ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं लग्न थाटामाटातल 12 डिसेंबरला अंबानींच्या अँटिलिया बंगल्यावर झालं आणि आता ईशा अंबानीला गिफ्ट म्हणून पिरामल कुटुंबीयांनी दिलेल्या अंदाजे 450 कोटीच्या घरामध्ये रिसेप्शन ठेवण्यात आलं. या रिसेप्शनमध्ये पिरामल कुटुंबीयांनी राजकारणापासून ते सर्व मोठ्या सेलिब्रिटीजपर्यंत आमंत्रण दिलं. ईशा आणि आनंद या रिसेप्शनच्या वेळी कशा लुकमध्ये असणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. नुकताच त्यांच्या रिसेप्शनचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे. ईशा नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत असून रिसेप्शनला तिने ऑफव्हाईट लेहंगा आणि त्यावर गोल्डन एम्ब्रॉर्डरी असं कॉम्बिनेशन परिधान केलं आहे. तर आनंद पिरामलने रिसेप्शनला साजेसा असा सूट घातला आहे.
संपूर्ण कुटुंबीय एकत्र
संध्याकाळपासूनच वरळीच्या आनंद आणि ईशाच्या बंगल्यावर पाहुण्यांची ये – जा चालू झाली. त्यानंतर ईशा आणि आनंदचे फोटो समोर आले आहेत. या रिसेप्शनला ईशाची आई नीता अंबानी आणि सासू यांनी गुलाबी रंगाचे कपडे घातले असून इतर सर्वांनी सूट घालण्याला प्राधान्य दिलं आहे. अंबानी आणि पिरामल या कुटुंबासाठी हे सर्वात मोठं लग्न होतं. गेले आठवडाभर दोन्ही कुटुंब प्रि – वेडिंग सेलिब्रेशन आणि त्यानंतर लग्नात व्यग्र होतं. तर आज मुंबईत ईशा आणि आनंदच्या वरळीच्या घरामध्ये रिसेप्शन ठेवण्यात आलं असून या रिसेप्शनलादेखील अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दरम्यान ईशाने आपल्या लग्नात घातलेल्या लेहंग्याला आपल्या आईच्या लग्नातील साडीचा टच देऊन या लग्नामध्ये अधिक सुंदर स्वतःला दिला होता. ईशा आपल्या आई आणि वडिलांच्या अतिशय जवळची असल्यामुळेच तिचं लग्न अतिशय धुमधडाक्यात लावून देण्यात आलं आहे. साधारण 700 कोटी या लग्नामध्ये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. आनंद आणि ईशाची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
ईशा आणि आनंद राहणार वरळीला
ईशा आणि आनंद वरळीच्या याच बंगल्यामध्ये राहणार आहेत. ईशाला तिच्या सासू – सासऱ्यांनी वरळीचा हा बंगला लग्नाची भेट म्हणून दिला आहे. याच बंगल्यामध्ये गृहप्रवेश केल्यानंतर ईशा आणि आनंदच्या लग्नानंतर पहिलं रिसेप्शनही ठेवण्यात आलं आहे. हा बंगला खूप मोठा असून यामध्ये ईशाच्या आवडीनुसार सर्व इंटिरिअर करण्यात आल्याचंही यापूर्वी सांगण्यात आलं आहे.
फोटो सौजन्य – Instagram, Manav Manglani, Viral Bhayani