ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
rocky aur rani ki prem kahani

रणवीर आलियाच्या रोमँटिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, टीमने केले सेलिब्रेशन

आपल्या बिनधास्त शैली आणि विधानांमुळे चर्चेत असलेला बॉलिवूडचा लाडका व प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. एकीकडे तो त्याच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनसाठी चर्चेत आहे, तर दुसरीकडे तो त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या मल्टीस्टारर चित्रपटासाठीही चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहर  दीर्घकाळाने दिग्दर्शनाच्या दुनियेत पुनरागमन करत आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट आहे . आलियाने काही दिवसांपूर्वीच तिचे शूटिंग पूर्ण केले होते व आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या संपूर्ण टीमनेच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरने रॅप-अप पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कलाकारांची रॅप-अप पार्टी

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या रॅप-अपची माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. रॅप-अप पार्टीचा व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिले की, “It’s a talkie wrap on a piece of my heart…एक कथा जिचा प्रवास कायम माझ्या मनात राहील. या चित्रपटासाठी मी अनेक वर्षांनी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलो आणि मला माझ्या घरी आल्यासारखे वाटले. आमच्या सेटवर आणि कॅमेरासमोर अनेक दिग्गज आणि सुपरस्टार एकत्र आले होते, जे जादूसारखे होते.”

आलिया भटने व्हर्च्युअल हजेरी लावली 

करण पुढे म्हणाला, ‘माझ्या पिलर ऑफ स्ट्रेंथ म्हणजेच माझ्या ए-टीमसोबत कॅमेऱ्याच्या मागे काम करणे, हे जादूपेक्षा कमी नव्हते. या कथेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार. मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन. रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी लवकरच 2023 मध्ये थिएटरमध्ये येणार आहे.” करण जोहरने शेअर केलेल्या या रॅप-अप पार्टीच्या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकार चित्रपटाचा रॅप-अप साजरा करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भटने व्हिडिओ कॉलद्वारे पार्टीला हजेरी लावली होती. करणसोबतच चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंहनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आलियाने आधीच शूटिंग पूर्ण केले

अलीकडेच, करणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या सेटवरील आलियाचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये आलियाच्या शूटिंगची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये आलियाला शूटिंग रॅप अपची पार्टी दिली गेली. आलियाने रॅप अप साजरे करण्यासाठी केक कापला आणि मग ‘चन्ना मेरेया’ गाण्यावर मजेदार शैलीत डान्स केला. तिचा हा मजेदार व्हिडिओ शेअर करत करण जोहरने लिहिले की, ‘राणीचा रॅप झाला आहे. रॉकी तिला कसे चीअर अप करत आहे.आणि माझ्या उत्साही आणि क्रेझी कॅमेराकडे दुर्लक्ष करा.रानी ने अपना काम कर लिया है इस प्रेम कहानी में, अब रॉकी तू भी आजा रैप के मैदान में।हे गाणे माझ्या इमोशनल लायब्ररीतील आहे.” ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा एक रोमँटिक चित्रपट आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text