ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘जून’ - नवी सुरूवात करून देणारा, मनाची घालमेल ओळखणारा

‘जून’ – नवी सुरूवात करून देणारा, मनाची घालमेल ओळखणारा

माणसाच्या मनाची घालमेल ओळखून त्यातून बाहेर पडणं हे ज्याचं त्याला जमायला हवं. पण त्यासाठी कोणाशी तरी आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे. विशेषतः सध्याच्या परिस्थितीशी अगदी मिळताजुळता असा हा चित्रपट नक्कीच वाटतो. प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलेला जून हा चित्रपट नवी सुरूवात करून देणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मनाची घालमेल नक्की काय असते आणि ती अशाच माणसाला समजू शकते जो त्या स्थितीतून जात असतो. अशाच दोन व्यक्ती नेहा आणि नीलची ही कथा अत्यंत सुंदररित्या गुंफण्यात आली आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी नक्कीच प्रेक्षकांना या कथेशी बांधून ठेवण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे असं म्हणता येईल. 

सिद्धार्थ आणि नेहाची अफलातून केमिस्ट्री

चित्रपटाची सुरूवात होते ती नेहा (Nehha Pendse) च्या घर सोडून जाण्याने. आपल्या नवऱ्याच्या जन्मगावी औरंगाबादला नेहा येते आणि तिथे तिची ओळख होते ती नील (Siddharth Menon) या मुलाशी. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला अनुत्तीर्ण झालेला नील आणि त्याच्या मनात असणारी घालमेल, कुटुंबाचा ताण, प्रेयसीबरोबर असणारे त्याचे वागणे या सगळ्याचा उत्तम मेळ सिद्धार्थ मेननने अप्रतिम साधला आहे. सिद्धार्थने या चित्रपटातून खूपच मनाला भेदणारा असा अभिनय केला आहे. त्याची होणारी घालमेल आणि नेहाच्या नवऱ्याला आदर्श मानणारा नील या सगळ्यात आपणही स्वतःला कुठेतरी शोधतो. आपल्याही मनाची काही बाबतीत अशीच घालमेल होत असते हे जाणवतं आणि इथेच सिद्धार्थ – नेहाचा अभिनय आणि दिग्दर्शकाचा आणि कथाकाराला विजय मिळाला आहे असं म्हणायला हवं. नेहा  दोन वर्ष ज्या मानसिक त्रासातून जात आहे त्याचे चित्रण नेहाने खूपच चांगले साकारले आहे. तर सहकलाकारांनीही तितकीच चांगली साथ दिली आहे. स्वतःला काहीतरी करून घेण्याचा विचारच नेहा आणि नीलला एकमेकांच्या जवळ आणतो. मानसिक आधाराची प्रत्येक माणसाला गरज असते आणि कोणत्याही परिस्थितीत तो महत्त्वाचा असतो हे पुन्हा एकदा या चित्रपटातून समोर आले आहे. 

संस्कृतीच्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ

विचारांची सुंदर गुंफण

प्रेम, घालमेल, स्वीकार, एखादी गोष्ट हरवणे, आदर, मैत्री आणि मनात जे आहे ते अगदी मनापासून व्यक्त होणे या सगळ्याची सुंदर गुंफण म्हणजे जून. चांगली कथा आणि चांगला अभिनय या दोन्हीची सांगड म्हणजे हा चित्रपट. अतिशय संवेदनशील अशी कथा आणि त्याचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. तसंच जी कथा आहे ती योग्यरित्या मांडून अभिनयाद्वारे त्याचे व्यवस्थित चित्रणही करण्यात आले आहे. यातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. लहानातील लहान असो पण प्रत्येक व्यक्तीरेखा योग्य तिथे अगदी चपखल बसली आहे. किरण करमरकरने साकारलेला मध्यमवर्गीय बाप असो अथवा रोहन मापुस्करची दलालाची भूमिका असो. प्रत्येक भूमिका लक्षात राहण्याजोगी आहे. रेशम श्रीवर्धन या नव्या अभिनेत्रीही प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेतलं आहे. नीलवर मनापासून प्रेम करणारी पण आई – वडिलांच्या दबावाखाली असणारी निकीदेखील लक्षात राहाते. पण सर्वात जास्त भाव खाऊन गेला आहे तो सिद्धार्थ मेननचा अभिनय. अतिशय नैसर्गिक आणि सहज असा अभिनय सिद्धार्थने केला आहे.  तर नेहमी ग्लॅमरस दिसणारी नेहा, अगदी साध्या आणि अशा भूमिकेतही भाव खाऊन गेली आहे. 

ADVERTISEMENT

अभिनेत्री सुरभी हांडे दिसणार देवी सप्तश्रृंगीच्या भूमिकेत

प्रत्येकाला संकटांना सामोरं जायचंय

प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातील संकटाला स्वतःलाच सामोरं जायचं आहे. पण कित्येक वेळा आपण प्रत्येक संकट हे एकट्याने नाही झेलू शकत. तुमच्यासह तुमचा मित्रपरिवार अथवा कुटुंबाचा पाठिंबाही लागतोच. शेअरिंग, कोणीतरी ऐकणारं, समजून घेणारं हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात गरजेचे असते. मन मोकळे होणे गरजेचे असते आणि त्यातूनच आपण पुन्हा नवी सुरूवात करू शकतो. हाच या कथेचा गर्भितार्थ आहे. पण मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मला एक नवी आणि चांगली सुरूवात या चित्रपटाने करून दिली आहे असं म्हणावं लागेल. 

दयाबेनची रिप्लेसमेंट नाही पण सध्या ही दयाबेन होतेय हिट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT