ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Varun Dhawan

जाह्नवी कपूर आणि वरुण धवन करणार ‘बवाल’, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर 

अलीकडेच वरुण धवन त्याच्या पुढच्या चित्रपटात  नितेश तिवारीबरोबर काम करणार असल्याच्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. असे म्हटले जात होते की हा चित्रपट फेब्रुवारी 2022 मध्ये फ्लोरवर जाईल. या चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेसाठी जाह्नवी कपूरची निवड झाल्याचीही सगळीकडे चर्चा होती. आता सर्व अफवा आणि चर्चांना पूर्णविराम देत नितेशने शेवटी जाह्नवी कपूर आणि वरुण धवन या दोन GenZ स्टार्सना घेऊन त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘बवाल’ आणि पुढील वर्षी 7 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. वरुण आणि जान्हवी यांची रुपेरी पडद्यावर कशी केमिस्ट्री असेल हे बघण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

वरुण धवनने जाहीर केली माहिती 

अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून त्याच्या आगामी ‘बवाल’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. वरुणचा हा चित्रपट पुढील वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.वरुण धवन आणि जाह्नवी कपूर पहिल्यांदाच बवाल च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. बवाल या चित्रपटाबद्दल वाचल्यानंतर जाह्नवी आणि वरुणचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. वरुण धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये चित्रपटाचे नाव, दिग्दर्शक आणि कलाकारांची नावे लिहिली आहेत. या पोस्टरसोबत वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अब होगा बवाल. नितेश तिवारी आणि साजिद नाडियादवाला यांच्यासोबत माझा पुढचा चित्रपट करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 7 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे व या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय.”

Varun Dhawan | Bawaal
Varun Dhawan and Janhavi Kapoor


बवाल ही एक प्रेमकथा असेल  

वरुण आणि जाह्नवीचा ‘बवाल’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितेश तिवारी आणि साजिद नाडियादवाला दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक सुंदर लव्हस्टोरी बघायला मिळेल, ज्यामध्ये वरुण धवन आणि जाह्नवीची दमदार केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वरुणने केवळ इतकीच माहिती शेअर केली आहे. याशिवाय त्याने या चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. इंस्टाग्राम हँडलवर वरुण धवनने  बवालची अधिकृत घोषणा करत हे पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये लिहिलेय की “राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितेश तिवारी आणि साजिद नाडियादवाला अभिमानाने तुमच्यासाठी घेऊन येत आहेत बवाल. वरुण धवन आणि जान्हवी कपूर बरोबर. 7 एप्रिल 2023 रोजी.”

ADVERTISEMENT

वरुण धवन आणि जाह्नवी कपूरची जोडी पडद्यावर काय जादू करते हे बघणे मनोरंजक ठरेल. या दोघांनी यापूर्वी कधीही एकत्र काम केलेले नाही. सध्या वरुण धवन त्याच्या भेडिया या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुण क्रिती सेननसोबत दिसणार आहे. तर जाह्नवी सध्या मिस्टर आणि मिसेस माही हा चित्रपट करतेय. बवालचे दिग्दर्शक नितेश तिवारी हे इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी दंगल व छिछोरी यांसारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट केले आहेत. आता ते वरुण धवनबरोबर पहिल्यांदाच चित्रपट बनवणार असून वरुण धवननेही याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

वरुण धवनच्या  ‘जुग जुग जियो’ या आगामी चित्रपटात तो कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्याबरोबर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. तर जान्हवी कपूरचे  ‘गुड लक जेरी’ आणि ‘तख्त’ हे आगामी चित्रपट आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

30 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT