ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कंगनाच्या ‘या’ चित्रपटाला अखेर ग्रीन सिग्नल, शीर्षकात केला बदल

कंगनाच्या ‘या’ चित्रपटाला अखेर ग्रीन सिग्नल, शीर्षकात केला बदल

कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘मैंटल है क्या’ काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. इंडियन मेडीकल असोसिएशन आणि इंडियन सायकाएट्रीक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या शीर्षक आणि पोस्टरवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डकडे तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मते, हा  चित्रपट मानसिक रूग्णांच्या भावना दुखावणारा आहे. ज्यामुळे या चित्रपटाचं ट्रेलरचं प्रदर्शन देखील अचानक रद्द करण्यात आलं होतं. मात्र आता या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने ग्रीन सिग्नल दिला आहे. या चित्रपटाच्या शीर्षकात मात्र थोडासा बदल करण्यात आला आहे. चित्रपटाचं शीर्षक आता ‘मेंटल है क्या’ ऐवजी ‘जजमेंटल है क्या’ असं असेल. ‘जजमेंटल है क्या’  हा चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. 

instagram

चित्रपटाच्या शीर्षकामुळे निर्माण झाला होता वाद

इंडियन मेडीकल असोसिएशन आणि इंडियन सायकाएट्रीक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या शिर्षक आणि पोस्टरवर आक्षेप घेतला होता. याबाबत सेन्सॉर बोर्डकडे तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मते, हा  चित्रपट मानसिक रूग्णांच्या भावना दुखावणारा असण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर दीपिका पदूकोणच्या ‘दि लिव्ह लाईफ फांऊडेशन’ या संस्थेनेदेखील या चित्रपटावर टीका केली होती. या संस्थेच्या मते मेंटल शब्दातून मानसिक रूग्णाचा अपमान दर्शवला जात आहे.नेहमीप्रमाणेच कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली नेहमीप्रमाणे या वादात सहभागी झाली होती. मात्र चित्रपटाची निर्माती एकता कपूरला मात्र हा वाद लवकरच मिटवण्याची इच्छा होती. तिने त्या दिशेने प्रयत्न देखील केले. ज्यामुळे चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने ग्रीन सिग्नल दिला. एकता कपूरने या चित्रपटाच्या मोशन पोस्टरसह एक ट्वीटदेखील शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये तिने असं शेअर केलं होतं की, “ या चित्रपटात मानसिक आजार असणाऱ्या लोकांना कमी लेखण्यात आलेलं नाही. चित्रपटाच्या शिर्षकामधून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. हा चित्रपट मानसिक रूग्णाबाबत संवेदनशील आहे. माणसातील वेगळेपण स्वीकारण्यासाठी या फिक्शन थ्रीलरची निर्मिती केली आहे”

ADVERTISEMENT

instagram

राजकुमार आणि कंगनाची जोडी पुन्हा एकत्र

जजमेंटल है क्या मध्ये कंगना आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकुमार आणि कंगना या जोडीने यापूर्वी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. कंगना आणि राजकुमार नेहमीच वेगळ्या भूमिकांना प्राधान्य देतात. त्यामुळे या चित्रपटामध्ये आता ही जोडी काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. शिवाय या चित्रपटात राजकुमार पहिल्यांदाच एक नकारात्मक भूमिका साकारत आहे.

मेंटल है क्या चित्रपटात नेमकं आहे तरी काय

मेंटल है क्या चित्रपट वादात अडकला होता तरी चाहते मात्र या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. मेंटल है क्या या शीर्षक आणि मोशन पोस्टरवरून या चित्रपटात नेमकं काय असेल याबाबत उत्सुकता वाढली होती. दक्षिणेतील आघाडीचे चित्रपट निर्माते दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. मेंटल है क्यामध्ये कंगना आणि राजकुमार सोबत जिमी शेरगिल, सतिश कौशिक, अमृता पुरी आणि अमिरा दस्तुर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. आता हा चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा

राजकुमार राव पहिल्यांदाच साकारणार सायको किलरची नकारात्मक भूमिका

नीता अंबानीच्या या बॅगला जडलेत 240 हिरे, किंमत कोटींच्या घरात

ADVERTISEMENT

रवीनाच्या ‘टीप टीप…’ वर कतरिना दाखवणार जलवा

30 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT