ADVERTISEMENT
home / मनोरंजन
भारतात पाच वर्षानंतर रंगणार Justin Bieber ची कॉन्सर्ट, चाहते झाले खूश

भारतात पाच वर्षानंतर रंगणार Justin Bieber ची कॉन्सर्ट, चाहते झाले खूश

जस्टिन बीबर (Justin Bieber)कॅनडामधील एक पॉप सिंगर आहे.जगभरात लोकप्रिय असल्यामुळे जस्टिनचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याची गाणी लाईव्ह ऐकण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडते. भारतातही त्याचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. तब्बल पाच वर्षानंतर जस्टिन भारतात येणार आहे त्यामुळे सध्या त्याचे भारतातील चाहते खूप खूष आहेत. 2017 मध्ये जस्टिनची भारतात कॉन्सर्ट झाली होती. त्यानंतर भारतीयांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी जस्टिन भारतात येत आहे.

जस्टिन कधी येणार भारतात

जस्टिन बीबर सध्या त्याच्या आगामी म्युजिक अल्बम ‘जस्टिस’ चं प्रमोशन करण्यासाठी वर्ल्ड टूरवर निघाला आहे. या टूर दरम्यान तो ऑक्टोबरमध्ये भारतात येणार आहे. भारताची राजधानी दिल्ली असल्यामुळे त्याने त्याच्या कॉन्सर्टसाठी दिल्ली शहराची निवड केली आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील जवाहर लाल नेहरू स्टेडिअममध्ये जस्टिनची एक मोठी कॉन्सर्ट आयोजित केली जाणार आहे. हा कार्यक्रम दिल्लीत 18 ऑक्टोबरला असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जस्टिन या शोमध्ये एकूण तीस परफॉर्मन्स देणार आहे. चाहत्यांसाठी ही एक खास संगीत मेजवानीच असेल. जस्टिनच्या शोचं तिकीट मिळणं किती कठीण आहे याची सर्वांना कल्पना आहे. म्हणूनच या शोचं तिकीट अडवान्स बुक करावं लागणार आहे. जस्टिनला लाईव्ह पाहण्यासाठी चाहत्यांना चार जूनपासून तिकीट बूक करता येईल. जस्टिन बीबर त्याच्या या अल्बमचं प्रमोशन एकूण तीस देशांमध्ये करणार आहे. त्याच्या या विश्व दौऱ्यात तो एकूण 125 कार्यक्रम करणार असल्याची चर्चा आहे.

मागच्य वेळी जस्टिन अडकला होता या कॉन्ट्रव्हर्सीत

पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये जस्टिन जेव्हा भारतात आला होता. तेव्हा तो एका कॉन्ट्रव्हर्सीमध्ये अडकला होता. कारण जस्टिन बीबर येणार म्हणून लोकांनी त्याच्या शोची महागडी तिकीट खरेदी केली होती. पण नंतर काही लोकांनी असा दावा केला की या कॉन्सर्टमध्ये जस्टिनने गाणं गायलंच नव्हतं. जस्टिनचा कार्यक्रम लाईव्ह नव्हता तर त्याने फक्त लिप सिंग केलं होतं. लोकांनी यामुळे जस्टिनची खिल्ली उड वली होती.  या शोसाठी जस्टिन जवळजवळ दोन दिवस भारतात थांबणार होता. मात्र त्याची खिल्ली उडवल्यामुळे तो रागावून एका दिवसातच भारतातून निघून गेला होता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT