सध्या सगळीकडे चर्चा आहे ती कोरोना आणि कोरोनाबाधित लोकांची. कोरोनाचा असा विस्तार झाला आहे की गरीब ते श्रीमंत सगळयांनाच त्याने हैराण करून सोडलं आहे. अनेक सेलिब्रिटींनाही कोरोना झालेला आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळालं आहे. त्यातच आता अजून एका सेलिब्रेटीची भर पडली आहे. प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘इश्कबाज’मधील अभिनेत्री आदिती गुप्तालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. आदितीने स्वतः याबाबत खुलासा केला असून आपण पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करत आहेत.
#WomenisPower – निर्माता विकास गुप्ताने केली पहिली #pride पोस्ट
स्वतःला केले आदितीने क्वारंटाईन
आदितीने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. मात्र हे कळल्यानंतर तिने त्वरीत स्वतःला क्वारंटाईन केले आहे. तिला केवळ कोणत्याही गोष्टीचा वास जाणवत नव्हता. त्यामुळे तिने टेस्ट केली आणि तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जरी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरीही तिला कोरोनाची अन्य कोणतीही लक्षणं जाणवली नसल्याचे तिने सांगितले आहे. तसंच गेल्या 7-8 दिवसापासून आपण एका रूममध्ये बंद असल्याचेही तिने सांगितले आहे. स्वतःला क्वारंटाईन करून घेतले असून घरातील व्यक्ती, नवरा आणि कुटुंबीय, मित्र सर्वच आपली मदत करत असल्याचेही तिने सांगितले आहे. तसंच आपल्याला आता पहिल्यापेक्षा बरं वाटत असून आपण आपल्या डाएट आणि औषधांचीही काळजी घेत असल्याचे तिने म्हटले आहे. त्याशिवाय आता तिला नाकाने व्यवस्थित वास घेता येत असल्याचेही तिने सांगितले आहे. त्याशिवाय पुढचे 10 दिवस आपण क्वारंटाईनच राहणार असून योग्य काळजी घेणार असल्याचंही तिने नमूद केले आहे. तसंच हा आजार होणं हे चांगलं नसलं तरीही पॅनिक होऊ नका असा सल्लाही तिने यावेळी दिला आहे. तसंच याबाबत खुलेआमपण बोला आणि लाजू नका असंही तिने सांगितले. आपली परिस्थिती अर्थात तब्बेत सुधारत असून आता लवकरच आपण बरे होऊ असंही आदितीने यावेळी सांगितलं आहे.
रितेश आणि जेनेलियाचा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय, सोशल मीडियावर केले शेअर
चाहत्यांना काळजी न करण्याचे आवाहन
आदितीने स्वतःबद्दल सांगताना आपल्या चाहत्यांचीही काळजी घेतली आहे. आपण व्यवस्थित असून चाहत्यांनी आपली काळजी करू नये आणि आपण लवकरच सकारात्मक ऊर्जेसह परत येऊ असं तिने सांगितलं आहे. आदिती गुप्ता गेल्या कित्येक वर्षापासून टेलिव्हिजनवर कार्यरत असून तिने अनेक मालिकांमधून काम केले आहे. मात्र तिचे प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘इश्कबाज’मधील कामाचे सर्वत्रच कौतुक झाले. यामध्ये तिने निभावलेले नकारात्मक पात्र प्रेक्षकांना खूपच आवडले होते. तिला सर्वात जास्त प्रसिद्धी याच मालिकेमुळे मिळाली. लग्न झाल्यानंतर आदितीने काही काळ ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा आदिती गुप्ताचे चाहते तिला टीव्ही मालिकांमध्ये बघण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. तसंच तिने लवकर बरं होऊन आता पुन्हा जोमाने कामाला सुरूवात करावी असेही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. आदितीनेही अशीच अपेक्षा करत लवकरच कामाला सुरूवात करण्याचेही संकेत दिले आहेत. मात्र आता आदिती कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याबाबत आदितीने काहीही माहिती दिलेली नाही. कोरोना झाल्यामुळे ती सध्या घरात केवळ आराम करत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय न घाबरता सकारात्मक ऊर्जा घेऊन यातून बाहेर पडणार असल्याचेही तिने सांगितले आहे.
सुरक्षेची काळजी घेत ‘या’ मराठी मालिका पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज