सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कुणीच सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री जुही चावलाच्या हरवलेल्या कानातल्यांची चर्चा आहे. कारण तिने ट्विटद्वारे लोकांकडे तिचे हरवलेले कानातले शोधण्याची विनंती केली आहे. तिच्या डायमंडच्या कानातल्यांपैकी एक कानातले मुंबई एअरपोर्टवर हरवलं असून ते पंधरा वर्षे जुनं आणि रिअल डायमंडचं आहे. जुहीने ट्विटद्वारे विनंती केली आहे की ज्याला कुणाला ते सापडेल त्याला ती चांगले बक्षीस देईल. जुहीने तिच्या कानातल्याचा फोटो आणि चाहत्यांना विनंती करणारं ट्विट तिच्या ट्विटरवर केलं आहे. तिने शेअर केलं आहे की, “सकाळी मी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टी 2 गेट नं 8 वरून गेले. एमिरेट्स काऊंटर चेक इन करताना इमीग्रेशन सिक्युरिटी दरम्यान माझे डायमंडचे कानातले कुठतरी हरवले आहेत. जर कोणी मला ते शोधण्यासाठी मदत केली तर मला खूप आनंद होईल. तुम्ही ते सापडल्यास पोलिसांना माहिती देऊ शकता. मी तुम्हाला योग्य बक्षीस देईन. हे कानातलं माझ्या एका मॅचिंग पीसपैकी एक आहे जे मी जवळजवळ पंधरा वर्षे सातत्याने घालत आहे. प्लीज मला ते शोधण्यासाठी मदत करा” जुही चावलाने रविवारी हे ट्विट केलं होतं. आता ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Kindly help 🙏 pic.twitter.com/bNTNYIBaZ2
— Juhi Chawla (@iam_juhi) December 13, 2020
जुहीने एअरपोर्टच्या कारभारावर केले आरोप
काही काळापुर्वीच जुही चावला यासाठी एअरपोर्टच्या अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) वर चांगलीच रागावली होती. कारण ती ज्या काऊंटरवर उभी होती तिथे लोकांची चांगलीच गर्दी होती असं तिचं म्हणणं आहे. खूप वेळापासून अनेक प्रवासी तिथे खोळबंले होते. ज्यामुळे एअरपोर्टवर प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या सेवासुविधा योग्य नसल्याचा तिने आरोप एअपपोर्ट प्रशासकांवर केला आहे. एखाद्याची मौल्यवान आणि खास वस्तू हरवली तर कोणाचाही संताप होऊ शकतो. जुहीचे हरवलेले कानातले तिला लवकरात लवकर मिळावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. काहींनी कंमेटद्वारे त्यांच्या भावना जुहीच्या ट्विटवर व्यक्त केल्या आहेत.
बॉलीवूडपासून का दूरावली जुही चावला
जुही सध्या बॉलीवूडच्या ग्लॅमरस दुनिया आणि लाईमलाईटपासून दूर आहे. नव्वदीचा काळ असा होता जेव्हा तिच्या अभिनय आणि सौंदर्याचे अनेक चाहते होते. ती त्या काळातील एक लीड अक्ट्रेस म्हणून ओळखली जायची. 1967 साली जुही चावला मिस इंडिया झाली. त्यानंतर जुहीने 1986 मध्ये सल्तनत या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख आमिरसोबत कयामत से कयामत तक या चित्रपटातून मिळाली होती. त्यानंतर तिने बॉलीवूडला आईना, बोल राधा बोल, हम है राही प्यार के, डर, इश्क, येस बॉस. ड्युप्लिकेट असे अनेक हिट चित्रपट दिले. लग्नानंतर जुही चावला हळू हळू चित्रपटातून दिसेनाशी झाली.1995 साली तिने जय मेहता या उद्योगपतीशी लग्न केलं. जुहीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मागच्या वर्षी मात्र जुही अनिल कपूर, सोनम कपूर आणि राज कुमार राव यांच्यासोबत ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात पुन्हा दिसली होती. मात्र तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. जुही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून ती तिच्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या बाळाचं काय असणार नाव, केला खुलासा
प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज
गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट