रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील सर्वाधिक उत्साही आणि नेहमी चर्चेत असणारा अभिनेता समजण्यात येतो. मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रणवीर सिंगने कुठेही कोणतेही वक्तव्य केले नाही अथवा त्याने कोणताही पाठिंबाही दर्शवला नाही. त्यामुळे आता रणवीर सिंगवर अभिनेता कमाल आर. खान याने टीका करत खळबळजनक आरोपही केला आहे. कमाल आर. खान अर्थात केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. वेगवेगळ्या सेलिब्रिटींवर टीका करून केआरके नेहमीच त्यांना लक्ष्य करत असतो. आता त्याने मोर्चा वळवला आहे तो रणवीर सिंगकडे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पण आता केआरकेने रणवीरवर हल्लाबोल केला आहे. सिमॉन खंबाटा हे नवीन नाव या प्रकरणात आले असून सिमॉन ही रणवीरची अत्यंत जवळची मैत्रीण असल्यानेच जस्टिस फॉर सुशांत या मोहिमेत रणवीर सहभागी झाला नाही असा आरोप आता केआरकेने लावला आहे.
बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करण्याची स्टारकिडची ‘प्रक्रिया’ सुरू
सिमॉन खंबाटा रणवीरची मैत्रीण – ट्विट व्हायरल
Mystery girl #SimoneKhambatta is the best friend of both #RanveerSingh and #RheaChakraborthy! This is the reason, Ranveer didn’t support #Sushant!#CBIForSSR #JusticeForSSR
— KRK (@kamaalrkhan) August 24, 2020
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाता आता सिमॉन खंबाटाचे नाव घेण्यात येत आहे. सिमॉन ही रियाची मैत्रीण असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आपण रियाला ओळखतही नसल्याचे सिमॉनने सांगितले आहे. तर या प्रकरणात केआरकेने रणवीरवर खळबळजनक आरोप केले आहेत. ‘मिस्ट्री गर्ल सिमॉन खंबाटा रणवीर सिंग आणि रिया चक्रवर्तीची जवळची मैत्रीण आहे. म्हणूनच रणवीरने जस्टिस फॉर सुशांत या मोहिमेत सहभाग घेतला नाही’ असं ट्विट केआरकेने केलं आहे. सध्या केआरकेचं हे ट्विट व्हायरल होत आहे. केआरके नेहमीच कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला डिवचत असतो आणि बरेचदा सेलिब्रिटी त्यावर आपली प्रतिक्रियादेखील देतात. मात्र रणवीर सिंगने आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान रणवीर आणि दीपिका नुकतेच बंगळूरूवरून मुंबईत परतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियावर जास्त पोस्ट शेअर केल्या नाहीत. मात्र आपल्या चाहत्यांसाठी मधून मधून दोघेही लाईव्ह येत असतात अथवा एखादी पोस्ट शेअर करत असतात. आता केआरकेच्या या आरोपांवर रणवीर नक्की काय उत्तर देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.
अजय देवगण पहिल्यांदाच करणार यशराज बॅनरमध्ये काम, अहान पांडेचे पदार्पण
सुशांत प्रकरणाला वेगळे वळण
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हे आता सीबीआयकडे सोपविण्यात आले असून यामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वा अन्वये सध्या टीम या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सीबीआयकडून सुशांतच्या घरी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसंच सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्टही चुकीचा होता असं सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांकडून सर्वा कागदपत्र हस्तगत करण्यात आली असून सुशांतच्या मृत्यूविषयी रोज काहीतरी नव्या गोष्टी समोर येत आहेत.
एस. एस. राजमौलीच्या ‘RRR’ मध्ये आता आलियाऐवजी प्रियांकांची वर्णी
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा