अजय आणि काजोल सध्या अतिशय कठीण काळाला सामोरे जात आहेत. कारण 27 मेला अजय देवगणचे वडील आणि काजोलचे सासरे वीरू देवगण यांचे निधन झाले. वीरू देवगन यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. शिवाय अजय आणि काजोल यांच्या जीवनात दुःखाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सासऱ्यांच्या जाण्यानंतर आता काजोलला आणखी गंभीर धक्का बसला आहे. नुकतच काजोलची आई आणि एके काळची दिग्गज अभिनेत्री तनुजा यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. तनुजा यांना प्रकृती अस्वास्थामुळे लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तनुजा यांचे वय पंचाहत्तर आहे.
तनुजा यांना का केलं आहे हॉस्पिटलमध्ये दाखल
तनुजा यांना नेमकं काय झालं आहे हे मात्र आतापर्यंत उघड करण्यात आलेलं नाही. मात्र आईला भेटण्यासाठी काजोल मंगळवारी रात्री लीलावती रूग्णालयात गेल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काजोलकडून तनुजाच्या तब्येतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तनुजांच्या आजारपणामुळे त्यांचे चाहते दुःखी झाले आहेत. शिवाय काजोल आणि अजयच्या जीवनात आलेल्या या एका पाठोपाठ एक दुःखद घटनांमुळे त्यांचे चाहतेदेखील भावुकदेखील झाले आहेत.
तनुजा एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्री
तनुजा म्हणजेच शोभना समर्थ यांची मुलगी आणि नूतनची बहीण. घरातूनच अभिनयाचा वारसा घेतलेल्या तनुजा यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती. तनुजा यांनी हिंदी, ंमराठी आणि बंगाली चित्रपटातून काम केलं आहे. बहारे फिर आयेंगी, ज्वेल थीफ, अनुभव असे त्यांचेअनेक चित्रपट हिट झाले. 2013 साली मराठीत ‘पितृऋण’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपनदेखील केले होते. तनुजा यांना काजोल आणि तनिशा या दोन मुली आहेत. काजोलने चित्रपटसृष्टीत स्वतःची चांगली ओळख मिळवली आहे. मात्र तनिशाला या क्षेत्रात विशेष यश मिळवता आलं नाही. काजोलचं तिच्या आईवर जीवापाड प्रेम आहे.
अजय आणि काजोल यांच्या जीवनात दुःखाचा ससेमिरा
27 मे ला वीरू देवगन यांची तब्येत अचानक बिघडली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीरू देवगन घरी जेवता जेवता अचानक कोसळले. काजोलने त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र वीरू देवगन यांचे कार्डिएक अरेस्टमुळे त्यांचे निधन झालं. वास्तविक वीरू देवगन काही दिवसांपासून आजारी होते. मात्र वीरू देवनग यांच्या अशा अचानक जाण्याने अजय आणि काजोल यांच्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळला. काजोल सासऱ्यांची स्वतः काळजी घेत होती. या शिवाय आता काजोलच्या आईचीदेखील तब्येत बिघडल्यामुळे काजोल आणि अजय दुःखी झाले आहेत. त्यामुळे या संकटातून तनुजा सुखरूप परत आपल्या घरी जाव्या यासाठी तनुजांचे चाहते प्रार्थना करीत आहेत.
अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन
मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’ चा ट्रेलर प्रदर्शित
एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम