बॉलीवूडचा अतिशय धुरंधर असणारा अभिनेता इरफान खान याची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी इरफानने मुंबईच्या कोकिलाबेन अंंबानी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. कोलन इन्फेक्शनमुळे त्याला एक दिवसापूर्वी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरल्याने संपूर्ण बॉलीवूडवर दुःखाची अवकळा पसरली आहे. काहीच दिवसापूर्वी ‘अंग्रेजी मीडियम’ मधून इरफान प्रेक्षकांच्या शेवटच्या भेटीला आला आणि त्यातही आपली छाप कायमची प्रेक्षकांच्या मनावर सोडून गेला. इरफानची तब्बेत अतिशय गंभीर झाली होती. त्यातही त्याने शेवटपर्यंत मृत्यूशी झुंज दिली.
शूजित सरकारेने दिली निधनाची बातमी
My dear friend Irfaan. You fought and fought and fought. I will always be proud of you.. we shall meet again.. condolences to Sutapa and Babil.. you too fought, Sutapa you gave everything possible in this fight. Peace and Om shanti. Irfaan Khan salute.
— Shoojit Sircar (@ShoojitSircar) April 29, 2020
दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान खानच्या दुःखद निधनाची बातमी दिली. त्याने ट्विट करून लिहिले, ‘माझा जिवलग मित्र इरफान, तू लढलास आणि सतत लढलास. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल. आपण पुन्हा नक्कीच भेटू, सुतापा आणि बाबील दोघांनाही या दुःखात लढण्यासाठी बळ मिळू दे. तुम्हीदेखील लढाई लढलात. सुतापा या लढाईत तुला जितकं काही करता आलं तू केलंस. ओम शांती, इरफान खानला सलाम’. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आता इरफानला श्रद्धांजली वाहत आहेत.
शहनाजला झेलणे फारच कठीण, पारस छाबडाने केले विधान
चाहत्यांना बसला धक्का
बॉलीवूडच्या प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असणारा इरफान खान याची अचानक अशी एक्झिट झाल्याने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर झाला. त्यानंतर त्याच्यावर उपचार चालू होते. यातून बरा होऊन इरफान पुन्हा भारतात आला आणि त्याने चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले. पण हा चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट ठरेल असा कोणालाही अंदाज नव्हता. आपण पुन्हा परत येत असल्याचा सकारात्मक व्हिडिओदेखील इरफानने पोस्ट केला होता. मात्र प्रमोशनच्या वेळी पुन्हा एकदा त्याची तब्बेत बिघडली. त्यामुळे प्रमोशनमध्ये इरफान सहभागी झाला नव्हता.
अभिनेत्री इशा गुप्ताही चढणार लवकरच बोहल्यावर, नात्यात असल्याची कबुली
दोनच दिवसांपूर्वी झाले आईचे निधन
गेल्या काही वर्षांंपासून इरफान खानची आई सईदा यांची तब्बेत ठीक नव्हती. त्या 95 वर्षांच्या होत्या. राजस्थानमधील टोंकमधील नवाब खानदानामध्ये जन्म घेतलेल्या सईदा यांनी जयपूर या ठिकाणी आपला अंतिम श्वास घेतला. त्यावेळीही आपल्या आईचे शेवटचे दर्शन इरफानने आपल्या बिघडलेल्या तब्बेतीमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतले होते.
अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर, आईचे अंतिम दर्शन घेणं झाले नाही शक्य
इरफानने लिहिली होती भावनिक पोस्ट
— Irrfan (@irrfank) April 3, 2019
इरफानने याआधीदेखील आपल्या तब्बेतीत होणाऱ्या सुधारणेसाठी चाहत्यांचे आभार मानले होते. इरफान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपला फोटो पोस्ट करून एक भावनिक पोस्ट लिहिली. इरफानवर उपचार झाल्यानंतर हा पहिलाच फोटो पोस्ट करण्यात आला होता. यावर इरफानने लिहिलं, ‘जिंकण्याच्या शर्यतीत आपण बऱ्याचदा आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं आहे विसरून जातो. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हाच आपल्याला या गोष्टीची जाणीव होते. मी आयुष्यातील हे कठीण क्षण आता मागे ठेऊन आलोय. तुमच्या प्रेम आणि तुम्ही दिलेल्या साथीबद्दल मी तुमचा खूपच आभारी आहे. तुमच्या प्रार्थनांमुळेच मी ठीक होऊ शकलो. मी आता परत आलोय आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानत आहे’ यानंतरच त्याने अंग्रेजी मीडियम चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आणि पुन्हा उपचारासाठी रवाना झाला. मात्र लॉकडाऊनमुळे आता त्याला आपल्या आईच्या अंतिम दर्शनासाठी येणेही शक्य झाले नाही. मात्र आता सर्व काही शमले आहे. एक प्रतिभावान अभिनेत्याला बॉलीवूड मुकले आहे.