ADVERTISEMENT
home / आरोग्य
कोविड लसीकरणानंतर शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे का, तज्ज्ञांचे मत

कोविड लसीकरणानंतर शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे का, तज्ज्ञांचे मत

कोविड लसीकरणाचा (covid vaccination) तिसरा टप्पा सुरू झाला आहे. 18 – 44 वयोगटातील नागरिकांना लस सध्या देशभरात देण्यात येत आहे. या लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यामधील एक प्रश्न म्हणजे कोविड लसीकरण झाल्यावर शारीरिक संबंध (Sex) ठेवणे योग्य आहे का? असे करणे सुरक्षित ठरू शकते का? शारीरिक संबंध हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. ही एक भावना आहे. पण याबाबत किमान सध्यातरी आरोग्य मंत्रालयाकडून कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. पण अनेक चिकित्सक आणि तज्ज्ञांनी मात्र याबाबात आपले मत व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते कोविड लसीकरणानंतर शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे की नाही ते आपण जाणून घेऊ. लसीकरण घेतल्यानंतर किमान दोन दिवस तरी आराम करणे आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे ही मूलभूत माहिती सगळ्यांनाच आहे. पण साधारण किती दिवस शारीरिक संबंध येऊ नये अथवा किती दिवसांनी सेक्स करू शकतो हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे. याबाबतच काही महत्त्वाची माहिती. 

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला

Shuttestock

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे या लसीकरणाचा परिणाम हा दीर्घकालीन आहे अथवा शारीरिक संबंधानंतर याचा कोणता परिणाम होतो अथवा नाही होत याबाबत अजूनही काही ठोस सांगणे शक्य नाही. अशा स्थितीत शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणेच योग्य आहे. तसंच सुरक्षित उपाय वापरून मगच सेक्स करावा. काही काळासाठी तुम्ही शारीरिक संबंध टाळणेच योग्य आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. यादरम्यान सेक्स करताना किमान तीन महिने तरी लस घेतल्यानंतर इंटिमेट रिलेशनदरम्यान (intimate relation) कंडोम (condom) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच पुरूषांनी किमान तीन महिने तरी आपले स्पर्म (Sperm) डोनेट करू नये असाही सल्ला देण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

करावा हा उपाय

करावा हा उपाय

Shutterstock

या बाबतीत योग्य आणि ठोस अशी काहीच माहिती नाही. त्यामुळे सुरक्षा म्हणून पर्याय सुचविण्यात येत आहेत. लसीकरण झाल्यावर जर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर कंडोमचा वापर करणे योग्य आहे. हे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसंच लसीकरणाचा दुसरा डोस (2nd dose of vaccination) घेतल्यानंतर साधारण 2-3 आठवड्यापर्यंत जोडप्यांनी गर्भनिरोधकाचा वापर करणे हादेखील उत्तम पर्याय असल्याचे सुचविण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

कोविड लसीकरणाबाबत वाटतेय मनात शंका… मग हे नक्कीच वाचा

महिलांनी जास्त काळजी घ्यावी

ज्या महिलांनी लसीकरण केले आहे अथवा करण्यासाठी जाणार आहेत त्यांनी आपल्या स्त्री रोगतज्ज्ञांशी एकदा चर्चा करावी आणि सल्ला घ्यावा. सर्व महिलांची शारीरिक स्थिती आणि आरोग्याचा स्तर हा वेगवेगळा असतो. त्यामुळे लसीकरणाचा वेगवेगळा परिणाम दिसून येतो. याबाबत अधिक माहिती अजूनही प्राप्त नाही. शासनाकडून केवळ गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लसीकरण न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. त्यामुळे अन्य महिलांनी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे योग्य आहे. 

समजून घ्या लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी

कोरोना व्हायरस (coronavirus) स्थितीत शारीरिक संबंध

कोरोना व्हायरस (coronavirus) स्थितीत शारीरिक संबंध

ADVERTISEMENT

Freepik

एका शोधानुसार कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीमध्ये सीमेन जास्त राहात नाहीत असं समोर आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या जोडीदाराला कोणताही धोका नसतो असं सांगण्यात आलं आहे. चीनमधील वुहानमध्ये (Wuhan) करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोविड – 19 बाधित रूग्णांवर हा अभ्यास करण्यात आला होता. मात्र या शोधात केवळ 34 जण समाविष्ट होते. त्यामुळे यावर अधिक शोधाची गरज आहे. काही तज्ज्ञांच्या मते मात्र लसीकरण केल्यानंतर किमान तीन महिने शारीरिक संबंध ठेवणे योग्य नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Surveyकोविड लसीकरणाबाबत वाटतेय मनात शंका… मग हे नक्कीच वाचा
मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT