ADVERTISEMENT
home / आरोग्य
कांदा खाण्याचे फायदे

कांद्याचे फायदे , आरोग्य आणि सौंदर्यासाठी (Kandyache Fayde)

कांद्याला भारतात ‘कृष्णावळ’ असंही म्हणतात, कारण कांदा उभा चिरला तर तो शंखाकृती आणि आडवा चिरला तर चक्राकृती दिसतो. ‘शंख’ आणि ‘चक्र’ ही श्रीकृष्णाची शस्त्रे असल्यामुळे आणि कांद्यात त्याचे प्रतिक दिसत असल्यामुळे कांद्याला कृष्णावळ असं म्हटलं जातं. एवढंच नाही भारतीय खाद्यसंस्कृतीत कांदा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कांद्याशिवाय अथवा कांदा-खोबऱ्याच्या वाटणाशिवाय भारतीय जेवण पूर्णच होऊ शकत नाही. जेवतानाही कच्चा कांदा पानात वाढण्याची पद्धत महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आहे. याचं कारण कच्चा कांदा खाण्याचे फायदे (Kanda Khanyache Fayde) अनेक आहेत. कांदा चिरताना तो जरी खूप रडवत असला तरी कांदा खाणं आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं ठरतं. कांदा आरोग्य प्रमाणे केस, त्वचेसाठीही औषधी आहे. भारतात कांदा लाल आणि पांढरा अशा दोन प्रकार मिळतो यासाठीच जाणून घ्या कांद्याचे फायदे (Kandyache Fayde)

ह्रदयाचे आरोग्य सुधारते (Improve Heart Health)

लाल कांद्यामध्ये फ्लेव्होनॉईड असते ज्यामुळे ह्रदयाचे आरोग्य राखले जाते. शिवाय कांद्यामध्ये नैसर्गिक सल्फरही असतं ज्याचा तुमच्या ह्रदयावर चांगला परिणाम होतो. याबाबत करण्यात आलेल्या संधोधनानुसार कांद्यातील सल्फरमुळे ह्रदयविकाराचा धोका टाळता येतो. कांद्यामुळे रक्त पातळ होते आणि हार्ट अटॅक अथवा स्ट्रोकचा धोका कमी होतो. कांद्यामध्ये अॅंटि ऑक्सिडंट आणिल अॅंटि एनफ्लैमटरी असे दोन गुणधर्म आढळतात जे  तुमच्या ह्रदयाच्याय आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. कांद्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहण्यास मदत होते. कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी येतं यासाठीच कांदा चिरताना करा हे उपाय 

कांदा खाण्याचे फायदे

ADVERTISEMENT

कांदा खाण्याचे फायदे

रक्तातील साखर नियंत्रित राहते (Lower Blood Sugar Levels)

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे आजकाल मधुमेहींची संख्या जगभरात वाढलेली दिसते. मधुमेह हा एक जीवनशैली विकार यामुळे होत चालला आहे. जर दहापैकी तीन लोकांना मधुमेह असतो. मात्र जर तुम्ही नियमित कांदा खात असाल तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. कांद्यामधील सल्फरमुळे मधुमेह नियंत्रित राहतो. मात्र कांद्यामुळे रक्तातील साखरेवर होणारा परिणाम मधुमेहींनी त्यांची औषधे नियमित घेतल्यास दिसून येतो. म्हणून कांदा खाण्यासोबत मधुमेहींनी त्यांची औषधे वेळेवर घेणं गरजेचं आहे. यासोबतच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी करा हे मधुमेह घरगुती उपाय.

पचनाक्रिया सुरळीत होते (Promote Healthy Digestion)

कांदा हा एक फायबरयुक्त पदार्थ आहे. यात मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात ज्याचा चांगला परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर दिसून येतो. कांद्यामधील गुणकारी घटक तुमच्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिआ निर्माण करतात. ज्यामुळे तुम्ही खालेल्ल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होते. मात्र जर तुम्हाला कांद्याची अॅलर्जी असेल तर तुम्हाला याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. कांद्यामध्ये विरघळणारे फायबर्स असल्यामुळे कांदा खाण्यामुळे तो तुम्हाला डायरिआ अथवा अपचनाच्या समस्यांपासून दूर ठेवतो. शिवाय कांदाचे पदार्थ खाण्यामुळे तुमच्या पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता कमी होते. कांदा हा एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही नियमित कांदा खायला हवा.

ADVERTISEMENT

हाडांचे आरोग्य राखते (Maintain Bone Health)

वयानुसार हाडांची झीज होते आणि हाडांच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. मात्र एका संशोधनानुसार कांदा तुम्हाला वयोमानानुसार येणाऱ्या osteoporosis या हाडांच्या विकारापासून दूर ठेवतो. कारण कांद्यामध्ये असे गुणकारी घटक  असतात ज्यामुळे तुमच्या हाडांची झीज कमी होते. चाळीशीनंतर विशेषतः महिलांच्या हाडांची झीज मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र ज्या महिलांच्या आहारात कांद्याचे प्रमाण योग्य असते त्यांना हा त्रास फार उशीरा जाणवू लागतो. आर्थ्राटीस सारख्या सांधेदुखीच्या दुखण्यावरही कांदा गुणकारी ठरतो. यासाठी हाडे मजबूत राखण्यासाठी आणि सांधेदुखीवर उपाय करण्यासाठी नियमित कांदा खा. 

Kanda Khanyache Fayde

कांद्याचे फायदे – Kanda Khanyache Fayde

ADVERTISEMENT

शरीराचा दाह कमी होतो (Prevent Inflammation)

कांद्यामध्ये नैसर्गिक अॅंटि इफ्लैमटरी गुणधर्म असतात. काही आरोग्य समस्या अथवा अॅलर्जीमध्ये शरीरातील पेशींवर परिणाम झाल्यामुळे दाह जाणवतो. मात्र कांदा शरीराला थंडावा देतो. कांदा खाण्यामुळे तुमच्या शरीरातील सायनस आणि टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. सर्दी खोकल्यावरही कांदा खाणं फायद्याचं ठरतं. रात्री कच्चा कांदा खाण्यामुळे कफ कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो. कांद्यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्याचा तुमच्या दातांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. जखमा भरून काढण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी नियमित कांदा खाणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. 

रोग प्रतिकारशक्ती वाढते (Improve Immune System)

कोविड 19 महामारीमुळे सध्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याचे महत्त्व समजले आहे. बाहेरील इनफेक्शनपासून दूर राहण्यासाठी आणि आजारपण टाळण्यासाठी प्रतिकार शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. कांद्यामध्ये सेलेनिअम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत राहते. आजारपणापासून दूर राहण्यासाठी कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्यायला हवेत. कांद्यामुळे तुमचे शरीर निर्जंतूक राहतेच शिवाय शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होते. सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस, काढा घेऊ शकता. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला लवकर बरा होतो. कांद्यामध्ये असलेल्या अॅंटि इफ्लैमटरी घटकांमुळे अस्थमासारथे विकार बरे होण्यास मदत होते.

कानाच्या समस्या कमी बऱ्या होतात (Cure Ear Disorders)

प्राचीन काळात कानाचे विकार बरे करण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर केल्याचे दाखले मिळतात. घरातील जुनी जाणती माणसं कान दुखत असल्यास कानात कांद्याचा रस घालण्याचा सल्ला देतात. मात्र याबाबत स्वतःच्या बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा. याचं कारण असं की कानदुखी नेमकी  कशामुळे होत  आहे हे पाहून कानावर  उपचार करायला हवेत. कांद्याचा रस गरम करून कानात घातल्यामुळे कानातील इनफेक्शन कमी  होते. मात्र हा एक घरगुती उपचार असल्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. मात्र कानदुखीचं कारण इनफेक्शन नसेल तर त्यावर योग्य ते उपचार वेळेत करायला हवेत. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

कच्च्या कांद्याचा रस काढा आणि कोमट करून थंड झाल्यावर दोन ते तीन थेंब कानात टाका

श्वसनसंस्था सुधरते (Promote Respiratory Health)

कोविड – 19 च्या  काळात श्वसनसंस्था निरोगी राखणं गरजेचं आहे. कारण जर तुमची श्वसनसंस्था कमकुवत  असेल तर तुम्हाला बाहेरील इनफेक्शनचा त्रास लवकर होऊ शकतो. शिवाय जर तुम्हाला अस्थमासारखे विकार असतील तर तुम्हाला तुमच्या श्वसनसंस्थेची काळजी घ्यायला हवी. यासाठीच आहारात असे पदार्थ असावेत ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला अॅलर्जी होणार नाही. कांद्यामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग नेहमी निरोगी राहतो. जर तुम्हाला श्वसनाचा त्रास होत असेल तर आहारात कांद्याचा समावेश जरूर करा. कच्चा कांदा खाण्यामुळे अथवा सलाडमध्ये  कांदा खाण्यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच सुरक्षित राहील.

ADVERTISEMENT

सेक्स लाईफ सुधारते (Improve Sexual Health)

कच्चा कांदा खाण्यामुळे तुमचे सेक्स आरोग्यही  सुधारते. कारण कांदा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. काही देशांमध्ये कांद्याचा वापर सेक्शुअल समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. पुरूषांमधील नपूसंकता  अथवा इतर खाजगी शारीरिक समस्या कांदा खाण्यामुळे कमी होऊ शकतात. कांदा खाण्यामुळे पुरूषांचे सेक्स लाईफ चांगले होते. ज्या पुरूषांना प्रजननाबाबत समस्या असतील त्यांनी नियमित पुरूषांनी कांद्याचा रस मधातून घ्यावा.  ज्यामुळे तुमचे बाळाला जन्म देण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकेल.

अॅक्नेवर उपचार करण्यासाठी (Treat Acne)

कांदा आरोग्याप्रमाणेच सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कारण कांद्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. कांद्यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि मायक्रोबल, अॅंटि इनफ्लैमटकी गुणधर्म असतात. ज्यामुळे कांदा तुमच्या त्वचेसाठी एखाद्या अॅसिसेप्टिक क्रिमप्रमाणे काम करतो. जर तुम्हाला वारंवार अॅक्ने म्हणजेच पिंपल्सचा त्रास होत असेल तर त्वचेच्या समस्येवर उपाय करण्यासाठी कांद्याचा रस वापरा. 

कसा कराल वापर –

एक चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. पिंपल्सवर हा रस कापसाच्या मदतीने लावा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. 

ADVERTISEMENT

वाचा – Pimples Janyasathi Upay Marathi

पांढरे केस काळे होतात (Help Reverse Gray Hair)

त्वचेच्या समस्यांप्रमाणेच आजकाल पांढरे केस ही सौंदर्य समस्या अधिकच वाढू लागली आहे. वयानुसार केस पांढरे होणं हे स्वाभाविक असलं तरी आजकाल वयाआधीच किंवा तरूणपणीच केस पांढरे होताना दिसतात. मात्र या समस्येवर तुम्ही कांद्याने उपचार करू शकता. कारण कांद्याचे केसांसाठी फायदे (Onion Benefits For Hair in Marathi) अनेक आहेत. 

कसा कराल वापर –

ADVERTISEMENT

चार ते पाच कांदे एक लिटर पाण्यात दहा मिनीटे उकळवा. मिश्रण गाळून पाणी थंड होऊ द्या. शॅम्पूप्रमाणे या पाण्याचा वापर स्काल्पवर करा. जर तुमच्या केसांना कांद्याचा उग्र वास येत असेल तर तुम्ही त्यानंतर सौम्य शॅम्पू केसांना लावू शकता. एक ते दोन महिने हा उपाय केल्यावर तुमच्या केसांचा रंग पुन्हा काळा झाल्याचं तुम्हाला  दिसून येईल. 

Onion Benefits For Hair in Marathi

Kanda Khanyache Fayde

केसांची वाढ चांगली होते (Promote Hair Growth)

कांदा केसांसाठी अगदी वरदान ठरू शकतो. कारण केस काळे करण्यासोबतच कांद्याच्या रसामुळे तुमच्या केसांची वाढ देखील चांगली होते. कांद्यामध्ये सल्फर असतं केसांसाठी हे एक एखाद्या प्रोटिनप्रमाणे काम करतं. केस मजबूत करण्यासाठी तुम्हाला कांद्याचा रस नक्कीच फायदेशीर ठरेल. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

कांद्याचा रस काढा आणि स्काल्पला लावा. सल्फरमुळे केसांमधील कोलेजीनला प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि केस मजबूत होतात. केसांना कांद्याचा रस लावण्यामुळे केसांचे फॉलिकल्स मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. यासोबतच घनदाट केसांसाठी वापरा कांद्याचा हेअरमास्क

केसांमधील कोंडा कमी होतो (Help Treat Dandruff)

केसांबाबत आढळणारी आणखी एक समस्या म्हणजे केसांमध्ये कोंडा होणे. कांदा केसांना इनफेक्शनपासून दूर ठेवतो. केसांमध्ये इनफेक्शन झाल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. मात्र कांद्यामधील अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म केसांमधील जीवजंतूंचा नाश करतात. ज्याचा परिणाम तुमचे केस कोंडामुक्त होतात.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी वाटून घ्या आणि त्यात कांद्याचा रस टाका. तयार हेअर मास्क केसांना लावा  आणि अर्धा तासाने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमच्या केसांमधील कोंडा नक्कीच कमी होईल. 

यासोबतच जाणून घ्या कांदा आणि बटाट्याला मोड येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

Benefits Of Onions In Marathi

ADVERTISEMENT

Benefits Of Onions In Marathi

कांदा खाण्याचे उपायबाबत प्रश्न – FAQ’s

1. भरपूर कांदा खाण्यामुळे तोंडाला वास येतो का ?

कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे कांदा खाल्लावर काही काळ तोंडाला उग्र वास येतो. मात्र कांदा खाणं आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे तुम्ही कांद्या खाल्यावर मुखवास खाऊन अथवा तोंडाची स्वच्छता राखून हा वास कमी करू शकता.

2. कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते ?

कांद्यामध्ये प्रॉपेंथिअल एस ऑक्साईड नावाचे केमिकल निर्माण होत असते. जेव्हा तुम्ही कांदा कापता तेव्हा ते तुमच्या डोळ्यातील लेक्राइमल ग्रंथींला उत्तेजित करते आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येते.

3. कांद्याचे दुष्परिणाम कोणते ?

कांदा खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे. मात्र काही जणांना कांद्याची अॅलर्जी असते. ज्यामुळे कांदा खाण्यामुळे त्यांना अपचनाच्या समस्या निर्माण होतात. जर कांदा खाल्यास अशी लक्षणे जाणवली तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

19 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT