ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘मी बनू शकते उत्तम दिग्दर्शक’, कंगनाचा दावा

‘मी बनू शकते उत्तम दिग्दर्शक’, कंगनाचा दावा

कंगना कधी काय दावा करेल हे सांगता येत नाही. कधी तिला देशाची सेवा करायची असते. कधी तिला टिका करणारे टिकास्त्र बनवायचे असते. पण आता कंगनाने नवीनच दावा केला आहे की ती उत्तम दिग्दर्शक बनू शकते.  ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या यशानंतर आता कंगनाला दिग्दर्शक व्हायची इच्छा झाली आहे. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात ती एकदम उत्तम असल्याचे तिचे मत असून ती आता आणखी एक नवा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचे देखील कळत आहे. या चित्रपटाचे नाव सांगत तिने या चित्रपटासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक असून शकत नाही असे देखील म्हटले आहे. त्यामुळे आता तिच्या या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार होऊ लागली आहे.

पंधरा वर्षांनी पुन्हा भेटायला येणार लोकप्रिय सुपरहिरो, क्रिश 4 ची घोषणा

फोटो शेअर करत लिहिली पोस्ट

कंगनाने यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने इंदिरा गांधीच्या ‘इमर्जन्सी’ वर आधारीत चित्रपट येणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत. पण या फोटोसोबत तिने दिग्दर्शकाच्या खूर्चीत बसायला पुन्हा एकदा आनंद होत आहे .या चित्रपटासाठी साधारण एक वर्ष काम केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की, या चित्रपटाला माझ्याशिवाय उत्तम दिग्दर्शक मिळू शकत नाही. हा चित्रपट करण्यासाठी मी खूपच उत्साही आहे. त्यासाठी मला माझ्या अॅक्टिंगकडे काही काळासाठी दुर्लक्ष करावे लागले तरी चालू शकेल.

कंगना ट्विटरवर झाली बॅन

एखादा राष्ट्रीय मुद्दा असेल आणि त्यावर कंगनाचे मत नसेल असे कधीही झालेले नाही. कंगना आपली मत प्रत्येकवेळी मांडत असते. पण तिच्या याच टिवटिवाटामुळे तिला ट्विटरवरुन बॅन करण्यात आले आहे. तिचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यामुळे तिने आता आपल्या सगळ्या गोष्टी इन्स्टावर शेअर करायला सुरुवात केली आहे. ट्विटर अकाऊंट बंद केल्यानंतर तिने एक मोठी पोस्ट लिहित अन्याय झाल्याचे म्हटले होते. पण तरीदेखील तिचे अकाऊंट तिला परत सुरु करुन मिळणार नाही. ट्विटरने वादग्रस्त विधानांमुळे तिचे अकाऊंट बंद कण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

या कारणामुळे शहनाज गिल होऊ लागली आहे ट्रोल

कंगना नेहमीच असते चर्चेत

सेलिब्रिटींमधील एकमेव चर्चेचा चेहरा म्हजे कंगना. ती कायम काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिला सतत काहीतरी कुरापती करायला आवडतात. त्यामुळे ती सतत काहीना काही करत असते. कधी कोणाला ती काय बोलेल हे सांगता येत नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर तिने पुन्हा एकदा नेपोटीझमचा मुद्दा उचलून धरला होता. तिने या विषयावर अधिक प्रकाश टाकत काही बड्या असामींची नावे देखील घेतली होती. त्यामुळे कंगना सतत चर्चेत असते. 

आता कंगनाचा हा दावा तिचा नवा चित्रपट आल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध कसा होतो ते पाहावे लागेल.

Hot and Sexy: भूषण प्रधानचे फोटो व्हायरल, कमेंट्सचा वर्षाव

ADVERTISEMENT
24 Jun 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT