ADVERTISEMENT
home / मनोरंजन
क्रिकेटर रोहित शर्माचं आपल्या परीसाठी रॅप, व्हिडिओ झाला व्हायरल

क्रिकेटर रोहित शर्माचं आपल्या परीसाठी रॅप, व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या आपल्याकडे आयपीएल- IPL (इंडियन प्रीमियर लीग- Indian Premiere League) ची धूम सुरु आहे. फक्त क्रिकेटचे चाहतेच नाही तर जगभरातील लोकांना आयपीएलची क्रेझ आहे. विविध टीममधील वेगवेगळ्या क्रिकेटर्सचे अनेक चाहते आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळी टीम ठरलेली असते. आपण नेहमीच सोशल मीडियावर या क्रिकेटर्सचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. पण यामधील क्रिकेटरबरोबर एक छान परी आहे. हा व्हिडिओ आहे क्रिकेटर रोहित शर्मा आणि त्याच्या छोट्या परीचा अर्थात समायराचा. रोहित समायराला मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी एक रॅप गाणं ऐकवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून मीडियावर या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

छोट्या परीला आवडलं बाबाचं रॅप साँग

लोकप्रिय क्रिकेटर रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्स वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा आपली परी समायराला एक रॅप साँग म्हणून दाखवताना दिसतोय. नुकत्याचा आलेल्या रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’मधील हे गाणं रोहित आपली तीन महिन्याची मुलगी समायराला म्हणून दाखवत आहे आणि त्याची मुलगी हे गाणं मजेत ऐकताना दिसत आहे. समायरा अतिशय गोड असून रोहितचा तिच्यावर जीव असल्याचंही या व्हिडिओमधून जाणवत आहे. ही पोस्ट शेअर करत रितीकाने लिहिलं, ‘मी गरोदर असताना पूर्ण 9 महिने माझ्या मुलीला मोझार्ट गाणी (बाळांची गाणी) ऐकवली आणि आता ही गली बॉय गाण्याचा आनंद घेत आहे.’

सगळ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात गली

क्रिकेटर रोहित शर्मा आणि रितिका सजदेहची मुलगी समायराचा जन्म 31 डिसेंबर 2018 ला झाला आहे. रोहितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करत खास गोष्ट सांगितली की, ‘आपल्या सगळ्यांमध्ये थोडाफार गली असते.’ गली बॉयची सर्व रॅप गाणी आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) चा अभिनय या सगळ्याची प्रेक्षकांनी वाहवा केली होती. ही सर्व गाणी रणवीरने स्वतः गायली होती आणि या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. हा व्हिडिओ पाहून रोहित रणवीर आणि त्याच्या रॅप गाण्यांचा चाहता असावा असं दिसत आहे. इतकंच नाही तर त्याची लहान मुलगीही हे गाणं खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

ipl-cricketer-rohit-sharma-sings-ranveer-singh-gully-boy-rap-for-daughter

ADVERTISEMENT

बिग बी ने देखील केलं कौतुक

बॉलीवुडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोणती गोष्ट आवडली तर ते नेहमीच त्या गोष्टीचं कौतुक करत असतात. रोहित शर्माचं रॅप ऐकल्यानंतरही अमिताभ बच्चन यांनी त्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘टू क्यूट’ अशी कमेंट त्यांनी पोस्ट केलं आहे.

याचा अर्थ नक्कीच रोहितची ही मेहनत सफल झाली आहे. केवळ त्याच्या मुलीलाच नाही तरत अमिताभ बच्चन यांनाही त्याचा हा व्हिडिओ आवडला आहे. त्यामुळे रोहित फक्त आपल्या क्रिकेटनेच सर्वांची मनं जिंकून घेत नाहीये तर आपल्या गाण्यानेदेखील तो मन जिंकून घेत आहे. रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून पहिल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सना हार मानावी लागली आहे. पण पुन्हा एकदा नव्या जोमाने ही टीम उभी राहील असा विश्वास चाहत्यांना नक्कीच आहे. 

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा – 

ADVERTISEMENT

Good News: बच्चन कुटुंबात पुन्हा नवी खुषखबर, ऐश्वर्या पुन्हा प्रेगनंन्ट

Good News: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रेगनंन्ट, फोटो झाले व्हायरल

First Look : ‘छपाक’ मध्ये अशी दिसणार दीपिका पदुकोण

24 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT