प्रत्येकाला आपले केस काळेभोर आणि घनदाट असावे असं वाटत असतं. मात्र कामाची दगदग आणि वाढणारं प्रदूषण याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. ज्यामुळे आजकाल अनेकांना केस गळण्याचा त्रास जाणवतो. अचानक होणारा हा Hair Fall नेमका कशामुळे होतोय हे समजून घ्या. ज्यामुळे तुम्हाला केस गळणं थांबवणं शक्य होईल. केस गळण्याचा संबंध तुमच्या जीवनशैली, आरोग्य, आहार, केसांच्या इतर समस्या अथवा अगदी केस विंचरण्याची चुकीची सवय, वातावरणातील बदल असा कोणत्याही गोष्टीशी असू शकतो. मात्र असं असलं तरी आहारात काही विशिष्ट बदल करून तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच वाढवू शकता. मोठ्या मोठ्या Hair Fall ट्रिटमेंट घेऊन तुम्ही कंटाळला असाल तर आजपासून आहारात या पाच गोष्टी जरूर समाविष्ठ करा. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला बदल जाणवू शकेल.
Shutterstock
Hair Fall थांबविण्यासाठी या ‘5’ गोष्टी नियमित खाण्यास सुरूवात करा
1.अंडी –
केसांच्या योग्य पोषणासाठी तुमच्या शरीरात पुरेसे प्रोटिन्स आणि बायोटिन असणं गरजेचं आहे. या दोन गोष्टींंमुळे तुमचे केस गळणं केवळ थांबत नाही तर तुमचे केस लांबसडक आणि घनदाटही होऊ शकतात. यासाठीच दररोज अंडं खा. कारण अंड्यामध्ये प्रोटिन्स आणि बायोटिन दोन्हीही असतं. अंड्यामध्ये झिंक आणि सेलेनियमदेखील असतं. ज्यामुळे तुमच्या केसांचं योग्य पोषण होऊ शकतं. म्हणूनच जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर Hair Fall चा त्रास होत असेल तर आहारातून रोज एक अंड खाण्यास सुरूवात करा. ज्याचा सुपरिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर दिसून येऊ शकतो.
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपचारांबद्दल देखील वाचा
shutterstock
2. पालेभाज्या
पालेभाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. कारण घासफुस खाण्याची त्यांची मुळीच ईच्छा नसते. पण या ताज्या पालेभाज्या तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. एवढंच नाही तर त्यांच्यामुळे तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या समस्या सहज दूर होऊ शकतात. पालेभाजीमधील पालक भाजी तुम्ही नियमित खाणं गरजेचं आहे. कारण पालकमध्ये लोह, व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असतं. अशा प्रकारच्या पालेभाज्या खाण्यामुळे केवळ तुमचा Hair Fall थांबत नाही तर केसांचं आरोग्यही सुधारतं.
3. गाजर
गाजरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी,सी, डी आणि ई असतं.जे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरतं. नियमित गाजर खाण्यामुळे तुमचे केस गळणंदेखील कमी होऊ शकतं. गाजरामधील पोषक घटकांमुळे केस कमकुवत होणं, केसांना फाटे फुटणं, केस कोरडे आणि निस्तेज होणं कमी होतं. ज्यामुळे तुमचे केस कमी गळतात आणि घनदाट दिसतात. गाजरामधील व्हिटॅमीन सी मुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. ज्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते.यासाठीच Hair Fall थांबविण्यासाठी नियमित गाजर खाण्यास सुरूवात करा.
shutterstock
4. अक्रोड
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. चेहरा आणि केसांना आठवड्यातून एकदा अक्रोडाचे तेल लावल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा दिसून येईल. पण एवढंच नाही तर नियमित अक्रोड खाल्लास तुमचा Hair Fall कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, मॅग्नेशियम आणि बायोटिन असते. ज्याचा तुमच्या केसांवर चांगला परिणाम दिसून येतो.
5.ओट्स
ओट्स फक्त वजन कमी करण्यासाठी अथवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खाणं गरजेचं आहे असं मुळीच नाही. कारण ओट्स खाण्याचा तुमच्या त्वचा आणि केसांवरदेखील चांगला परिणाम दिसून येतो. ओट्समध्ये झिंक, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि लोह असते. ज्यामुळे तुमचे केस काळे आणि घनदाट होतात आणि Hair Fall हळू हळू कमी होत जातो.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा
‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक