ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
कोरोनामुळे भारतीयांना मिळत आहेत सोशल डिस्टन्सिंगचे धडे

कोरोनामुळे भारतीयांना मिळत आहेत सोशल डिस्टन्सिंगचे धडे

संपूर्ण भारतात 21 दिवसांचं लॉकडाऊन आहे. या काळात कोरोनापासून बचावासाठी अनेक नव्या गोष्टी भारतीय नव्याने शिकत आहेत. एरवी गाडीत चढणं असो वा अगदी केमिस्टकडून सामान घेणं असो यासाठी गर्दी करणारे भारतीय आज बदल करण्यासाठी सज्ज आहेत. जसं कोरोना टाळण्यासाठी घरीच राहणे आणि बाहेर न पडणे, वर्क फ्रॉम होमचा जुना पर्याय वर्क कल्चरमध्ये नव्याने रूजू होतोय. त्यातच महत्त्वपूर्ण मानलं जात आहे सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग यासाठी महत्त्वाचं आहे कारण सध्या कोरोना व्हायरसचा जगभरात वाढत असलेला धोका आहे. त्याला हरवण्यासाठी जगभरात सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन आणि सेल्फ आयसोलेशन करण महत्त्वाचं आहे. ट्वीटरवर सध्या सोशल डिस्टन्सिंगचे फोटो ट्रेंड करत आहेत.

काय आहे सोशल डिस्टन्सिंग

आपल्यात आणि समोरच्या व्यक्तीत एक हाताचं अंतर असणं आवश्यक आहे. म्हणजेच जर तुम्ही घराबाहेर पडलात तर लोकांपासून एक हात लांब राहा. कारण घरासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांना बाहेर पडाव लागतच आहे. त्यामुळे बाहेर पडल्यावर महत्त्वाचं आहे ते सोशल डिस्टन्सिंग.

याला म्हणतात सोशल डिस्टन्सिंग

डॉ. के के रामचंद्रन यांनी बाजारातील भाजी खरेदी करताना करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा हा फोटो. आपल्याकडे बाजारात भाजी घ्यायला गेल्यावर ओरडणारे भाजीवाले आणि एकमेकांना चिकटून उभे राहणारे ग्राहक हे सामान्य चित्र कोरोनाने बदलून टाकलं. पाहा या फोटोत कसे आखलेल्या चौकोनात उभं राहून लोकं भाजी घेत आहेत.

वर्क फ्रॉम होम होण्यासाठी टिप्स (Tips For Work From Home In Marathi)

ADVERTISEMENT

पोलीस करून घेत आहेत प्रॅक्टीस

मुंबईत तर चक्क पोलिसांकडून #socialdistancing ची प्रॅक्टीस करून घेत आहेत. अंधेरीतल्या एका किराणा मालसमोरचा हा एएनआयने शेअर केलेला फोटो.

या सर्व गोष्टींवर पोलिसांकडूनही काटेकोरपणे लक्ष ठेवलं जात आहे. आंध्रप्रदेशमधील बाजारातला हा बोलका फोटो. 

हा गोल आहे सुरक्षेचा

सुरभी यांनी शेअर केलेल्या फोटोत म्हटलं आहे की, सर्वांनी समजण्याची गरज आहे की, हा सुरक्षेचा वर्तुळ आहे रांगोळीचा नाही. जर तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्हाल अशा प्रकारे काढलेलं वर्तुळ दिसल्यास त्याचं पालन करा.

एटीएमबाहेरही शिस्तपूर्ण लाईन

आसाम पोलिसांनी एटीएम बाहेरील रांगेचा शेअर केलेला हा फोटो. खरंतर आपल्याकडे नेहमीच एटीएमच्या इथे एका माणसालाच एका वेळी आत जाण्याची परवानगी असते. पण ते कधीच फॉलो केलं जात नसे पण आज कोरोनामुळे परिस्थिती बदलत आहे.

ADVERTISEMENT

लक्षात घ्या लॉकडाऊनमध्ये गरजेच्या आणि आवश्यक सर्व वस्तू मिळणारच आहेत. पण वारंवार त्या आणण्यासाठी घराबाहेर पडू नका. जेव्हा खरोखरच गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. विनाकारण घराबाहेर पडू नका. कारण यामुळे ना फक्त तुम्ही स्वतःचा तर तुमच्या घरच्यांचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत आहात.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

हेही वाचा –

ADVERTISEMENT

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी

CoronaVirus: चित्रीकरण बंद असूनही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार वेतन

26 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT