भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नसमारंभाला सुरुवात झालीय. दीपिका रणवीर आणि प्रियांका-निक यांच्या लग्नाच्या चर्चानंतर आता ईशा अंबानीचं लग्न चर्चेत आहे. 12 डिसेंबरला ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे लग्नाआधीच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये दाखल झालं आहे.या बहुचर्चित विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी काही सेलिब्रेटी पाहुणे देखील यायला सरुवात झालीय.
लग्नासाठी सेलिब्रेटी पाहुण्यांची रेलचेल सुरु
ईशा अंबानी शाहरुख खानची फॅन आहे. एवढ्या मोठ्या फॅनसाठी किंग खान यायलाच हवा ना?
नुकताच मुंबईत दीपिका आणइ रणवीरचं रिसेप्शन झालं. या नवविवाहित जोडपंही उदयपुरात दाखल झालं.
प्रियांका आणि निकच्या लग्नाला नुकताच एक आठवडा पूर्ण झालाय. प्रियांका आणि निक यांचं जोधपूरात धुमधडाक्यात लग्न झालं. दिल्लीत त्यांचं थाटामाटात रिसेप्शनही झालं. आता ईशाच्या लग्नासाठी हे नवविवाहित जोडपं उदयपूरला पोहचलं आहे. प्रियांका आणि ईशा चांगल्या मैत्रिणी आहेत. मुकेश अंबानी यांनी आपल्या परिवारासह प्रियांकाच्या लग्नाला हजेरी लावली होती. आता प्रियांकाही ईशाच्या लग्नासाठी निकसह आवर्जून उदयपूरला हजर झालीय. प्रियांका ईशाच्या संगीत सेरिमनीमध्ये डांन्सदेखील करणार आहे अशी चर्चा आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या बहिणीच्या पावलांवर पाऊल टाकत परिनिती चोप्राने इंट्री घेतली होती. मग इथे ती मागे कशी राहिल.
जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनही आपल्या लाडक्या लेकीसह लग्नासाठी उदयपूरला आले आहेत.
विद्या बालन आणि सिध्दर्थ रॉय कपूर देखील ईशाला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत.
मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांचही उदयपूरात पाचारण झाले.
कतरिना कैफनेही या लग्नसोहळ्यासाठी जोधपूर गाठलंय.. तिचा सिंपल ड्रेस आणि इंडिअन लुक तर खरंच खूप कातिलाना वाटतोय.
कतरिना पोहचली म्हटल्यावर सलमान भाई थोडीच मागे राहणार? त्यांच्यात काही असो किंवा नसो. पण एक जादूई कनेक्शन मात्र नक्की आहे. असो…सांगण्याचा मुद्दा हा की सलमान खाननेही ईशाच्या लग्नासाठी उदयपूर गाठलंय.
वरुन धवनही उदयपूरला पोहचलाय बरं का…
अंबानी कुटुंबातील लग्न म्हणजे भारतातलं बिग फॅट वेडिंग. सहाजिकच त्याला करन जोहर नाही पोहचला असं कसं होईल ?
दिशा पटानी देखिल उदयपुरात दाखल झाली. सिमपल लुकमध्येही दिशा हटके दिसतेय. तिच्याफिटनेस आणि फिगरचे लोक चाहते उगाच नाहीयेत.
सिदार्थ मल्होत्रानेही उदयपुरात हजेरी लावली.
चिरतरुण अनिल कपूर देखील आपल्या पत्नीसोबत उदयपूरला दाखल झालाय.
अनिल कपूर आलाय म्हटल्यावर त्याचा भाऊ अर्थातच बोनी कपूर आणि लेक जान्हवी देखील उदयपूरला आलीय.
करिष्मा कपूरदेखील उदयपूरला पोहचलीय. पण तिची बहीण करीना मात्र असून लग्नासाठी आलेली दिसत नाही कारणही तसंच आहे म्हणा ती सारा अली खानच्या प्रिमिअरमध्ये बीझी आहे.
अंबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी जॉन इब्राहिमही त्याच्या बायकोसोबत उदयपूरला आलाय. व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये कसला हॉट दिसतोय तो…
ही पहा आपली रविना टंडन… तिच्या लेकी सोबत उदयपूर आलीय ईशाच्या लग्नासाठी.
जुही चावलाही उदयपुरला आली बरं का…
एकेकाळी आपल्या आदांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा, ईशाच्या संंगीत सोहळ्यासाठी उदयपुरला आली.
अंबानींच्या घरचं लग्न म्हटल्यावर सगळ्या क्षेत्रातले दिग्गज येणारच…त्यामुळे आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही आपल्या कुटुंबासह ईशाच्या लग्नाला आलाय.
महेंद्रसिंग धोनीची बायको…साक्षी सिंगही आपल्या लाडक्या लेकीसह ईशाच्या प्रि-वेडिंग कार्यक्रमांसाठी पोहचली आहे.
आपला भज्जी.. हरभजन सिंग आपल्या कुटुंबासमावेत ईशाच्या प्रिवेडिंग सेरिमनीसाठी उदयपुरला आला.
हे तर झाले सेलिब्रेटीज्. राजकारणी पण मागे नाही बरं का…आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईशाच्या लग्नासाठी उदयपुरात हजेरी लावली.
अंबानींच्या घरातलं लग्न म्हटल्यावर विदेशी पाहुणे तर येणारचं… त्यात पहिली वर्णी लागली ती अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी हिलेरी क्लिंटनची.
बरं का ..तुम्हाला ठाऊक आहे काय़ अंबानींची लेक ईशाला हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका बियॉन्से प्रचंड आवडते. आता आपल्या लेकीची आवड अंबानी नाही जपणार तर कोण? तर सांगायचा मुद्दा असा की ईशा आणि आनंदच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी अंबानी यांनी बियॉन्सेला तब्बल15 कोटी रूपये खर्चले. तर मग बियॉन्से तर यायलाच हवी ना?
आता कुठे पाहूणे यायला सुरुवात झालीय…तिच्या संगीत सेरिमनीला अख्खं बी-टाऊन उदयपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.
फोटो आणि व्हीडिओ सौजन्यः instagram