ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
जॅकलिनने केला पुढे मदतीचा हात, एक लाख लोकांच्या जेवणाची केली व्यवस्था

जॅकलिनने केला पुढे मदतीचा हात, एक लाख लोकांच्या जेवणाची केली व्यवस्था

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांच्या समस्या अधिकच वाढत आहे. अशात गरिब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रेटीज पुढे येत आहे. नुकतंच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही या गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. जॅकलिनने योलो फाऊंडेशन ची स्थापना केली आहे. जॅकलिनची योलो फाऊंडेशन (YOLO Foundation) इतर एनजीओच्या मदतीने गरजू लोकांना अन्न पूरवणार आहे. योलो फाऊंडेशनचा अर्थ आहे “You Only Live Once” म्हणजे आयुष्य एकदाच मिळते. जॅकलिनने ही गोष्ट तिच्या सोशल मीडियावर जाहीर केली आहे. 

जॅकलीनचा कोरोनाच्या काळात लोकांसाठी मदतीचा हात

जॅकलीन एक नाही अनेक सेवाभावी संस्थासोबत मिळून लोकांची मदत करत आहे. ती सध्या रोजी बॅंक या सेवाभावी संस्थेसोबत मिळून समाजातील एक लाख गरजू लोकांना अन्न पूरवणार आहे. एवढंच नाही जॅकलिन गरजू लोकांसोबतच मुक्या आणि अनाथ प्राण्यांसाठीही मदत करत आहे. तिने फेनलाईन या सेवाभावी संस्थेसोबत मिळून काही प्राण्यांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. तिच्या मते ही संस्था मुंबईतील अनेक विभागात फिरून तिथल्या १ हजार भटक्या प्राण्यांना मदत करणार आहे.  तिने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठी मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध केलं आहे. जॅकलिनला तिच्या या सामाजिक कार्याविषयी विचारल्यावर तिने सांगितलं की, “आपल्याला एकच जीवन मिळालं आहे. त्यामुळे या जीवनात आपण इतरांची मदत करून बरंच काही बदलू शकतो. मला योलो फाऊंडेशनची घोषणा करताना प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे. या कठीण काळात मला इतरांची मदत करण्याची संधी यामुळे मिळाली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू” जॅकलिनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामुळे लोकांनी जॅकलिनला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या पोस्टवर लाईक्स  आणि प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लोकांना तिच्या टीमसोबत जेवण वाढताना दिसत आहे. बॉलीवूड आणि इतर ठिकाणी जॅकलिनच्या या समाज कार्याचे कौतुक केले जात आहे. या पोस्टवर जॅकलिनने मदर टेरेसा यांचा एक सुविचार लिहीत लोकांना मदतीचे आव्हान केले आहे. जॅकलिनने शेअर केलं आहे की, मदर टेरेसा यांनी सांगितलं होतं की, “भुकेल्या लोकांना अन्न दिल्यामुळे मनाला शांती मिळते. यासाठी मी रोटी फांऊडेशनची  कृतज्ञता व्यक्त करते. ही संस्था माजी पोलीस आयुक्त डी शिवानंदन चालवत आहे. कोरोना महामारीच्या काळात आम्ही लोकांना अन्न पूरवण्याचा निर्णय घेतला आहे” जॅकलिन फर्नांडिसप्रमाणे सोनू सूद, सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट असे अनेक कलाकार कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.  

जॅकलिनचे आगामी चित्रपट

जॅकलिन तिच्या आगामी भूतपुलिसमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर असणार आहे. यासोबतच अक्षय कुमारसोबत बच्चन पांडेमध्येही ती झळकणार आहे. रोहीत शेट्टीच्या सर्कस मध्ये ती रणवीर सिंहसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

अभिनेत्री उपासना सिंह सापडली संकटात, कोविड नियमाचं केलं उल्लंघन

आमिर खान लडाखमध्ये करत आहे शूटिंग,असा रंगणार ‘लाल सिंह चड्ढा’चा वॉर सीन

‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत या अभिनेत्याची एंट्री, बदलणार का शुभ्रा

ADVERTISEMENT
06 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT