नेहा कक्कडनंतर बॉलीवूडची सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल आता लग्नाच्या बोहल्यावर चढत आहे. तीस ऑक्टोबरला म्हणजे उद्या काजल तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत लग्न करत आहे. काजलच्या घरी लग्नाआधीच्या विधींना अगदी जोरदार सुरूवात झाली आहे. काल बहिणींसोबत पजामा पार्टी केल्यानंतर काजलने आता तिचे मेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये काजल खूपच क्युट दिसत आहे. पाहा तिच्या घरी लग्नाची नेमकी काय काय धमाल सुरू आहे.
काजलच्या घरातील वातावरण सेलिब्रेशन मोडमध्ये असलेलं या फोटोंमधून जाणवत आहे. मेंदीच्या फोटोंआधी तिने तिचे काही एथनिक लुकमधले फोटोदेखील चाहत्यांसाठी शेअर केले होते. मोरपंखी रंगाच्या या एथनिक लुक सूटमध्ये काजल खूप सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आता नववधूची लाली चढण्यास सुरूवात झाली आहे.
काजलने बहिणीसोबत केलं पजामा पार्टी फोटोशूट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काजल कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहे.ज्यामुळे या लग्नासाठी अगदी मोजक्याच निमंत्रकांना बोलवण्यात आलं आहे. मात्र कमी लोक असले तरी हे लग्न थाटामाटात करण्याचा तिच्या कुटुंबियांचा बेत आहे. काजलची बहीण निशाने तिच्या लग्नाचं पू्र्ण नियोजन केलं आहे. त्यामुळे घरात लग्नाचा थाटमाट इतर लग्नाप्रमाणेच करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 28 ऑक्टोबरला काजलच्या हातावर ब्रायडल मेंदी काढण्यात आली. ज्या फोटोंमध्ये काजल खूपच क्युट दिसत होती. आज तिच्या हळदीच्या कार्यक्रमाची धूम घरात असणार आहे.
काजल अग्रवालने दसऱ्याच्या दिवशी तिचा भावी पती गौतम याच्यासोबत काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले होते. ज्यामध्ये त्या दोघांची जोडी फारच सुंदर दिसत होती. तिच्या पजामा पार्टीच्या फोटोंसोबत तिच्या बहिणीने शेअर केलं होतं की, ” काजलसाठी आम्ही खूप खुश आहोत. ती लवकरच तिच्या जीवनातील नवीन प्रवासाला सुरूवात करत आहे ” लग्नाआधी काजलला तिच्या घरच्यांसोबत चांगला वेळ घालवायचा होता. पजामा पार्टीतून तिने तिचं तिच्या घरच्यांबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त केलं होतं. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच काजलने तिच्या लग्नाची घोषणा चाहत्यांसमोर केली होती. गौतम किचलू हा काजलचा बॉयफ्रेंड असून तो एक बिझनेसमेन आहे. गौतमचा इंटिरिअर डिझाई आणि होम डेकोरचा उदयोग आहे.
काजलला चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
काजलने 2004 साली क्यो हो गया ना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्यासोबत तिने या चित्रपटात काम केलं होतं. यात तिने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं ज्यामुळे तिला स्वतःची ओळख मिळाली. पुढे 2011 साली रोहीत शेट्टीने तिची निवड सिंघम चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी केली. काजलने स्पेशल 26 आणि दो लफ्जो की कहानी या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. काजलची मुख्य भुमिका असलेला मुंबई सागा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यात ती अभिनेता जॉन अब्राहिमसोबत काम करताना दिसेल. काजल बॉलीवूडप्रमाणेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग नक्कीच खूप मोठा आहे. काजलच्या लग्नासाठी चाहत्यांनी आतापासूनच इन्स्टाग्रामवर शुभेच्छांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात
गळ्यात मंगळसूत्र दिसल्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चेला उधाण, फोटो व्हायरल
Bigg Boss 14 : राहुल वैद्यची वाढतेय क्रेझ, प्रेक्षकही देतायत दाद