जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी खूशखबर! जॉनचा मोस्ट अवटेड चित्रपट ‘RAW’चा ट्रेलर फायनली रिलीज झाला आहे. हा ट्रेलर इतिहासातील सत्य घटना आहे. भारत पाकिस्तान संबंधावर आधारीत असा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच आलियाची आठवण आल्यावाचून राहणार नाही. कारण आलियाचा राझी हा चित्रपटही याच धर्तीवर आधारीत होता. देशप्रेमावर आधारीत अनेक चित्रपट एकामागोमाग एक रिलीज होत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटापासून तर अशा चित्रपटांना बॉलीवूडमध्ये अधिक पसंती मिळाली आहे. त्यामुळे साहजिकच जॉनच्या RAWची तुलना इतर चित्रपटांशी केली जात आहे. या चित्रपटाविषयी अधिक काही मत मांडण्याआधी पाहुयात याचा ट्रेलर
अनोख्या पद्धतीने केला ‘ब्रम्हास्त्र’ चा लोगो लाँच
जॅकीदादाचा अलग अंदाज
ट्रेलरमध्ये जमेच्या अनेक बाजू आहेत. त्यापैकी एक जॅकी दादा अर्थात जॅकी श्रॉफ म्हणायला हवे. कारण जॅकी श्रॉफच्या खणखणीत आवाजात ट्रेलरची सुरुवात होते. भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आहे. यात जॉन भारतीय हेर साकारत आहे आणि त्याला ट्रेनिंग देण्याचे काम जॅकी श्रॉफ करत आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये युद्ध आणि त्यानंतर ताणत जाणारी परिस्थिती याचा चांगलाच अंदाज येत आहे. RAW असे चित्रपटाचे नाव असले तरी ते ROMEO, AKBER,WALTER असे आहे. या नावांचा वापर जॉन हेरगिरी करताना करत असल्याचा अंदाज आहे.
आलियाची होते आठवण
राझी या चित्रपटात आलियाला तयार करण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आली तशीच ट्रेनिंग जॉनला देण्यात आली आहे. आम इंसानपासून ते हेर असा हा प्रवास या चित्रपटात दाखण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेलर पाहताना प्रत्येकवेळी राझीमधील भोळ्या आलियाची आठवण येतेच. सामान्य माणसाला देशसेवेसाठी तयार करताना लागणारी मेहनत या चित्रपटात दिसून येते. शिवाय दुसऱ्या देशात जाऊन हेरगिरी करणे किती कठीण असते. त्याचे देशावर होणारे परिणाम आपल्या अंगावर काटा आणते. शिवाय दुसऱ्या क्षणी आपल्याला सध्या देशात सुरु असलेली तणावपूर्ण परिस्थितीची आठवण करुन देते. त्यामुळे हा चित्रपट अधिक जवळचा वाटू लागतो.
साराने भावाला दिल्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा
तरीही अंगावर काटा आणतो ट्रेलर
राझी पाठोपाठ सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत विकी कौशलचा उरी हा चित्रपट येऊन गेला. तो येऊन गेला असे म्हणायला नको कारण अजूनही हा चित्रपट अनेक सिनेमागृहांमध्ये सुरुच आहे.दोन मोठे आणि चांगले चित्रपट येऊनही RAW या चित्रपटाचा ट्रेलर तुमची उत्सुकता वाढवतो. विशेषत: ट्रेलरची शेवटची ओळ तुमची उत्सुकता अधिक वाढवते कारण जॉनला पकडल्यानंतर त्याला त्याचे नाव विचारण्यात येत तेव्हा तो काय नाव घेईल म्हणजे Romeo, Akber कीWalter ???
अक्षयच्या सूर्यवंशी सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
लुकवर घेतली मेहनत
जॉन अब्राहम म्हटला की, आपल्या डोळ्यासमोर मस्क्युलर मॅन उभा राहतो. पण चित्रपटात जॉनने लुकवर अधिक मेहनत घेतलेली दिसत आहे.त्याच्या लुकमध्ये बरीच व्हरायटी पाहायला मिळत आहे. एखादा हेर ओळखला जाऊ नये म्हणून त्याने स्वत:वर केलेला प्रयोग चांगला दिसत आहे. येत्या ५ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
(सौजन्य-Youtube, Instagram)