ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रोहीत जुईली लग्न

पाहा रोहित आणि जुईलीच्या लग्नाचा थाट, या सेलिब्सनी लावली होती हजेरी

 नुकतेच गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. सेलिब्स जोडप्यापैकी हे एक कपल अनेकांना माहीत आहे असे आहे. नुकताच या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. साखरपुडा,संगीत आणि लग्न या कार्यक्रमांना अनेक सेलिब्सनी गर्दी केली होती. या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण, नव्या जोडप्याचे फोटो आणि स्टाईल्स खास तुमच्यासाठी

प्रेक्षकांसह कलाकारांनाही उत्सुकता ‘लोच्या झाला रे’ची

जुईली- रोहीतने केले असे ट्विनिंग

हल्ली कपल ट्विनिंग पाहणे हे चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. जुईली आणि रोहितचा विवाहसोहळा ठेपेवाडा येथे पार पडला. अस्सल अशा या मरामोळ्या लग्नसोबळ्यात त्यांनी एकदम मस्त असे ट्विनिंग केले होते. साखरपुड्यासाठी जुईली दोन वेगवेगळ्या आऊट फिटमध्ये दिसली. यामध्ये जुईली पोपटी रंगाच्या पैठणी साडीवर दिसली होती. तर रोहितने कोटी जॅकेट आणि कुडता घातला होता. साखरपुड्यासाठी जुईलीने दुसरा पांढऱ्या रंगाचा आऊटफिट घातलेला आहे. तर दुसऱ्या आऊटफिटमध्ये म्हणजेच ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. 

मेंदी आणि हळदीचे त्यांचे फोटोज आता व्हायरल झाले असून हळदीसाठी मेरीगोल्ड थीम दिसत आहे. त्यामध्ये या दोघांनी पांढरे कपडे घातलेले दिसत आहे. 

ADVERTISEMENT


लग्न : लग्नासाठीही  तिने साडीचा हटके रंग घेतलेला दिसत आहे. लग्नात तिने वाईन रंगाची पैठणी नेसलेली असून रोहीतने तिला मॅच करण्यासाठी त्याने शेला हा त्या रंगाचा घेतला आहे. जो खूपच शोभून दिसत आहे.  

सेलिब्सची मांदियाळी

या लग्नाला काही मराठी सेलिब्सने हजेरी लावली होती. अनेकांनी या नव्या जोडप्यासोबत फोटो शेअर केले आहेत. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. ती. मितालीने या लग्नासाठी निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने वेणी घातली असून केसांना गजरा गुंडाळला आहे जो तिला खूप चांगला दिसत आहे. 

चँम्पसनी लावली हजेरी

लिटल चँम्पसच्या सेटवर ओळख झालेेले रोहीतचे लहान मित्र म्हणजेच कार्तिकी गायकवाड तिचा नवरा रोनित पिसे, याशिवाय मृण्मयी देशपांडे देखील अनेक फोटोमध्ये दिसत आहे.  कार्तिकीने लग्नात लाल रंगाची साडी नेसली आहे. तर मृण्मयीने मोती रंगाची साडी नेसली आहे. या दोघीही यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.  याशिवाय या फोटोमध्ये फुलपाखरु फेम यशोमन आपटे देखील दिसत आहे. तो फोटोमध्ये कुडता सेटमध्ये दिसत आहे. त्यामुळे एकदम ट्रेडिशनल दिसत आहे. 

ADVERTISEMENT

तुम्ही यांच्या लग्नाचे फोटो पाहिले नसतील तर तुम्ही सोशल मीडिया चाळायला हवा. कारण त्यामध्ये तुम्हाला अनेक फोटोज आणि व्हिडिओज मिळतील.

24 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT