सध्या ‘खतरों के खिलाडी – मेड इन इंडिया’चे चित्रीकरण फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. गेल्या दोन तीन सीझनमधील काही स्पर्धक चॅम्पियन ट्रॉफीसाठी लढत आहेत. यामध्ये खतरों के खिलाडीच्या सातव्या सीझनमधील जय भानुशालीदेखील सहभागी झाला आहे. अगदी पहिल्या भागापासून या खिलाडींमधील स्पर्धा चुरशीची होताना दिसून येत आहे. मात्र आता जयने स्टंट करताना आपण जखमी झाल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र त्याच्या चाहत्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण जयने हा व्हिडिओ स्वतः पोस्ट करत आपण पुढच्या स्टंटसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.
जयने सोशल मीडियावर केले जाहीर
सध्या रोहित शेट्टीच्या मार्गदर्शनाखाली ‘खतरों के खिलाडी – मेड इन इंडिया’चे चित्रीकरण सुरू आहे. यामध्ये जय भानुशाली, ऋत्विक धनजानी, करण पटेल, अली गोनी, करण वाही, हर्ष लिंबाचिया, निया शर्मा, जास्मिन भासिन यांचा सहभाग आहे. पहिल्याच भागापासून प्रेक्षकांना हा शो आपलासा वाटू लागला आहे. यातील स्टंट करताना कलाकारांना बघणं आणि रोहित शेट्टीचं निवेदन ही एक पर्वणीच असते. मात्र यामध्ये बऱ्याचदा कलाकारांना स्टंट करताना दुखापतही होते. अभिनेता आणि निवेदक असणाऱ्या जय भानुशालीला असंच स्टंट करताना दुखापत झाली असून त्यांच्या तीन ते चार बोटांना जखम झाली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. मात्र तरीही आपण पुढचा स्टंट करायला जात असून सुरक्षित असल्याचेही सांगितले आहे. तसंच पुढच्या स्टंटसाठी मला शुभेच्छा द्या असंही जयने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आधीचा सीझनदेखील जखमी झाल्यामुळेच सोडावा लागला
जय भानुशाली सातव्या सीझनमध्ये स्पर्धक होता मात्र त्यावेळीदेखील त्याला जखमी झाल्यामुळे अर्धवट सोडून जावं लागलं होतं. आता पुन्हा त्याला दुसरी संधी मिळाली आहे. जयने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणं हे कायम स्वप्नं होतं. आधी सहभागी झालो असताना दुखापतीमुळे शो सोडावा लागला होता. आता पुन्हा मिळालेली संधी सोडायची नाही असंही त्याने सांगितलं. संपूर्ण शो मध्ये मला चांगले स्टंट करून मी व्यवस्थित आहे की नाही हेदेखील पाहायचं आहे असंही जयने सांगितलं आहे.
कधी काळी या अभिनेत्रींनी निभावली होती व्हिलनची भूमिका
रोहित शेट्टी करणार इंडस्ट्रीतील लोकांची मदत
पहिल्यांदाच खतरों के खिलाडी हा रियालिटी शो भारतात चित्रीत करण्यात येत आहे. रोहित शेट्टीने कोरोना काळात इंडस्ट्रीतील अनेक लोकांना पाठिंंबा देत मदत केली आहे. आता हा शो शूट करून यातून मिळणारे मानधनदेखील रोहित शेट्टी इंडस्ट्रीतील गरजू लोकांना देणार असल्याचं समजत आहे. इतकंच नाही तर या काळात आता शो चं चित्रिकरण सुरू करून व्यवस्थित काळजी घेत त्याने अनेक तंत्रज्ञ, कलाकार यांनाही काम मिळवून दिले असल्याचे कळत आहे.
अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी
पहिल्या भागात चॅम्पियन जॅकेट मिळविण्याचा मान ऋत्विक धनजानीला
ऋत्विक मागच्या सीझनमध्ये थोडक्यासाठी फायनलमध्ये यायचा राहिला होता. एक उत्कृष्ट स्पर्धक म्हणून त्याने त्यावेळी नाव कमावलं होतं. तर आता पहिल्याच भागात चॅम्पियन जॅकेट मिळविण्याचा मान ऋत्विक धनजानीला मिळाला आहे. आता त्याचे काय फायदे असणार हे येत्या भागात रोहित शेट्टीकडून कळतीलच. याचे चित्रीकरण भारतात चालू असल्याने बॉलीवूडमधील एकापेक्षा एक स्टंट रोहित शेट्टीने या कलाकारांसाठी तयार केले असल्याचे समजते. त्यामुळे आता या सीझनमध्ये नक्की कोण चॅम्पियन ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा येत आहे ‘इच्छाधारी नागिण’
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा