अल्सरचा त्रास हा पचनसंस्थेशी निगडीत असल्यामुळे त्याचे निदान पटकन होत नाही. जेव्हा अल्सरचा वारंवार त्रास होतो तेव्हा त्यावर उपचार केले जातात. जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल अथवा पोटात दुखत असेल तर याबाबत वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. कारण पोटाचा अल्सर खूप त्रासदायक असतो. अशी वेळी आतड्यांची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं असतं. कारण अल्सर म्हणजे पचनमार्ग अथवा आतड्यांना झालेली जखम असते. योग्य आहार घेतल्यास अल्सरचा त्रास नक्कीच कमी करता येतो.
अल्सरवर करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Ulcer In Marathi)
अल्सर दूर करण्यासाठी खा हे पदार्थ
तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. कारण खाल्लेल्या पदार्थांपासून आतड्यांमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिड निर्माण होते. ज्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत होते. मात्र अन्न योग्य पद्धतीने न पचल्यास हा रस आतड्यांमधून वर येतो आणि छाती अथवा गळ्याजवळ जळजळ होते. ज्याचा तुमचे दात, श्वास आणि गळ्यावरही परिणाम होतो. तोंड येणे, पोट दुखणे, तोंडाला घाणेरडा वास येणे असा त्रास यामुळे होऊ लागतो. यासाठी वेळीच तुमच्या आहारकडे योग्य लक्ष द्या.
दही
अल्सर असलेल्या लोकांच्या आहारात दही असणं गरजेचं आहे. दह्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होतो. छाती अथवा पोटात होणारी जळजळ यामुळे कमी होते. दही उत्तम प्रोबायोटिक असल्यामुळे तुमच्या पोटातील अन्नाचे योग्य पचन होते. शिवाय दह्यातील चांगले बॅक्टेरिआ इनफेक्शनपासून तुमचं संरक्षण करतात. तसंच वाचा तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे घरगुती उपाय | Tondachi Durgandhi Upay
तुळशीची पाने
तुळशीला धार्मिक महत्त्व आहेच. शिवाय ती एक औषधी वनस्पतीही आहे. तुळशीमधील औषधी गुणधर्माचा वापर अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. यासाठी आयुर्वेद शास्त्रात नियमित तुळशीची पाने चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे शरीर निरोगी आणि निर्जंतूक राहते. तुळशीमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असल्यामुळे तुळशी पाने अथवा रस घेण्यामुळे तुमचा अल्सर बरा होऊ शकतो.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या खाणं निरोगी जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण या भाज्यांमध्ये अॅंटि अल्सर गुणधर्म असतात. हिरव्या आणि ताज्या भाज्या खाण्यामुळे पोटातील जखमा भरून निघतात. यासाठी नियमित पालक, मेथी, चवळी, मुळा अशा हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. यासोबतच वाचा पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Stomach Pain In Marathi)
कोरफडाचा रस
अल्सरमुळे पोटात झालेल्या जखमा भरून निघण्यासाठी अशा रुग्णांनी कोरफडाचा रस घ्यावा. आयुर्वेदात कोरफडाचा रस हे एक बहुगुणी औषध मानले जाते. कारण त्यामुळे तुमचा अल्सरही लवकर बरा होऊ शकतो. मात्र शक्य असल्यास कोरफडाचा ताजा रस घ्या.
फळांचा रस
अल्सरवर उपचार करण्यासाठी फळांचा रस दिला जातो. कारण फळांमधील पोषक तत्त्वांमुळे तुमच्या पोटातील अल्सर लवकर बरा होतो. यासाठी नियमित लिंबू, संत्री, मोसंबी, निरनिराळ्या प्रकारच्या बेरीज अशा फळांचा रस घ्यावा. फळांच्या रसामुळे आतड्यांमधील जखमा लवकर बऱ्या होतात आणि आतड्यांचा दाह कमी होतो. फळांसोबत गाजर, ब्रोकोली अशा भांज्यांचा रसही अवश्य घ्यावा.
अल्सर झाल्यास खाऊ नये
अल्सरवर काय खावे त्याचप्रमाणे काय खाऊ नये हे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण चुकीचा आहार घेतला तर तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. यासाठी अल्सर असलेल्या लोकांनी चहा, कॉफी, चॉकलेट मुळीच खाऊ नये. अशा लोकांनी धुम्रपान अथवा मद्यपान केल्यास खूप दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात.
आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक