्या डॉक्टरांशी केलेल्या चाचणीबाबत तुमच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणीपूर्वी काही ठराविक तासापर्यंत अन्नाचे सेवन न करणे आदींचे पालन करा जेणेकरुन अचूक निदानात मदत होईल
- वैद्यकीय रक्त तपासणीपूर्वी तुम्ही काहीही खाणे टाळावे
- चाचणीस जाण्यापूर्वी चरबीयुक्त आणि तळलेले अन्नपदार्थ खाणे टाळा तसेच 1-2 दिवस आधी अल्कोहोलचे सेवन टाळा
- चाचणीपूर्वी धूम्रपान करू नका
- दिवसाच्या वेळेनुसार एन्झाइम आणि संप्रेरक पातळी बदलू शकतात, जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला विशिष्ट वेळी जाण्यास सांगत नाहीत तोपर्यंत सकाळी 10:00 वाजता चाचणीसाठी जाण्याचा प्रयत्न करा
- कोणत्याही चाचण्या निवडण्यापूर्वी कोणतेही कठोर शारीरिक करू नका आणि तणावमुक्त रहा. चाचणीपूर्व 10-15 मिनिटे शांत बसणे आणि आराम करणे आवश्यक आहे. शिवाय, चाचणीनंतरही, तुम्हाला पुरेसे पाणी पिण्याची आणि अस्वस्थता निर्माण करणा-या शारीरीक क्रिया करणे टाळा
- तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांना न चुकता कळवा
- मसाज थेरपी किंवा फिजिओथेरपी नंतर रक्त तपासणी करु नका
- आवश्यक जीवनसत्त्वे आणि पूरक आहाराबाबत तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा
अनेक आजाराचे निदान होण्यासाठी लॅब टेस्ट आवश्यक असते. तुम्ही कोणताही आजार जितका अंगावर काढाल त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर अधिक होतात. त्यामुळे या महत्त्वाच्या टिप्स आणि सूचना तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमच्या कोणत्याही शारीरिक आजारांसाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही लॅबमधून करून घ्या. यामध्ये कोणतीही हयगय करू नका. तसंच लॅब टेस्टला जाताना तुम्ही तुमच्या दिलेल्या वेळा चुकवू नका. खाण्यापूर्वी अथवा खाण्यानंतर ज्या प्रकारे तुम्हाला टेस्ट लिहून दिल्या असतील त्याच्या सूचना योग्य पद्धतीने पाळूनच तुम्ही लॅब टेस्टसाठी योग्य आहे. जेणेकरून तुम्हाला योग्य आणि अचूक निदान मिळू शकते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक