गेल्या काही दिवसापासून अजिबात चर्चेत नसलेली कंगना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण आता ती कोणत्याही वेड्यावाकड्या चर्चेमुळे नाही तर आता ती प्रकाशझोतात आली आहे तिच्या या नव्या लेहंग्यामुळे. कंगना रणौतने तिच्या भावाच्या लग्नासाठी हा खास लेहंगा घातला होता. निळा- वांगी रंगाचा उपयोग करुन तयार करण्यात आलेला हा लेहंगा इतका खास होता की, हा लेहंगा तयार करण्यासाठी कारागिरांना 14 महिने लागले. हा डिझायनर लेहंगा इतका खास कसा आहे. अनेकांनी कंगनाला या लेहंग्याबद्दल विचारल्यानंतर तिने हा लेहंगा इतका खास कसा आहे. ते या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
बालिका वधू फेम ‘अविका’च्या आयुष्यात आला तिच्या स्वप्नांचा राजकुमार
मानले आभार आणि दिली माहिती
कंगना रणौतला फॅन्सनी या लेहंग्याबद्दल विचारल्यानंतर तिने या लेहंग्याची माहिती तर दिली आहे. निळ्या आणि जांभळ्या रंगाचा हा लेहंगा फोटो आणि व्हिडिओमध्ये फारच उठून दिसत आहे. या लेहंग्याचा घेर असला तरी यावर विशिष्ट असे काम करण्यात आले आहे. निळ्या रंगाला थोडासा आणखी जास्त लुक देण्यासाठी याचा ब्लाऊज आणि ओढणीमध्ये वांगी कलरचा उपयोग करण्यात आला आहे. कंगनाने या लेहंग्यातील अनेक फोटो शेअर केले असले तरी एक व्हिडिओ पोस्ट करत तिने लेहंग्याची खासियत सांगितली आहे. कंगनाने सांगितल्यानुसार हा लेंहगा एक गुजराती बांधणी लेहंगा या प्रकारातील आहे. हा एक लेहंगा करायला म्हणजेच कपडा डाय करण्यपासून त्यावरील सगळे काम करेपर्यंत याला 14 महिने लागले. ही आपली एक पारंपरिक कला असून ही सुंदर कला जपणे आपले काम आहे. असे म्हणत तिने डिझायनर अनुराधा वकिलचे आभार मानले आहेत.तर कंगनाने घातलेली ज्वेलरी ही सब्यसाचीची आहे.
मांगटिका आणि हेवी नेक पिसने पूर्ण झाला लुक
सब्यसाचीची ज्वेलरी म्हटल्यावर ती खास असणार यात काहीच शंका नाही. अगदी त्याचप्रमाणे कंगनाने घातलेली ज्वेलरीही या लेहंग्यला उठाव आणण्याचे काम करत आहे. हेव्ही मांगटिका आणि नेकपीसवर हिरव्या रंगाचे असलेले काम या लेहंग्याला मोराच्या पिसाप्रमाणे भासवत आहे. त्यामुळे हटके लेहंगा आणि ज्वेलरीमुळे कंगनाचा फॅशन का जलवा इथेही चालताना दिसत आहे. या शिवाय कंगनाने लग्नानंतर कुलदेवीच्या दर्शनाला जाताना ही एक डिझायनर पंजाबी ड्रेस घातला आहे. ज्यावर तिने पुन्हा एकदा सब्यसाचीची तिच ज्वेलरी घातली आहे. पण तिचा हा लुकही नक्कीच हटके आहे.
रश्मि रॉकेट’साठी जोरदार मेहनत घेत आहे तापसी पन्नू, असा मेंटेन केला फिटनेस
सुशांत सिंह प्रकरणानंतर कायम चर्चेत
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर नेपोटिझमचा मुद्दा घेऊन कंगना कायम चर्चेत होती. तिने या सगळ्या प्रकरणासंदर्भात अनेक व्हिडिओ देखील केले होते. पण कालांतराने सगळ्या गोष्टी थंडावल्यानंतर कंगनाही थंडावली. पहिल्या काही दिवसात कंगना विरुद्ध शिवसेना असेही वॉर दिसून आले. तिचे मुंबईतील कार्यालय तोडल्यानंतर तिने पुन्हा एकदा सगळ्यांशी पंगा घेतला होता. पण आता ही पंगा क्विन थोडी शांत झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्यापासून तिने आपला मोर्चा कामांकडे वळवला आहे. तिने नुकतेच थल्लयवीचे शूटिंग पुरे केले असून त्यासाठी वाढवलेले वजन कमी करण्याचा तिचा प्रवासही तिने सुरु केला आहे.
तुम्ही आता पर्यंत या पंगा क्विनचा लेहंगा नीट पाहिला नसेल तर तो पाहा कारण तुम्हाला तुमच्या लग्नासाठी असा नक्कीच डिझाईन करता येईल.
आश्रम’ सीरिज रिलीज झाल्यानंतर या अभिनेत्रीने शेअर केला किस्सा