गायक नेहा कक्करच्या लग्नाचा बार उडत नाही तोच दृश्यम फेम अभिनेत्री काजल अग्रवालचेही मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पडले आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत. तिने लग्नामध्ये केलेले खास ब्रायडल शूटचे हे फोटो असून तिने निवडलेल्या लाल रंगाच्या घागरा चोळीमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिने घातलेल्या लेहंग्यासोबतच तिची ज्वेलरीही अगदी छान उठून दिसत आहे. जाणून घेऊया. काजल अग्रवालच्या या लुकबद्दल आणि तिच्या या लग्नसोहळ्याबाबत अधिक गोष्टी
अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या घरी आला नवा पाहुणा
लाल-गुलाबी रंगाचा डिझायनर लेहंगा
सेलिब्रिटी लग्नं म्हटली की, त्यांनी लग्नात काय घातले ही पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. साखरपूडा-संगीत- मेहंदी-लग्न असे वेगवेगळे सोहळे कशापद्धतीने साजरे केले जातात याच्या व्हिडिओची प्रतिक्षा अनेकांना असते. काजल अग्रवालने या आधीही तिच्या लग्नसोहळ्यातील काही कार्यक्रमांचे व्हिडिओ आधीच पोस्ट केले होते. पण तिचा लग्नाचा लुक तिने शेअर केल्यानंतर तिच्या लेहंग्याची तारीफ केली जात आहे. डिझायनर अनामिका खन्नाने तिचा हा लेहंगा तयार केला असून लाल-गुलाबी अशा पारंपरिक रंगाचा उपयोग यामध्ये करण्यात आला आहे.या लेहंग्यावर असलेली बारीक कलाकुसर ही त्याहून अधिक उठून दिसत आहे. काजल अग्रवालच्या लेहंग्यासोबत उठून दिसत आहेत ते म्हणजे तिची ज्वेलरी. काजलने हेव्ही लेंहग्यासोबत ज्वेलरी ही तितकीच हेव्ही घालण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा हातातला चुडा पाहिल्यानंतर त्याचा अंदाज येतो. पण तुलनेने कमरपट्टा, चोकर, मांगटिक्का आणि नथही नाजूक पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तिचा हा लुक फार उठून दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत डिझायनरचे मनापासून आभार मानले आहेत.
Bigg Boss14 :एजाज- कविताच्या मैत्रीत फूट, एजाजवर केले आरोप
पंजाबी- काश्मिरीपद्धतीने झाले लग्न
काजल आणि गौतम किचलू यांच्या लग्नाचे विधीही वेगवेगळ्या पद्धतीने झाले आहेत. काजल पंजाबी असल्यामुळे पंजाबी पद्धतीने आणि गौतम किचलून काश्मिरी असल्यामुळे काश्मिरी पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न पार पडले आहे. त्यामुळे हे लग्न बरेच वेळ चालले.कोरोना असल्यामुळे या लग्नाला किती जणांची उपस्थिती होती हे कळू शकलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत कमी आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत काजलचा हा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
गौतम किचलूने लग्नानंतरचा फोटो केला शेअर
गौतम- काजलचे लग्न नुकतेच पार पडले आहे. दोघांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. पण गौतमने काजलचा शेअर केलेला एका फोटो सध्या जास्तच वायरल होत आहे. लग्नसोहळा आटोपल्यानंतर काजल अग्रवाल तिच्या अगदी घरच्या कपड्यांमध्ये आणि डोळ्याला चश्मा लावलेली दिसत आहे. तिने फोटोसाठी तोंड वाकडं केलं असून लग्नानंतर सुटकेला नि:श्वास सोडत अगदी रिलॅक्स झालेली दिसत आहे. गौतमने हा फोटो शेअर करत मिसेस किचलू म्हणून उठताना अशी कॅप्शन लिहून हा फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोवर अनेकांच्या प्रतक्रिया येत आहेत.
काजलच्या लग्नानंतर आता कोणती बॉलिवूड अभिनेत्री लग्नासाठी बोहल्यावर उभी राहणार किंवा कोणात्या लग्नाच्या चर्चा होणार ते पाहुयात.
प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात