ऑस्कर पुरस्कार हा जगभरात चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि मानाचा असा पुरस्कार आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळणं देखील देशभरातील कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट मानली जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ऑस्कर पुरस्काराची कलारसिक मंडळी आतुरेतेने वाट पाहत असतात. या पुरस्कारांसाठी दरवर्षी एक नवीन सदस्य समिती तयार केली जाते. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी अॅकेडमीने नुकतीच गेस्ट लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतातील एकूण पाच सेलिब्रेटीजनां आमंत्रित करण्यात आलं आहे. या वर्षी या लिस्टमध्ये जगभरातून एकूण 397 लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि साऊथचा सुपरस्टार सूर्याचा समावेश आहे.
काजोलवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
बॉलीवूडमधून काजोलला या पुरस्कार सोहळ्याच्या समिती सदस्याचे आमंत्रण मिळाले आहे. बॉलीवूडसाठी ही गोष्ट सहाजिकच अभिमानास्पद आहे. काजोलचे नाव जाहीर होताच बॉलीवूडमधून काजोलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काजोलला पुढच्या महिन्यात बॉलीवूडमध्ये तीस वर्ष पूर्ण होणार आहेत. जर काजोलने हे निमंत्रण स्वीकारलं तर ती पुढच्या वर्षी ऑस्करसाठी तिचं मतदान करू शकते. अजय देवगणने ट्वीट करत काजोलचं यासाठी जाहीर अभिनंदन केलं आहे. त्याने तिच्याबद्दल त्याला अभिमान वाटत आहे अशा शब्दात शुभेच्छा काजोलला दिल्या आहेत. पुढचं वर्ष हे ऑस्कर पुरस्काराचे 95 वे वर्ष असणार आहे. काजोल आधी ए आर रहमान, अमिताभ बच्चन, शाहरूख खान, विद्या बालन, अली अफजल, आदित्य चोप्रा, गुनीत मोगा, एकता कपूर, शोभा कपूर, आमिर खान, सलमान खान या लिस्टमध्ये पूर्वी सहभागी झाले होते. यंदा हा मान बॉलीवूडमध्ये काजोलला मिळाला आहे. अॅकेडमीने मंगळवारी त्यांच्या वेबसाईटवर ही लिस्ट जाहीर केली आहे. त्यात जगभरातील अशा कलाकारांची नावे आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीसाठी मोठं योगदान आजवर दिलेलं आहे.
काजोल सह आणखी पाच भारतीयांचे नाव या लिस्टमध्ये
काजोलसोबत साऊथचा हिरो सूर्या या लिस्टमध्ये आहे. सूर्याचे सोरारई पोट्रु आणि जय भीम हे चित्रपट नुकतेच सुपरहिट ठरले आहेत. ज्यामुळे सूर्याची जगभरात एक विशेष ओळख निर्माण झाली आहे. तसंच लेखिका, पटकथा लेखिका आण निर्माती असलेली निमा कागतीसुद्धा या लिस्टमध्ये असेल. रीमाने जोया अख्तरसह जिंदगी ना मिलेगी दोबारा, तलाश, गली बॉय या चित्रपटांसाठी पटकथा लेखन केलं होतं. यासोबत चित्रपट निर्माती सुश्मिता घोष, रिंटू थॉमस आणि पान नलिन यांचे या लिस्टमध्ये नाव आहे. सुष्मिता आणि रिंटू यांच्या ‘रायटिंग विथ फायर’ या प्रोजेक्टला यंदा अॅकेडमी पुरस्कारासाठी बेस्ट डॉक्युमेंट्री फिचरचं नॉमिनेशन मिळालं होतं. तसंच अॅंग्री इंडियन गॉडेसेस आणि लास्ट फिल्म शो सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या पान नलिनलाही या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक