ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Janhvi Kapoor reveals undergoing cricket training for Mr and Mrs Mahi in Marathi

‘मिस्टर अॅंड मिसेस माही’साठी जान्हवीने घेतले कठोर परिश्रम, सहा महिने घेतलं ट्रेनिंग

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपट ‘मिस्टर अॅंड मिसेस माही’मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत झळकणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये ती राजकुमार रावसह स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील क्रिकेटर साकारण्यासाठी जान्हवी कपूरने कठोर परिश्रम घेतले आहेत. या भूमिकेत समरस होण्यासाठी ती जवळजवळ सहा महिने क्रिकेटचं ट्रेनिंग घेत होती. भूमिकेतील बॉडी लॅंग्वेजवर तिने खूप बारकाईने काम केलं आहे. एका खेळाडूसारखं दिसण्यासाठी आहार, व्यायाम आणि डाएटवरही खूप भर दिला आहे. त्यामुळे चाहत्यांनाच नाही तर स्वतः जान्हवी कपूरलाही या चित्रपटातील भूमिकेमधून चांगल्या आशा वाटत आहेत. नुकतंच जान्हवीने एका मुलाखतींमधून तिने घेतलेल्या क्रिकेट ट्रेनिंगविषयी जाहीर केलं आहे. जान्हवीने ही भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली का हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.

कधी होणार मिस्टर आणि मिसेस माही प्रदर्शित

मिस्टर अॅंड मिसेस माही चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जौहर करत असून दिग्दर्शन शरण शर्मा करत आहे. यापूर्वी जान्हवीने ‘गुंजन सक्सेना दी कारगिल गर्ल’मधून तिच्या हटके अभिनयाची ताकद सर्वांना दाखवून दिलेली आहे. त्यामुळे आता खेळाडूच्या वेगळ्या भूमिकेत जान्हवीला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. चित्रपटात जान्हवीची भूमिका महिमा तर राजकुमारची भूमिका महेंद्र अशा नावांची असणार आहे. म्हणूनच या चित्रपटाचं नाव मिस्टर अॅंड मिसेस माही असं असणार आहे. चित्रपटाचं कथानक कसं असेल याबाबत मात्र अजूनही स्पष्ट कल्पना देण्यात आलेली नाही.

जान्हवीच्या चित्रपटांचा धडाका

जान्हवी कपूर मिस्टर अॅंड मिसेस माही व्यतिरिक्त आणखी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  ती सनी कौशलसह मिली चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट मल्याळी चित्रपट हेलेनचा रिमेक असणार आहे. सध्या तिच्या बवाल या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत असणार आहे. तिचा गुडलक जेरी लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट कोलामावु कोकिलाचा रिमेक असणार आहे. ज्यात जान्हवीसोबत नयनतारा, योगी बाबू मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे पुढचं वर्षभर जान्हवीच्या चित्रपटाचा लागोपाठ धडाकाच सुरू असणार असं वाटत आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT