अभिनेत्री काजल अग्रवालला काही दिवसांपूर्वीच एक गोंडस मुलगा झाला. त्यानंतर काजलच्या बहिणीने निशा अग्रवालने काजल आणि गौतम किचलूच्या बाळाचे नाव सोशल मीडियावर जाहीर केलं. काजलने तिच्या बाळाला नील असं गोड नाव दिलं आहे.आता बाळंतपणानंतर पहिल्यांदाच काजल सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. तिने तिच्या बाळंतपणानंतरच्या काळाचा प्रवास सुंदर शब्दात मांडत तिच्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
बाळंतपणानंतर कसं वाटतंय काजलला
काजलने सोशल मीडियावर एक प्रेगनन्सीमधील एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने गोल्डन रंगाचा ड्रेस अंगावर गुंडाळला आहे. मात्र त्यासोबत शेअर केलेला प्रवास नक्कीच तुमच्या भावनांना हात घालणारा आहे. काजलने शेअर केलं आहे की, माझा मुलगा नीलचं या जगात स्वागत करताना मी खूपच आनंदी आणि उत्साही आहे.बाळाचा जन्म होतानाचा अनुभव खूप उत्साहवर्धक, वेळकाढू पण तरिही मनाला आनंद देणारा होता. बाळाची नाळ वेगळी करत त्याला कुशीत घेताना मला जे वाटलं ते मी शब्दात कधीच मांडू शकत नाही.पण तरिही हा प्रवास वाटतो तितका सहज सोपा नक्कीच नव्हता. तीन रात्र न झोपता काढणं, सकाळी सकाळी ब्लिडिंग, खेचलेली त्वचा, सुकलेले आणि घट्ट झालेले पॅड्स, ब्रेस्ट पंप आणि सतत असलेली अनिश्चितता. सगळं काही एकाच वेळी होत असतं ज्यामुळे चिंता काळजी वाढत राहते. खूप भीती वाटत होती. पण यातही असे काही क्षण आहेत ज्यामध्ये मी माझ्या बाळाला जवळ घेतलं, त्याच्या डोळ्यात पाहिलं, काही क्षण असे आहेत जेव्हा मला जाणवलं की आम्ही दोघंही एकत्र वाढतोय, शिकतोय. काजलने एक मोठी नोट लिहीत हा प्रवास चाहत्यांसमोर मांडला आहे. शेवटी तिने लिहीलं आहे की, “प्रसूतीनंतरचा प्रवास ग्लॅमरस नसला तरी सुंदर नक्कीच असतो”
काजलवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
काजल अग्रवाल आई झाल्यावर तिने शेअर केलेल्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रेटींनी तिला आणि बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत. काजल अग्रवाल आणि गौतम अग्रवाल यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केलं होतं. कोरोनामुळे साधेपणाने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर 19 एप्रिल 2022 ला काजलने मुलाला जन्म दिला.जानेवारी महिन्यात तिने तिची प्रेगनन्सी सोशल मीडियावर जाहीर केली होती.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक