ADVERTISEMENT
home / मनोरंजन
केआरकेचे ट्विट

केआरकेने आमीर खानविरोधात केले असे ट्विट की होऊ लागले चर्चा

 केआरके (kamaal khan) कधी काय बरळेल सांगता येत नाही. पण तरीही त्याच्या ट्विटकडे लक्ष जावे असेच काही तरी तो करत असतो. आता त्याने पुन्हा एकदा असे काही ट्विट केले आहे की, तो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण आमीरच्या एका ट्विटची खिल्ली उडवत त्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर संकट ओढवून घेतले आहे. आमीर खानने (Aamir khan) काश्मीर फाईल्स चित्रपट सगळ्या भारतीयांनी पाहावा याचे आवाहन केले होते. पण केआरकेला हे काही रुचले नसावे. त्यामुळे आमीरच्या खासगी आयुष्यावर त्याने एक ट्विट केले आहे. काय आहे हे ट्विट चला घेऊया जाणून 

भाईंनी देश नाही बायकोला सोडले

आता हे प्रकरण काय? असा तुम्ही विचार करत असाल तर सध्या काश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची खूप जणांनी स्तुती केली आहे. तर खूप जणांनी देशासाठी हा एक हानिकारक चित्रपट असल्याचे देखील म्हटले आहे. पण आमीरने हा चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. आमीरने एका मुलाखती दरम्यान त्याने हे मत व्यक्त केले. तो म्हणाला की,, प्रत्येक देशवासियांनी पाहावा असा हा चित्रपट आहे. काश्मिरी पंडितांनी जे काही सोसलं आहे.  त्यांनी जे भोगलं त्यांच्यावर बनवलेला हा चित्रपट आहे. जो लोकांना माहीत असायला हवे. हे ट्विट त्याने केल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. पण केआरकेने मात्र एक नवा वादच उभा केला आहे. त्याने यावर आपले मत मांडताना ट्विट केले आहे. ज्याम्ध्ये त्याने आमीर खानच्या घटस्फोटाबद्दल खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाला केआरके

काही वर्षांपूर्वी आमीरची पूर्व पत्नी किरण रावने देशात भीती वाटते. देश सोडून जावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्या दोघांनी देशामध्ये चाललेल्या गोष्टीवरुन आपले मत मांडले होते. ज्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. कारण अशापद्धतीने देशाचा अपमान करणे कोणालाही पटलेले नव्हते. दिवस गेले तसे या वक्त्यावर पडदा पडला. पण आता या नव्या ट्विटच्या निमित्ताने केआरकेने त्याची आठवण करुन दिली आहे. केआरकेने ट्विट लिहित म्हटले की, आमीर खान हा देशभक्त असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. कारण देशात भीती वाटते. देश सोडून जावासा वाटतो असे म्हणणाऱ्या त्याच्या पत्नीला त्याने सोडले पण देश सोडला नाही. असे म्हणत त्याने त्याची खिल्ली उडवली आहे. इतक्या वर्षांनी या जु्न्या वक्तव्याची आठवण करुन दिल्यामुळे आता पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटणार आहे. 

आमीर खानने केला होता घटस्फोटाचा खुलासा

आमीर खान याच्या घटस्फोटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या. यासाठी अभिनेत्री सना शेख जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. तिच्यासोबत असलेल्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले होते. पण आमीरने असे काहीही नसल्याचे सांगून आपण आपला स्वभाव जबाबदार असल्याचे सांगितले. पण असे असले तरी देखील या दोघांनी नात्यात असलेली जबाबदारी वेगळी केलेली नाही. आपल्या मुलांसाठी ते कायम एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

आता केआरकेच्या नव्या ट्विटबद्दल तुम्हाला काय वाटते ? आम्हाला नक्की कळवा. 

25 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT