बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे वंधत्वाची समस्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, काही औषधे, मादक पदार्थांचा गैरवापर, व्यायामाचा अभाव अथवा अतिरेक आणि कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन हे देखील वंधत्वास कारणीभूत ठरत आहे. जोडप्यांमधील प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि कोणत्याही अडचणीशिवाय गर्भधारणा करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे.
वंध्यत्व म्हणजे जेव्हा एखादं जोडपं प्रयत्न करूनही वर्षभर गर्भधारणा करण्यास अयशस्वी ठरते. असे बरेच घटक आहेत जे एखाद्याच्या प्रजननक्षमतेला हानी पोहोचवू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे चूकीची जीवनशैली. जे पुरुष आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या सर्वच पैलूंवर परिणाम करते. वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक म्हणजे मद्यपान तसेच धुम्रपानाचा अतिरेक, लठ्ठपणा, तणाव, उशीराने लग्न होणे, कुटुंब नियोजनात उशीर होणे हे आहेत. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस, ल्यूटिनिझिंग हार्मोन (एलएच)/ फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) सारख्या संप्रेरकांशी संबंधित जन्मजात समस्या किंवा गर्भाशय, फॅलोपियन ट्युब निकामी होणे यासारख्या अवस्थेमुळे देखील वंधत्वासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
अधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या
तज्ज्ञांचे म्हणणे नेमके काय आहे?
पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिश्मा डाफळे यांनी सांगितले की, “जोडप्याने सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण, लठ्ठपणा पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेशी संबंधित आहे आणि अनेक लठ्ठ स्त्रियांना पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) झाल्याचे निदान होते. जास्त वजनामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कार्यात अडथळे येऊन वंध्यत्वासारखी समस्या निर्माण होते. व्यायामाचा अतिरेक आणि विविध औषधे घेतल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. तंबाखूतील कॅडमियम आणि निकोटीन विषाणू शुक्राणूंची गुणवत्ता आणि अंड्याचे उत्पादन (एएमएच पातळी) कमी करतात. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात त्यांना लवकर रजोनिवृत्ती, गर्भपात आणि बाळाला जन्मजात दोष होऊ शकतो, पुरुषांमध्ये शुक्राणू डीएनएचे नुकसान वाढते ज्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. धूम्रपान फॅलोपियन नलिकाच्या आत असलेल्या सिलीयाला नुकसान होते (जे अंड्याचे आणि/किंवा गर्भाशयात फॅलोपियन नलिकासह गर्भाशयात नेण्यासाठी महत्वाचे आहे). गर्भनिरोधकांचा अतिवापर टाळावा.”
पुण्यातील कन्सिव्ह आयव्हीएफच्या स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ माधुरी रॉय सांगतात, मध्यपानाचे सेवन केल्याने सेमिनल क्वालिटी कमी होते, टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि वीर्याचे प्रमाण कमी होते. शुक्राणूंची संख्या कमी होते. स्त्रियांमध्ये, यामुळे हार्मोनल असंतुलन, ओव्हुलेशन किंवा लवकर रजोनिवृत्ती होते. पस्तीशीनंतर कुटुंब नियोजन करणे, कामाचे वाढते तास, एंडोमेट्रिओसिस आणि अकाली गर्भाशयाच्या कार्यात अडथळे येणे हे प्रजनन क्षमता कमी करते. उच्च रक्तदाब शुक्राणूंचा आकार बदलू शकतो. तणाव आणि चिंता हार्मोन्सच्या पातळीवर आणि मासिक पाळीवर परिणाम करतात. तणावामुळे निर्माण होणा-या कोर्टिसोल संप्रेरकामुळे प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम होतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी ही स्त्री बीज आणि शुक्राणू दोन्हीसाठी हानिकारक असू शकतात. जंक फूडचे सेवन टाळा आणि मार्गरीन आणि वनस्पती तेलांसारख्या ट्रान्स फॅट्सचे सेवन टाळा, ज्यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ज्यांनी काही औषधे घेतली आहेत त्यांनी प्रजननक्षमतेवर त्यांच्या प्रभावाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक वाचा – जोडप्याने सरोगसीचा पर्याय नक्की कधी वापरावा, जाणून घ्या
धुम्रपान आणि अल्कोहोल टाळावे
“वंध्यत्वाशी झुंजणाऱ्या महिला आणि पुरुष योग्य वजन राखण्यासाठी नियमित व्यायाम करू शकतात. हे ओव्हुलेशन, प्रजनन प्रक्रिया वाढवेल आणि शुक्राणूंची गुणवत्ता राखण्यास मदत करेल. रात्री चांगली झोप घ्या कारण झोप कोर्टिसॉलची पातळी कमी करते जे टेस्टोस्टेरॉन कमी करते. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळले पाहिजे असेही डॉ. करिश्मा यांनी स्पष्ट केले आहे. योग्य ओव्हुलेशन आणि निरोगी शुक्राणूंसाठी भरपूर फायबर, बीन्स, गडद हिरव्या पालेभाज्या खा. ट्रान्स फॅट्स, अत्यंत प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा आणि साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फोलिक एसिड, व्हिटॅमिन ई, डी आणि लोह पूरक आहार घ्या, योग आणि ध्यान यांसारख्या विश्रांती तंत्रांचा वापर करून तणावमुक्त राहण्याचा सल्ला डॉ माधुरी यांनी दिला.
कमी शुक्राणूंची संख्या, प्रदीर्घ किंवा अनियमित मासिक पाळी लवकर मूल्यांकनासाठी प्रजनन तज्ञाचा सल्ला घ्या. लग्नाच्या एक वर्षानंतर गर्भधारणा करण्यात अपयशी ठरलेल्या जोडप्यांना आणि 35 वर्षानंतर कुटुंब सुरू करण्याची योजना करणाऱ्या महिलांना त्यांच्या प्रजननक्षमतेची तपासणी करून त्यांच्यासाठी योग्य एआरटी उपचार समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या मोठ्या संख्येने जोडपे इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) निवड करत आहेत, हे एक लोकप्रिय तंत्र आहे ज्यात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू एकत्र करून गर्भ तयार केले जातात. स्त्रीचे निदान आणि वयानुसार, गर्भ किंवा भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.
अधिक वाचा – क्षयरोगामुळे प्रजननास येतोय अडथळा, काय आहे तथ्य तज्ज्ञांचा सल्ला
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक