ADVERTISEMENT
home / आयुष्य
ईशा अंबानीचा लग्नाआधीच्या पूजेतील ‘सुंदर’ लुक

ईशा अंबानीचा लग्नाआधीच्या पूजेतील ‘सुंदर’ लुक

तुळशीचं लग्न जसं पार पाडलं तसं सेलेब्सच्या लग्नसराईलाही सुरूवात झाली आहे. यंदाच्या मोस्ट हॅपनिंग आणि मोस्ट अवेटेड लग्नापैकी एक असलेल्या ईशा अंबानीचं (Isha Ambani) लग्नही काही दिवसांवर येऊन ठेपलंय. त्यामुळे लग्नाआधीच्या कार्यक्रमांना शानदार सुरूवात झाली आहे. हो… नुकतीच अंबानींच्या अॅंटीलिया या घरी ग्रहशांती पूजा पार पडली आणि अपेक्षेपेक्षाही जास्त सुंदर अशा पारंपारिक लूकमध्ये इशा अंबानी दिसली. बिझनेस वुमन ईशा अंबानी आपला मित्र अानंद पिरामल ह्याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. त्यांच्या लग्नाआधी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

गरबा नाइटमध्ये दिसला ईशा आणि नीता अंबानी या मायलेकीचा सुंदर लुक

ईशा अंबानी असो वा नीता अंबानी असो अंबानी कुटुंबीय आपल्या प्रत्येक कार्यात पारंपारिक कपड्यांना प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे ईशानेही या पूजेसाठी फॅशन जगतातील प्रसिद्ध नाव सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee)ने डिझाईन केलेला लेहंगा निवडला. खास हाताने कलाकुसर केलेला, टीला वर्क असलेला आणि सोबतच बांधणी दुपट्टा असलेला हा लेहंगा एकदम शाही वाटत होता. पाहा तिचा पूर्ण लुक :

Isha Ambani Sabyasachi Lehenga

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य : Instagram

एवढंच नाही तर.. सब्यसाचीच्या इंडियन रिव्हायवल प्रोजेक्टचा भाग असलेल्या ह्या आउटफीटवरील दागिने ही सब्यसाचीने डिझाईन केलेले आहेत. हार आणि कानातले हे अनकट सिडींकेट डायमंड्स आणि इमराल्डसने जडलेले आहेत. त्यासोबतच तिच्या चेहऱ्यावरील ‘आनंद’ ही अगदी बोलका आहे. नाही का? 

 Isha Ambani Sabyasachi Lehenga Close Up

फोटो सौजन्य : Instagram

ADVERTISEMENT

जर लग्नाआधीच्या पूजेसाठी एवढा शाही लेहंगा असेल तर तुम्ही विचार करा लग्नात काय असेल? आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीच खरंतर.. कारण ते मुकेश आणि नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानीचं लग्न आहे. मग खर्च तर होणारचं ना.. ईशाचा लेक कोमो इथला साखरपुडा आठवतोय का?

लग्नाची पत्रिका सिद्धीविनायक आणि तिरुपतीच्या चरणी 

मुकेश अंबानीना आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात कोणतीही कमतरता भासू द्यायची नाही. मग देवाचा आशिर्वाद तरी त्याला अपवाद कसा असेल? अंबानी कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीचं लेकीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवली होती. त्यानंतर तिरूपतीला जाऊन भगवान व्यंकटेशाच्या चरणी ही  लग्नाची पत्रिका ठेवण्यात आली. लग्नाच्या आधीची सर्व फंक्शन्स अत्यंत खाजगी पद्धतीने साजरी करण्यात येत आहेत. अंबानी आणि पिरामल कुटुंबियांतर्फे उदयपूरमध्येही 8 आणि 9 डिसेंबरला अनेक कार्यक्रमांचं अायोजन करण्यात येणार आहे. 

अंबानी कुटुंबात आनंदीआनंद, ह्या दिवशी होणार ईशाचा विवाह

ADVERTISEMENT

हे लग्न किती शाही असेल याची कल्पना तुम्हाला आली असेलच. आम्ही एवढचं सांगू की, 12 डिसेंबर जास्त लांब नाही. मग तयार व्हा अजून भरजरी दागिने, साड्या आणि लेहंगा कलेक्शन बघण्यासाठी… ईशा अंबानीच्या लग्नाचे अपडेट्स मिळवण्यासाठी वाचत राहा POPxo Marathi.

27 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT