अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात चाहत्यांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली आहे. तिचा लुक आणि डान्सचे अनेक चाहते आहेत. जान्हवी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. जान्हवीने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहेच शिवाय चाहत्यांना भावूकदेखील करत आहे. जान्हवीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती हातावर टॅटू काढण्यासाठी उत्साहित असल्याचे दिसत आहे. कारण हा टॅटू जान्हवीसाठी खूपच खास आहे. त्रास होत असतानाही तिने यासाठी हा टॅटू हातावर काढून घेतला आहे.
Bigg Boss Marathi : घरात पडू लागली आहे फूट, स्नेहा तयार करतेय का नवा गट
जान्हवीचा नवा टॅटू
जान्हवीने तिच्या पोस्टमध्ये काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. ती सध्या ह्रषीकेशमध्ये वेकेशनवर गेली आहे. शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती हातावर टॅटू काढताना तळमळत आहे आणि ‘गोविंदा गोविंदा’ असा जप करत आहे. एवढा त्रास सहन करत जान्हवीने हा टॅटू मात्र हातावर काढून घेतलाच आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय साध्या अवतारात दिसत आहे. लखनवी सूट आणि तोंडावर मास्क या पेहरावात टॅटू काढण्यासाठी ती चक्क मांडी घालून बसलेली दिसत आहे. तिने काढलेला हा टॅटू चाहत्यासोबत शेअरदेखील केला आहे. या टॅटूमधून लिहिलं आहे “आय लव्ह यु माय लब्बू” पाहता पाहता हा टॅटू सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण हा टॅटू जान्हवीसाठीदेखील तितकाच खास आहे. जान्हवीने तिची आई श्रीदेवीने लिहिलेली नोट टॅटूमध्ये हातावर गोंदवली आहे. श्रीदेवी प्रेमाने जान्हवीला लब्बू असं म्हणत असते. जान्हवीने आईचं प्रेम सतत मिळावं यासाठी ही नोट हातावर गोंदवली आहे.
करण जौहरने रद्द केली युवराज सिंहची बायोपिक, कारण वाचून व्हाल हैराण
श्रीदेवीच्या आठवणीने जान्हवी भावूक
दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीने 2018 साली अचानक या जगातून निरोप घेतला. तिच्या मृत्यूचे गुढ आजही कायम आहे. दुबईत एका एका लग्नासाठी गेलेली श्रीदेवी परत घरी आलीच नाही. यामुळे जितकं नुकसान बॉलीवूडचं झालं त्यापेक्षा जास्त नुकसान तिच्या कुटुंबाचं झालं. जान्हवी आणि खुशी कपूर आईविणा पोरक्या झाल्या. जान्हवीचे यानंतरच बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. जान्हवीला अभिनेत्री करण्यासाठी श्रीदेवी खास प्रयत्न करत होती. त्यामुळे जान्हवीचं करिअर पाहण्यासाठी श्रीदेवी आज हवी होती असं वाटणं स्वाभाविक आहे. आता या टॅटूच्या स्वरूपात श्रीदेवी जान्हवीसोबत कायम असेल.