अभिनेत्री काजोलला बॉलीवूडमध्ये नुकतीच तीस वर्षे पूर्ण झाली आहे. गेल्या तीस वर्षात तीने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. निरनिराळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता ती याच उत्साहात वेबसिरिजच्या दुनियेत स्वतःचं पाऊल रोवण्यास सज्ज झाली आहे. वास्तविक मागच्या वर्षी नेटफ्लिक्सवरील ‘त्रिभंगा’मधून तिने डिजिटल माध्यमात पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर इच्छा असूनही ती या माध्यमात काम करू शकली नव्हती. आता मात्र काजोल एका नव्या वेबसिरिजमधून डिस्ने प्लस हॉटस्टारवरून ओटीटीच्या दुनियेत पुन्हा पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे याची घोषणा तिने स्वतःच एका हटके स्टाइलने केली आहे.
शोचा टीझर आहे मजेशीर
काजोलने स्वतःच या वेबसिरिजची घोषणा केली आहे. सहाजिकच ही वेबसिरिज महिला प्रधान असणार असल्याने यात काजोलचा बराच काळ सहभाग असणार आहे. या शोचं टीझर प्रदर्शित झालं असून त्यात काजोल चक्क पाठमोरी दिसत आहे. बॅकग्राउंडला डीडीएलजे म्हणजेच तिच्या लोकप्रिय चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील एक प्रसिद्ध डायलॉग सुरू आहे. यात काजोलने मी लवकरच ओटीटीवरील या नव्या शोमधून तुमच्यासमोर येत आहे अशी घोषणा केली आहे.
काय आहे हा नवा शो
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा शो एक महिला आणि तिच्या प्रवासाच्या कथेवर आधारित शो असणार आहे. ज्यात काजोल एक पत्नी आणि आईची भूमिका साकारणार आहे. काजोलही या शोसाठी तितकीच उत्सुक आहे जितके प्रेक्षक आहेत. कारण तिलाही नवीन गोष्टींचा वेध घेणं, त्याप्रकारची आव्हाने स्वीकारणं खूप आवडतं. ती स्वतः या माध्यमाची चाहती असल्यामुळे तिला अशा एका हटके प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर यायचं होतं. आर्या आणि रूद्र सारख्या हिट वेबसिरिज पाहता काजोललाही या माध्यमाकडे वळण्याचा मोह आवरता आलेला नाही. मात्र असं असलं तरी अजून या वेबसिरिज बाबत अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. दी फॅमिली मॅनचा दिग्दर्शक सुपर्ण वर्मा ही वेबसिरिज दिग्दर्शित करणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक