ADVERTISEMENT
home / मनोरंजन
kajol-and-mother-tanuja-special-appereance-in-kon-honar-crorepati-in-marathi

पहिल्यांदाच विशेष अतिथी म्हणून काजोल आणि आई तनुजाची ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उपस्थिती

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) आणि लाडकी अभिनेत्री काजोल (Kajol) ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघींमधला अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. या दोघी जणी ‘एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर’ (ADAPT)  या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) हा खेळ खेळणार आहेत.

आई आणि मुलीच्या नात्याचे उलगडणार बंध!

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच विशेष भागात (Special Episode) ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ह्या दोघी सहभागी होणार आहेत. या भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत , काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांच्याशी संवाद साधताना होणार आहे. तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक, दिग्दर्शक निरंजन अय्यंगार (Niranjan Iyengar) आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर (Bharti Achrekar) हेही या भागात उपस्थित असणार आहेत. काजोलला ‘बाजिगर’च्या सेटवर शाहरूख खान (Shah Rukh Khan) का ओरडला होता, काजोलचा पहिला सिनेमा बघताना तनुजाने तिचा हात घट्ट का धरून ठेवला होता, तनुजा यांच्या ‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) या नाटकाचे अनुभव;  अशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टींनी हा विशेष भाग  रंगलेला असल्याने प्रेक्षकांसाठी  विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग निश्चितच पर्वणी ठरणार आहे. सध्या या विशेष भागाचे प्रोमो खूपच व्हायरल होत आहेत. आपल्याला संपूर्ण वेळ मराठीत बोलावं लागणार यासाठी आपण अजिबात नर्व्हस नसल्याचे काजोलने बिनधास्त सांगितलं आणि दुसऱ्याच क्षणाला आपल्या आईला हाक मारत मदत मागितली. त्यामुळे हा भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच तुफान धमाल ठरणार असल्याचे या प्रोमोवरून दिसून येत आहे. तर मराठी करोडपतीच्या भागात पहिल्यांदाच काजोल आणि तनुजाने उपस्थिती लावली आहे. 

मस्तीखोर काजोलची धमाल 

‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातील पहिल्याच आठवड्यातील विशेष भागात विशेष पाहुणे म्हणून तनुजा आणि काजोल या सहभागी होणार आहेत. मुंबईतील ‘एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर’ (ADAPT)  या संस्थेसाठी या दोघी ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी  या पर्वातील पहिल्याच विशेष भागात तनुजा आणि काजोल यांना खुबीने बोलतं केलं आहे. लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते, तनुजा यांना  गुजराती, जर्मन, बंगाली इत्यादी दहा भाषा अस्खलित कशा काय बोलता येतात, त्यांना भाषांची आवड कशी निर्माण झाली, काजोल सेटवर धडपडली की पिक्चर हिट होतो, अशी अफवा सिनेमाक्षेत्रात अनेक वर्षं आहे; त्यामध्ये कितपत तथ्य आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पहिल्याच विशेष भागात मिळणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग , शनिवार 11 जून रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT