दर्जेदार चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अनेक अभिनेत्रींपैकी एक आहेत जया बच्चन. ‘सिलसिला’, ‘अभिमान’ अशा चित्रपटातून सोज्वळ अभिनय आणि ‘कभी खुशी कभी गम’ सारख्या चित्रपटातून एक मॉर्डन आई. जया बच्चनचा ऑनस्क्रिन अनुभव कोणीच विसरु शकत नाही. आता जया बच्चन पुन्हा एकदा मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच वर्षानंतर त्या पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या साठी त्यांनी चक्क एका मराठी चित्रपटाची निवड केली असून या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होणार आाहे. अद्याप या चित्रपटाबद्दल कोणतीही अधिक माहिती समोर आली नसली तरी देखील जया बच्चन यांचा रोल या चित्रपटामध्ये आहे हे नक्की आहे. जाणून घेऊया काय असेल हा चित्रपट
पाकिस्तानी पावरी व्हिडिओपेक्षा स्मृती इराणींना आवडला शहनाजचा टॉमी
मराठी चित्रपटात काम
मराठीतील दिग्गज दिग्दर्शक गजेंद्र अहिरे या चित्रपटाचे दिग्दर्शक असल्याचे समजत आहे. गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटाची मांडणी ही नेहमीच वेगळी असते. त्यामुळे जया बच्चन यांचा रोलही यामध्ये नक्कीच वेगळा असेल. यात काही शंका नाही.मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट अवघ्या 20 दिवसात शूट केला जाणार आहे. आणि त्याची तयारी आता सुरु करण्यात आलेली आहे. पण हा चित्रपट नेमका काय असेल. यामध्ये सहकलाकार कोण आहेत याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाची उर्वरित माहिती गुलदस्त्यात आहे असेच म्हणावे लागेल.
पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपट
जया बच्चन यांच्या अभिनयाबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय हा दर्जेदारच राहिला आहे. त्यांनी इतर भाषेत केलेल्या चित्रपटांविषयी फारशी माहिती नसली तरी मराठीत त्या पहिल्यांदाच काम करणार आहेत. जया बच्चन यांच्याकडून या संदर्भातील कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. पण एक खासगी मनोरंजन वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपटातून त्या कमबॅक करत आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सुयश टिळकला नेमकं झालंय तरी काय…पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात
जया बच्चन आणि मीडिया
जया बच्चन आणि मीडिया यांचे फार काही चांगले संबंध आहेत असे कधीच दिसत नाहीत. त्यांना पापाराझींवर भयंकर राग आहे. कोणीही त्यांंचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा न विचारता फोटो काढलेला मुळीच चालत नाही. म्हणूनच पापाराझी त्यांना थोडे घाबरुनच असतात. त्यांचे अनेक रागावलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल होत असतात. पण आता पुन्हा एकदा ही दिग्गज अभिनेत्री कमबॅक करणार म्हटल्यावर पापाराझी त्यांना स्पॉट करतील आणि त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय असेल ते बघायला हवे.
फॅशन स्टेटमेंट
जया बच्चन यांची फॅशनही इतरांपेक्षा वेगळी आहे. त्या नेहमी कम्फर्टेबल अशा कपड्यांमध्ये दिसून येतात. कॉटन किंवा सिल्कचे पंजाबी ड्रेस आणि साडी अशा कपड्यांमध्ये जास्त दिसतात. जया बच्चन यांचे केस ही त्यांची ओळख होती.तरुणपणात त्यांचे लांब केस अनेकांचा आकर्षणाचा भाग होते. पण आता त्यांनी त्याचे केस कापले आहे त्यांच्या केसांना त्या कलर करताना दिसत नाहीत. त्यांनी त्यांचे ग्रे हेअर छान जपले आहेत.
आता नव्या मराठी चित्रपटात त्यांचा रोल काय असणार हे पाहावे लागेल.