आज दिग्गज अभिनेत्री जयाप्रदा यांचा वाढदिवस आहे. सध्या जयाप्रदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. मात्र एके काळची दिग्गज अभिनेत्री म्हणून आजही त्यांचा खास चाहता वर्ग आहे.जयाप्रदा यांचा जन्म यांच्या जन्म आंध्रप्रदेशच्या राजमुंदरी गावात 3 एप्रिल 1962 साली झाला. जयाप्रदा यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात तेलुगू चित्रपटातून केली. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती हिंदी चित्रपटातून. 1974 साली जयाप्रदा यांनी ‘भूमि कसम’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केलं होतं. तीस वर्षांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये जयाप्रदा यांनी एकूण 300 चित्रपटातून काम केलं. जयाप्रदा यांनी हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्लाळी, बंगाली आणि मराठी अशा अनेक भाषेतील चित्रपट केलेले आहेत. जयाप्रदा यांचे सौंदर्य आणि अभिनय कौशल्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला. जयाप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी असे होते मात्र चित्रपटसृष्टीत त्या जयाप्रदा या नावाने लोकप्रिय झाल्या. 80 च्या दशकातील जयाप्रदा या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. जयाप्रदा यांना साऊथ चित्रपटांसाठी आतापर्यंत तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. जयाप्रदा क्लासिकल डान्सर असल्यामुळे त्यांच्या नृत्यकलेचेदेखील अनेक चाहते आहेत.
1986 साली जयाप्रदा यांचा विवाह झाला
सिनेसृष्टीमध्ये करिअरच्या शिखरावर असताना जयाप्रदा यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तीन मुलांचे वडील असलेल्या श्रीकांत नाहटा यांच्याशी जयाप्रदा 1086 साली विवाहबंधनात अडकल्या. जयाप्रदा यांच्यावर प्रेम असूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता श्रीकांत नाहटा यांनी जयाप्रदा यांच्याशी विवाह केला. या विवाहामुळे जयाप्रदा यांना कुटुंबिय आणि चाहत्यांचा रोष सहन करावा लागला. एवढंच नाही तर जयाप्रदा यांच्याशी विवाह झाल्यानंतर श्रीकांत नाहटा यांचे पहिल्या पत्नीपासून मुल झाले. जयाप्रदा आणि श्रीकांत नाहटा यांना मुले झाली नाहीत. लग्नानंतरही जयाप्रदा यांनी चित्रपटांमधून काम केलं. मात्र लग्नानंतर जयाप्रदा यांना चित्रपटसृष्टीत फार यश मिळाले नाही. त्यामुळे 1994 साली जयाप्रदा यांनी राजकारणात प्रवेश केला. जयाप्रदा आता रामपूर मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
जयाप्रदा आणि जितेंद्र यांची अफलातून केमिस्ट्री
जयाप्रदा यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. मात्र जितेंद्र यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री लोकांना फार आवडली. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतदेखील जयाप्रदा यांनी अनेक चित्रपट केले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतदेखील जयाप्रदा यांनी अनेक चित्रपटातून काम केलं. जयाप्रदा यांचे तोहफा, कामचोर, देवता, शराबी, सरगम हे हिंदी चित्रपट फार गाजले. सरगम चित्रपटातील ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रीत केलेलं ‘डफली वाले हे गाणं’ आजही अनेकांच्या तोंडात रूंजी घालतं. ‘आधार’ या मराठी चित्रपटातदेखील जयाप्रदा यांनी काम केलं होतं. लवकरच भारतीय चित्रपटातील जम्पिंग जॅक जितेंद्र आणि क्लासिकल डान्सर जयाप्रदा आता एका डान्सिंग रियालिटी शो चे परीक्षक म्हणून एकत्र काम बघणार आहेत अशी चर्चादेखील काही दिवसांपासून रंगली होती. यासाठी वाचा जितेंद्र आणि जयाप्रदा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र
अधिक वाचाः
एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या
हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे ‘नॅचरल स्वीटनर्स’
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम