जस्टिन बीबर जगातील एक लोकप्रिय पॉप सिंगर आहे. त्याच्या शोचं तिकीट मिळण्यासाठी चाहते जीवाचं रान करतात. मागच्या महिन्यात जस्टिनने विश्व दौरा करणार असं सांगून सुखावलं होतं. त्याच्या जस्टिस या नव्या म्युजिक अल्बमसाठी तो जगभरात लाइव्ह शो करणार होता. भारतात दिल्लीमध्ये 18 ऑक्टोबरला जस्टिनची म्युजिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनी जस्टिन भारतात येणार होता. याआधी 2017 मध्ये भारतात त्याचा शो झाला होता. जून महिन्यापासून या शोचं अॅडवान्स बुकिंगही सुरू झालं होतं. मात्र आता जस्टिनच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. जस्टिनने त्याचा विश्व दौरा पुढे ढकलला असून त्याचे नियोजित शो रद्द करण्यात आले आहेत. आता जस्टिनचा शो पाहण्यासाठी चा चाहत्यांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. ज्यामुळे विश्वभरातील चाहते नाराज झाले आहेत.
या कारणामुळे रद्द केले जस्टिने सर्व शो
जस्टिन 7 जूनला टोरंटोमधून विश्व दौऱ्याला सुरुवात करणार होता. मात्र त्याने अचानक सर्व शो रद्द केले आहेत. जस्टिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्याने शेअर केलं आहे की, ” मला स्वतःलाच यावर विश्वास नाही की मी हे करत आहे. मी स्वतःला बरं करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र माझी तब्येत जास्तच खराब होत आहे” जस्टिनने त्याच्या आजारपणामुळे हा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जस्टिनने त्याचे विश्व दौऱ्यातील सर्व शो काही काळासाठी पुढे ढकलले आहेत. जसं डॉक्टर सांगतील त्यानुसार तो आयोजकांना त्याच्या डेट्स देणार आहे. मात्र असं असलं तरी त्याने सोशल मीडियावर त्याला नेमकं काय झालं आहे हे जाहीर केलेलं नाही.
पूर्वीदेखील जस्टिनने रद्द केले आहेत शो
जस्टिनने त्याचे शो अचानक रद्द करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील बऱ्याचदा त्याने त्याचे शो पुढे ढकलले आहेत. 2020 मध्ये एकदा कोरोना महामारीमुळे त्याने शो रद्द केले होते तर दुसऱ्यांदा जस्टिनला कोरोना झाल्यामुळे त्याला शो रद्द करावे लागले होते. जस्टिनने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये युके आणि युरोपमध्ये काही शो केले होते. पण आता त्याने शो रद्द करण्यामागचं कारण कोरोना असल्याचं जाहीर केलेलं नाही. त्यामुळे जस्टिनला नेमकं काय झालं आहे याबद्दल चाहत्यांना चिंता वाटत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक