ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
एस एस राजमौलीवर नाराज आहे का आलिया भट, नेमकं काय बिनसलं

एस एस राजमौलीवर नाराज आहे का आलिया भट, नेमकं काय बिनसलं

एस एस राजमौलीचा बहुचर्चित आरआरआर (RRR) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. विशेष म्हणजे या साऊथ चित्रपटात बॉलीवूडचे आलिया भट आणि अजय देवगण हे स्टारही आहेत. आलियाने इतर स्टार्ससोबत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हिरीरीने भाग घेतला. ती प्रत्येक ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात होती. मात्र आता अचानक आलिया निर्माता एस एस राजमौलीवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.यासाठी तिने एस एस राजमौलींना इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केल्याची चर्चा आहे. एवढंच नाही म्हणे तिने या चित्रपटाबाबत असलेल्या सर्व पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केल्या आहेत. जाणून घेऊ या नेमकं असं काय घडलं की इतकी उखडली आलिया भट

एस एस राजमौलीवर का नाराज आहे आलिया

आलिया भट्ट ने इतर कलाकारांसोबत आर आर आरचं खूप प्रमोशन केलं. या चित्रपटासाठी ती तेलुगू शिकली होती आणि प्रमोशन दरम्यान ती चक्क तेलुगूमध्ये संवाद साधत होती. मात्र आता ती निर्मात्यावर नाराज आहे. कारण तिला या चित्रपटात फायनल एडिटनंतर जास्त स्पेस मिळालेली नाही. तिला खूप कमी वेळ चित्रपटात दाखवण्यात आल्यामुळे तिला राग आल्याचं म्हटलं जात आहे.ज्यामुळे तिने चक्क सोशल  मीडियावरून या चित्रपटाच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत आणि एस एस राजमौलीला अनफॉलो केल्याची चर्चा आहे.

काय आहे सत्य

आलिया भटने एस एस राजमौली यांना अनफॉलो केल्याची चर्चा अफवा असण्याची शक्यता आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाने असं काहिच केलेलं नाही.आजही ती एस एस राजमौली यांना फॉलो करत आहे.एवढंच नाही तर आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीत आरआरआरचं एक पोस्टर शेअर केलं आहे.या पोस्टरमध्ये ती राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत दिसत आहे.आलियाची ‘आरआरआर’ हा पहिलाच साऊथ चित्रपट आहे. या चित्रपटातून तिने टॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आरआरआरमध्ये आलियाने सीताची भूमिका साकारली आहे. आलिया या चित्रपटात खूप कमी वेळ दाखवण्यात आलं आहे हे मात्र सत्य आहे. ज्यामुळे आलियाचा दमदार अभिनय आणि सक्षम भूमिका यात नाही. आलियाला चित्रपट करताना याची नक्कीच कल्पना असणार, मात्र या चित्रपटातून तिचं एस एस राजमौलीसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मात्र चित्रपटातील छोटी भूमिका पाहून आलियाचे चांगलेच दुखावले आहेत. आलिया या कारणामुळे निर्मात्यावर रागवली आहे का याचं उत्तर मात्र आलिया स्वतःच देऊ शकते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT