ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘सारेगमपा लिटल चॅम्प्स’च्या परिक्षकांमध्ये होणार बदल

‘सारेगमपा लिटल चॅम्प्स’च्या परिक्षकांमध्ये होणार बदल

लॉकडाऊननंतर आता हळूहळू अनेक मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणालाही पुन्हा सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरसचा धोका अजूनही असल्यामुळे सुरक्षेची काळजी घेत हे चित्रीकरण केलं जात आहे. लॉकडाऊन पूर्वी ‘सारेगमपा लिटल चॅम्प्स’ 2020 या शोच्या आठव्या पर्वाला सुरूवात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे या रिअॅलिटी शोचेही शूटिंग थांबवण्यात आलं होतं. आता हा शोदेखील आपल्या प्रेक्षकांसोबत पुन्हा कनेक्ट होण्यासाठी सज्ज झाला आहे. एवढंच नाही तर ‘न्यू नॉर्मल’ या नवीन काळात प्रेक्षकांसाठी आता या शोमध्ये एक सरप्राईज असणार आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू होणाऱ्या या शोच्या परिक्षकांमध्ये आता बदल केला जाणार आहे. 

उदित नारायण आणि कुमार शानू सोडणार शो

दिग्गज गायक उदित नारायण आणि कुमार सानू हे लॉकडाऊनपूर्वी या शोचा हिस्सा होते पण आपल्या काही खाजगी कारणांमुळे त्यांनी या शोच्या बाहेर पडण्याचे ठरवले. ज्यामुळे आता लोकप्रिय गायक हिमेश रेशमिया आणि जावेद अली हे अलका याग्निक यांच्यासोबत ‘सारेगमपा लिटल चॅम्प्स’ 2020 चे नवे  परिक्षक असतील. जावेद अली आणि हिमेश रेशमिया हे पुन्हा एकदा या टॉप रेटेड सिंगिंग रिअॅलिटी शो मध्ये चाहत्यांना दिसणार आहेत.  जावेद आणि हिमेश हे यापूर्वीही सारेगमप शोचा अनेक वर्षे भाग राहिलेले आहेत. 2017 मध्ये जवळजवळ 8 महिने एवढा सर्वाधिक काळ सुरू असलेल्या सीझन आणि प्रथम क्रमांकाचा टॅलेंट बेस रिअॅलिटी शो असलेल्या लिटल चॅम्प्सचा हे दोघेही हिस्सा होते. आता 2 वर्षानंतर पुन्हा एकदा ते अलका याग्निक यांच्यासोबत या शोमध्ये दिसणार आहेत. 

Instagram

ADVERTISEMENT

कसा असेल आता हा शो

सारेगमपा लिटल चॅंम्प या शोचे नवे परिक्षक आणि स्पर्धक मुले पुन्हा एकदा लॉकडाऊननंतर या शोसाठी सज्ज झाले आहेत. लिटल चॅम्प्ससोबत पुन्हा एकदा काम करण्याबद्दल गायक जावेद अलीने आपलं मनोगत व्यक्त केलं , “या शोचा हिस्सा होताना पुन्हा एकदा खूप छान वाटत आहे. हे मला माझ्या घरी परत येण्यासारखे आहे. 2011 साली मी या फ्रँचाइजमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले होते. सारेगमप 2012 चे सूत्रसंचालनही मी केले होते आणि मग 2017 झाली सर्वाधिक काळ चालणाऱ्या ऐतिहासिक सीझनचे परीक्षण करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे या शो सोबत माझ्या खूप साऱ्या गोड आठवणी जोडलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या आधी या शोचे परीक्षण करणाऱ्या दिग्गज गायकांची जागा मी कदाचित भरून काढू शकणार नाही, पण या शो चे परीक्षण मी माझ्या स्टाईलने नक्की करेन. लहान मुलांबाबत मी खूपच हळवा असून त्यांची योग्य ती काळजी घेऊनआम्ही हा शो पुढे नेऊ. अलकाजी, हिमेश आणि माझे  नेहमीच चांगले जमते त्यामुळे या शोमध्येही आम्ही नक्कीच खूप मजा करू. मला माहीत आहे की आता चित्रीकरण नॉर्मल असणार नाही आणि आम्हा सर्वांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. पण तरीही मला असं वाटतं की या शोमधी सर्व लहान मुलं आणि सर्वच सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रॉडक्शन टीम वचनबद्ध आहे. या सिझनमधील लहान मुलांचे आम्ही वर्च्युअल मिठ्या मारून कौतुक करू, कारण आम्ही त्यांनाआता स्पर्शदेखील करू शकत नाही.”

शो दरम्यान लिटिल चॅंम्पसची अशी घेतली जाणार काळजी

 गायक हिमेश रेशमियानेही आपलं मत याबाबत व्यक्त केलं, “या वहिनीसोबत मी आता गेले दोन दशकाहूनही अधिक काळापासून काम करत आहे. सारेगमप च्या सिल्वर जुबली सेलिब्रेशन मध्येही मी सामील होतो. या शोमध्ये मी अनेकवेळा परिक्षक राहिलेलो आहे आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये हे येणे हे माझ्यासाठीदेखील घरी परत येण्यासारखेच आहे. 2017 साली लिटल चॅम्पच्या अतिशय यशस्वी आणि आणि आठ महिन्यांच्या सीझन अतिशय यशस्वी राहिला आणि त्या वर्षीचा तो टॉप रेटेड सिंगिंग रिअॅलिटी शो झाला होता त्यातही मी परिक्षकाचे काम पाहिले होते. या शोमध्ये नव्या दमाने सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. आमच्याकडे देशातील कानाकोपऱ्यातील गुणी गायक बच्चेकंपनी असून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे त्यामुळे मला खात्री आहे की ह्या सीझनमध्येसुद्धा आम्हाला एक से एक परफॉर्मन्स पाहायला मिळतील.” त्याचप्रमाणे “सध्याची परिस्थिती लक्षात घेता या लहान मुलांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता असून संपूर्ण क्रू तर्फे मार्गदर्शक सूचना यासाठी पाळण्यात येत आहेत. एक मेंटॉर म्हणून या मुलांच्या आकांक्षा, स्वप्नं आणि आशा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कलेमध्ये वाढ होईल असं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कंगना रणौतच्या रडारवर आली पूजा भट, जाणून घ्या कारण

‘इश्क सुभान अल्लाह’मध्ये ईशा सिंगचा कमबॅक, जुनीच झारा आता नव्या अवतारात

अभिनेता पुष्कर श्रोत्री घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

08 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT