दिवसभर अंगप्रदर्शन करुन आणि वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी पूनम पांडे आता अनेकांना माहीत झाली असेल. तिच्या अंगप्रदर्शनापासून तिच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टी लोकांना मसाला पुरवणाऱ्या होत्या यात काहीही शंका नाही. पेज थ्रीमधील असा हा वादग्रस्त चेहरा हिचे कुटुंबिय कसे काय हिला परवानगी देतात? असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडत असेल. त्यामुळेच आज आपण पूनम पांडेच्या आयुष्याच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. कारण पूनम पांडेची आई होणे तितके सोपे नाही. तिची आई असण्यामागे त्या आईलाही अनेक यातना भोगाव्या लागल्या असे समोर येत आहे. जाणून घेऊया याविषयी अधिक
लॉकअपमुळे भेटली आईला
सध्या टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर लॉकअप नावाच्या शोची चर्चा सुरु आहे. याचे सूत्रसंचालन कंगना रणौतने केले. याचा पहिला सीझन संपला असला तरी या सीझनमध्ये अनेक सेलिब्रिटींविषयी अधिक जाणायला मिळाले. पूनम पांडे या शोमध्ये आली त्यावेळी तिने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, तिच्या कामांमुळे तिला घरातल्यांनी काढून टाकले होते. पण तिने तिचा स्ट्रगल सुरु ठेवला. आज तिने नाव कमावले असले तरी तिच्या या गोष्टीमुळे तिची आई फारच नाराज होती. हे तिने सांगितले खरे. पण कित्येक वर्षांनी तिची आणि तिच्या आईची भेट झाली. तिच्या आईने तिच्या सगळ्या चुकांना माफ करुन तिला जवळ घेतले. आईला पाहून पूनमला चांगलाच धक्का बसला. त्यावेळी तिने काही खास गोष्टी शेअर केल्या.
पूनम पांडेची आई होणे नाही सोपे
पूनम (Poonam Pandey) अनेकदा ॲडल्ट व्हिडिओ पोस्ट करते. अश्लील फोटोज आणि व्हिडिओज शेअर करते. तिने आयुष्यात अनेक स्ट्रगल केला आहे. पण आता ती ज्या मार्गावर आहे त्या मार्गावर स्वत: आई म्हणून पाहताना ती म्हणाली की, आई त्यात माझी आई होणे हे अजिबात सोपे नव्हते. मी आता जे करते ते जर माझ्या मुलांनी केलं असतं तर मी काय केलं असतं. असा प्रश्न मला नेहमी पडतो. त्यामुळे माझ्या आईचा संघर्ष हा माझ्यापेक्षा जास्त आहे असे तिने सांगितले. एरव्ही काहीही बोलणारी पूनम या शोमध्ये येऊन जे बोलली त्यामुळे खूप जणांना सुखद धक्का बसला असेल यात काहीही शंका नाही.
लग्नामुळे आली चर्चेत
तर….टीशर्ट काढून नग्न होईन हे क्रिकेट मॅचच्यावेळी काढलेले उद्गार अनेकांना आठवत असतील. त्यानंतर पूनम पांडेला अनेक जण ओळखू लागली.असे अश्लील विधान केल्यामुळे खूप जणांना उत्सुकता होती ही नेमकं काय करेल आणि कशापद्धतीने अंगप्रदर्शन करेल. पण त्या आधीच तिच्यावर कारवाई झाली. पण सध्या ती काय करते असा प्रश्न पडला असेल तर ती तिचे इरॉटिक व्हिडिओ बनवते. त्यामध्ये अनेकदा ॲडल्ट असा कंटेट असतो. तिची स्वत: ची अशी स्वतंत्र वेबसाईट असून ती विकत या सगळ्या गोष्टी करते. तिने मध्येच फोटोग्राफर सॅम बॉम्बेशी लग्न केले ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. इतकेच नाही तर लग्नाच्या काहीच दिवसात तिने त्याच्यावर बलात्काराचा देखील आरोप केला त्यामुळेही तिने लग्न केले की दिखावा हे अनेकांना कळत नव्हते.
पूनम पांडे कशीही असली तरी तिच्या आईसाठी ती तिची लाडकी लेक आहे. हे मात्र नक्की!