ADVERTISEMENT
home / मनोरंजन
jurassic world dominian

ज्युरासिक वर्ल्ड : डॉमिनियन 10 जून 2022 रोजी थिएटरमध्ये झळकणार

जेव्हापासून युनिर्व्हसल पिक्चर्सने बहुचर्चित ज्युरासिक वर्ल्ड : डॉमिनियनचे ट्रेलर प्रदर्शित करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला तेव्हापासून डायनासॉर प्रेमींमध्ये जुरासिक वर्ल्ड: डॉमिनियनच्या नवीन ट्रेलरचीच चर्चा सुरु आहे. ज्युरासिक वर्ल्ड मधील या आगामी चित्रपटाचे ट्रेलर बघून हा अंदाज नक्कीच येतोय की चित्रपटात अनेक थरारक घटना घडणार आहेत. ज्युरासिक वर्ल्ड सीरीजमधला तिसरा आणि एकंदर ज्युरासिक पार्क फ्रँचाईझीमधला सहावा सिनेमा असलेला डॉमिनियन 10 जून 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

ज्युरासिक पार्कने पहिल्यांदा लोकांमध्ये डायनॉसॉरचे आकर्षण निर्माण केले 

1993 साली आलेल्या ज्युरासिक पार्क या चित्रपटाने त्या काळात डायनॉसॉरचे सर्वात अचूक चित्र उभे केले होते. या चित्रपटामुळे डायनॉसॉरबद्दलचे तत्कालीन वैज्ञानिक ज्ञान सार्वजनिक डोमेनवर आले आणि अनेक लोक जीवाश्मशास्त्राबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक झाले. तेव्हापासून आतापर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि डायनासॉरबद्दल अधिक अचूक माहिती शास्त्रज्ञांनी मिळवली आहे त्यामुळे आता पहिल्या चित्रपटात जसे डायनासॉरचे चित्रण केले होते ते आता अचूक राहिलेले नाही. परंतु डॉमिनियन मध्ये डायनॉसॉर्सचे विज्ञानाधिष्ठित अचूक चित्र बघायला मिळेल असे ट्रेलर बघूनच लक्षात येते आहे.

अधिक वाचा – माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क, काय आहे खासियत

डायनॉसॉर विरुद्ध मानव असा सामना पुन्हा रंगणार 

Pinterest

ज्युरासिक वर्ल्ड फॉलन किंग्डम मध्ये इस्ला न्युब्लार नष्ट झाल्यापासून चार वर्षांनी डॉमिनियनमधील घटना घडतात. ज्युरासिक वर्ल्ड फॉलन किंग्डमच्या शेवटी इस्ला न्यूब्लारच्या बंदिवासातून सुटका झाल्यानंतर डायनॉसॉर्स आता जगभरात सगळीकडे मुक्तपणाने संचार करत आहेत. ते मानवांबरोबरच राहून शिकार करत आहेत. आता मानव व डायनासॉर त्यांच्यातल्या अस्थिर व नाजूक समतोलावर भविष्य काय असेल हे ठरेल. परत एकदा मानवच पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ ठरेल की हे सर्वात शक्तिशाली आणि भीतीदायक प्राणी मानवावर व पृथ्वीवर वर्चस्व मिळवतील हे आता  बघायचे. 

ADVERTISEMENT

खिळवून ठेवणाऱ्या या ट्रेलरमध्ये धाडसी आणि थरारक ज्युरासिक वर्ल्डचा आत्मा पुरेपूर उतरलेला आहे. अगदी पहिल्याच सीनपासून आ -वासायला लावणाऱ्या या ट्रेलरमध्ये शेवटी येत असलेल्या ज्युरासिक काळात डायनॉसॉर्सचा आकार आणखी मोठा आणि भयानक झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्युरासिक पार्क मधील नायक ऍलन ग्रँट आणि एली सॅटलर यांच्यातील सीन्स या फ्रँचाईझीच्या चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले डायनॉसॉर्स आणि मानव यांच्यातील पाठलागाचे थरारक सीन्स बघून प्रत्येकालाच हा चित्रपट बघण्याची  उत्सुकता लागली आहे. 

ज्युरासिक वर्ल्डचा पहिला व दुसरा भाग तसेच गार्डीयन्स ऑफ द गॅलॅक्सी आणि अव्हेंजर्स सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला ख्रिस प्रॅट तिसऱ्याही भागात डायनॉसॉर्स बरोबर दोन हात करताना दिसणार आहे. त्याबरोबरच ट्वायलाईट सीरिजमधून प्रसिद्धीस आलेली ब्रायस डलास हॉवर्ड सुद्धा तिसऱ्या भागात परत दिसणार आहे.

इतकी वर्षे हे डायनॉसॉर्स हे एकाच बेटावर धुमाकूळ घालत होते पण डॉमिनियन मध्ये मात्र डायनॉसॉर्स सगळीकडेच मुक्तसंचार करणार आहेत. ही, ज्युरासिक पार्क सीरिजमधील सिनेमांच्या नव्या काळाची सुरुवात असेल. ज्युरासिक पार्कच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे डॉमिनियनमध्ये सॅम नील हे डॉ. अलन ग्रँट यांच्या भूमिकेत तर  लॉरा डर्न या डॉ. एली सॅटलर यांच्या भूमिकेत तर जेफ गोल्डब्लम हे डॉ. इयन मॅल्कॉमच्या भूमिकेत परत दिसणार आहेत. हे जुने त्रिकुट ओवेन व क्लेअर बरोबर मानवाचे अस्तित्व वाचवण्यासाठी काय करतात हे चित्रपट बघितल्यावरच आपल्याला कळेल.  ज्युरासिक वर्ल्ड डॉमिनियन 10 जून रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. 

फोटो – Pinterest , DevianArt

ADVERTISEMENT

अधिक वाचा अखेर ही मराठी मालिका होणार बंद, कलाकार भावूक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT